ديسمبر 2019

चांदेकसारे (वार्ताहर )
मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत दैनंदिन व्यवहारातील आर्थिक -देवाण घेवाण या विषयी ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहीती शालेय समिती व्यवस्थापन समिती अध्यक्ष डाँ सुनिल होन यांनी चांदेकसारे येथे जिल्हापरीषद परीषद मराठी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन घेण्यात आला यावेळी बोलताना केले . अध्यक्षस्थानी सुधीर जावळे होते 
   ,विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी भेंडी.डांगर टोमॅटो .मेथी बटाटे उपवासाची पदार्थ पाववडे भजी वेफर्स विक्रीसाठी आणली पालकांनी पैसेदेऊन खरेदी केली यामध्ये अंदाजे  पाचहचार रु उलाढाल झाली. पालकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता यावेळी शाळाव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बालआनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सिताराम गुरसळ वाल्मिक खंडीझोड  विलास शिंदे राजेंद्र पोटे किरण गायकवाड गायञी बुरकुले आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले प्रास्तविक राजेंद्र पोटे यांनी केले सुञसंचलन सिताराम गुरसळ यांनी केले वाल्मिक खंडीझोड यांनी आभार मानले.

बोधेगाव वार्ताहर  
पिंगेवाडी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदी उदय मुंडे तर उपाध्यक्षपदी केशव अंगरक यांची बिनविरोध निवड झाली आहे 
        शेवगाव पूर्व भागातील राजकीय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंगेवाडी सहकारी सेवा संस्थेवर भाजपाचे अरुण मुंडे यांचे वर्चस्व असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अनिल तानवडे उपाध्यक्ष भगवान मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली अध्यक्ष पदासाठी उदय भाऊसाहेब मुंडे तर उपाध्यक्ष पदासाठी केशव  गोपाळा अंगरख यांचे एकमेव अर्ज दाखल  झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी लोखंडे, विखे, यांनी वरील दोघांची  बिनविरोध निवड जाहीर  करण्यात आली त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला 
        यावेळी सरपंच रविंद्र तानवडे, अनिल तानवडे, विठ्ठल मुंडे, आश्रू नागरे, मुसा शेख, बबन वाघ, रामा जायभाये, आदी ग्रामस्थ उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी आभार मानले 

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा शहरातील मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेत्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नेवासकर ग्रामस्थांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष यांच्यासह  उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व  नगरपंचायतच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत नगरपंचायतला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायत समोरील चौकात रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने फळ विक्रेत्यांनी दुकाने लावलेली आहे त्यातच मोकाट असलेली जनावरे ही देखील वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याने अनेक दुचाकी चालक हे जखमी होऊन पडले आहे यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्याचा बंदोबस्त करण्यात येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अन्यथा याबाबत नेवासकर नागरिक त्रिव आंदोलन करतील असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
        नगरपंचायतला दिलेल्या निवेदन उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले.यावेळीं नगरसेवक अंबादास इरले,भारत डोकडे,राजेंद्र मापारी,नगरपंचायतचे कर्मचारी विलास आरले उपस्थित होते.या निवेदनावर बालेंद्र पोतदार,सामाजिक कार्यकर्ते शिवा राजगिरे,अनिल सोनवणे,संजय व्यवहारे,अमृत फिरोदिया, शकील शेख, फारूक शेख,शंकर तंटक,दीपक परदेशी,महेश शेजुळ,
सचिन बोरुडे,गणेश निंबाळकर,अक्षय अंबिलवादे,शंकर तनपुरे,गौरव चानन,सुभाष पाटील कडू,विनायक ताठे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सहया आहेत.

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम टोका येथील शेतकरी व माजी सरपंच गजानन जनार्धन चव्हाण यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात महंत बालब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
        प्रवरासंगम टोका येथील माजी सरपंच गजानन चव्हाण यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीवर विविध प्रयोग राबवून एक आदर्शवत शेती केली ती इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
        पुरस्कार प्रदान करतेवेळी भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक विजय रेड्डी,राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल सचिव हनिफभाई पठाण,प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील,माजी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव,शांतवन खंडागळे,कायदेशीर सल्लागार अँड रमेश कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रज्जाकभाई शेख,कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे उपस्थित होते.
   राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल गजानन चव्हाण यांचे प्रवरासंगमचे सरपंच सुनील बाकलीवाल,सोसायटीचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण, कायदेशीर सल्लागार अँड रमेश कोळेकर जिल्हा कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष रज्जाकभाई शेख यांनी अभिनंदन केले आहे.

आरोपींना मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी जलदगतीने व्हावी-पदमभूषण अॅड. उज्वल निकम


नेवासा, प्रतिनिधी
गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या राज्याचे प्रसिद्ध सरकारी वकील पदमभूषण अॅड.उज्वल निकम यांनी आपले मित्र असलेल्या नेवासा येथील जेष्ठ विधी तज्ञ अँड.एम.आय.पठाण यांच्या निवासस्थानी भेट सदिच्छा भेट दिली. तत्परतेने न्याय मिळावा अशीच सर्वसामान्य माणसांची ईच्छा असल्याने अशी प्रक्रिया होणे गरजेचे आरोपींना मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी जलद व्हावी अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी सदिच्छा भेटीप्रसंगी जेष्ठ विधी तज्ञ अॅड.एम.आय.पठाण यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजित डेरे साहेब यांच्यासमवेत अहमदनगर येथील निकम साहेब यांचे जुनियर वकील अॅड.वकील फडे व त्याचे सहकारी हजर होते यावेळी पठाण परिवाराच्या वतीने अॅड.उज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड.उज्वल निकम यांनी चालू घडामोडीवर चर्चा केली महिला अत्याचाराच्या बाबत न्याय निवाडा तत्परतेने होणे गरजेचे असून महिला अत्याचारातील आरोपींना मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी जलदगतीने होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.पठाण यांच्या परिवारातील सदस्यांशी त्यांनी यावेळी हसतमुखाने संवाद साधला व स्नेहभोजन घेतले.
यावेळी नेवासा येथील जेष्ठ विधीतज्ञ अॅड.एम.आय. पठाण,यांच्या समवेत नेवासा पोलीस स्टेशनच्या शांतता व जातीय सलोखा कमिटी सदस्य आसिफभाई पठाण, अॅड.जफरखान पठाण,अॅड.मोजमखान पठाण, अॅड. अय्याजखान पठाण,अॅड.खलीलखान पठाण. अॅड. मुजाहीडखान पठाण,राजूभाई पठाण उपस्थित होते.

न्यायालयाने सरकारला ठोठावला २५ हजाराचा दंड ! 

नेवासा, प्रतिनिधी
झाडाझडती घेतल्या प्रकरणी नेवासा पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात अर्जदार यांनी शासनाची परवानगी घेऊन गुन्हे दाखल करावे असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहे.
याबाबत औरंगाबाद हायकोर्टाचे वकील अॅड संदीप सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दि.६ मे २०१८ रोजी याचिकाकर्ते ज्ञानेश्वर तोडमल (माऊली)हे परिवारासोबत घरामध्ये झोपलेले असतांना नेवासा पोलीस स्टेशन येथील पी.आय.लोखंडे व कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड व इतर दहा ते बारा पोलीस
कर्मचारी हे सोबत कुठल्याही प्रकारचे वॉरंट नसतांना अर्जदार ज्ञानेश्वर तोडमल यांचे घरामध्ये बेकायदेशीर रित्या घुसून घर झडती घेतली होती,सदरील घेतलेल्या घर झडती बाबत अर्जदार ज्ञानेश्वर तोडमल यांनी अॅड विजय सपकाळ व अॅड संदीप सपकाळ यांच्या मार्फत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लोखंडे व पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड व इतर दहा ते बारा पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात रीट याचिका दाखल केली होती.
सदरील रिट याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते यांच्या वकीला मार्फत युक्तिवाद करण्यात आला की घरझडती वॉरंट नसतांना पोलीसांनी घेतलेली घरझडती ही बेकायदेशीर असून ही अर्जदार यांच्या वैयक्तिक अधिकारावरती घाला घालणारी आहे.सदरील कृत्य हे भारतीय राज्यघटनेमधील कलम २१ चे उल्लंघन करणारे आहे,तसेच सीआरपी कलम १६५,१६६ चे उल्लंघन करणारे आहेत. तसेच अर्जदार यांचे वकिलांनी असा युक्तिवाद केला की घरझडती घेते वेळेस पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड यांनी अर्जदार यांना खोट्या गुन्हयामध्ये फसविण्याची धमकी सुद्धा दिली. सदरील कृत्य हे पोलीस कर्मचारी यांना दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन करणारे आहे व पोलीस खात्यास काळिमा फासण्यासारखे कृत्य आहे.उच्च न्यायालयाने सरकार पक्ष व अर्जदार यांचा युक्तिवाद ऐकूण घेऊन असे स्पष्ट केले की अर्जदार यांच्या वैयक्तिक अधिकारावर घाला  घालणारी आहे.तसेच पोलिसांकडून घेण्यात आलेल्या बेकायदेशीर घरझडतीमुळे उच्च न्यायालयाने  महाराष्ट्र सरकार यांच्यावरती पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.
तसेच उच्चन्यायालयाने सदरील दंड हा पोलीस अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेशात केला आहे 
तसेच न्यायालयाने अर्जदार यास सदरील पोलीस कर्मचाऱ्या विरोधात शासनाची परवानगी घेऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलीस खात्याला विना वॉरंट घरझडती घेणे या कृत्यावरती चांगलीच टाच बसणार आहे.सदरील प्रकरणी अर्जदार यांच्या तर्फे अॅड विजय सपकाळ व अॅड संदीप सपकाळ यांनी काम पाहिले व सरकार पक्षातर्फे अॅड.डी. आर.काळे यांनी काम पाहिले.

पाथर्डी- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्याचे स्व. मा.आ.राजीव राजळे यांच्या ५० व्या जयंती निम्मित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील विविध शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.स्पर्धेला  शाळा महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद दिसून आला.यावेळी स्पर्धेचा शुभारंभ दादापाटील राजळे शिक्षण संस्था विश्वस्त व जि.प.सदस्य राहुल राजळे यांच्या हस्ते मॅरेथॉन झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्राचार्य आर.जे.टेमकर,विक्रम राजळे तसेच तालुक्यातील मान्यवर,पदाधिकारी कारखाना कर्मचारी,संस्थेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जि प शाळा मराठी मुलेशेवगाव या शाळेत जागतिकदिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री रामनाथ कराड हे होते. याप्रसंगी मुलांना गुलाब पुष्प व खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री कराड म्हणाले की दिव्यांग मुलांना न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून त्यांना मित्र करा त्यांना आपल्या दिव्यांग तत्वाची जाणीव होऊ देऊ नका. प्रसंगी दिव्यांग व्यक्ती आपल्या कर्तुत्वाने मोठ्या पदावर गेल्याचे उदाहरणे सांगितले.  
पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत दिव्यांग मुलांना मदतनिस, प्रवासभत्ता, प्रोत्साहनभत्ता अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे व्हीलचेअर,  मोडीफाय चेअर, थेरपीसेवा चा लाभ दिला जात असल्याची माहिती विशेषतज्ञ श्री महेश राऊत, यांनीही दिली. याप्रसंगी   केंद्रप्रमुख  रघुनाथ लबडे, दिलीप औताडे, युसुफ शेख शाळेचे मुख्याध्यापक मोहिनीराज साळवे, बप्पासाहेब मरकड, विशेष शिक्षक बाळासाहेब पालवे, अनंत शिनगारे, अशोक तोरडमल, दत्तात्रय सुरवसे व अलका शिंदे तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थिती होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दशरथ गायकवाड विशेष शिक्षक यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार समावेशित शिक्षण तालुका समन्वयक श्री. अनिल जाधव यांनी केले.

सरपंचासह ग्रामस्थांकडून पंचनामा. 

विसापूर
सुरेगाव ता.श्रीगोंदा येथील श्रीधर स्वामी विद्यालयात शिक्षक व कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मुख्याध्यापकांसह संबंधीत जबाबदार शिक्षकांवर कारवाई करावी.अन्यथा ही शाळा बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 
   सुरेगाव येथे कोरेगव्हाण येथील कृषक सेवा संघ या संस्थेच्या वतीने दहावी पर्यंत श्रीधर स्वामी विद्यालय चालवले जात आहे.गुरुवार दि.५ रोजी शाळा उघडल्यावर सरपंच सर्जेराव रोडे,कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे,उपसरपंच गुलाब रामफळे,प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण रोडे,डॉ.अनिल मोरे व ग्रामस्थांनी या शाळेला भेट दिली.त्यावेळी शाळेत मुख्याध्यापक शरद टकले उपस्थित नव्हते.इतर काही शिक्षकही हजर नव्हते.जे हजर होते तेही इतरत्र मोबाईलवर बोलत फिरताना आढळून आले.ग्रामस्तांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.दुपारी बारा वाजता मुख्याध्यापक शरद टकले हजर झाले मात्र तेही ग्रामस्थांना समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.त्यामुळे ग्रामस्थांनी परिस्थितीचा पंचनामा करून तो पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सादर केला आहे.चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास शाळा बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 
# शाळेचा दर्जा घसरल्यामुळे विद्यार्थ्यांची विसापूर येथे प्रवेश घेण्यास पसंती.
  गेल्या चार पाच वर्षात या शाळेचा दर्जा घसरल्यामुळे गावात शाळा असताना पालक आपल्या मुलांना विसापूर येथील सरस्वती विद्यालय शाळेत प्रवेश घेण्यासाठी पसंती देत आहेत.त्यासाठी भाडोत्री वाहानाची व्यवस्था पालकांना करावी लागत आहे.सुरेगाव येथुन विसापूर येथे तिसरा ते चाळीस विद्यार्थी दररोज येतात.मात्र सुरेगाव येथील विद्यालयात केवळ शंभर ते सव्वाशे एवढी पट संख्या आहे.ज्या पालकांची बाहेर गावी पाठवून शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नाही त्यांना मात्र नाईलाजाने या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागतो.त्या विद्यार्थ्यांचे गुणवत्तेचे काय हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यां बाबत केलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल.ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यात काही गैर समज असतील तर चर्चा करून समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
     ---- सचिन नामदेव गोंटे(सचिव), कृषक सेवा संघ, कोरेगव्हाण ता.श्रीगोंदा.

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा शहरातील विविध शाळा परिसर तसेच शहरात चौकाचौकात अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरे व डासांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी नेवासा नगरपंचायतवर गुरुवारी मोर्चा काढला.
          गुरुवारी दुपारी दीड च्या सुमारास गणपती मंदिर चौकातून मोर्चा काढण्यात आला यावेळी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा तसेच डासांचा बंदोबस्त करावा या आशयाच्या घोषणा देत विद्यार्थी व नागरिक नगरपंचायत कार्यालय येथे आले.नेवासा शहरातील ज्ञानदीप इंग्लिश स्कूल,ज्ञानोदय इंग्लिश स्कूल,सेव्हेंथ डे स्कूल,जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस
मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे पांढऱ्या पेशी कमी होणे व डेंगू सदृश्य आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर बदामबाई गांधी विद्यालय जवळ कचरा डेपो असल्याने येथील विद्यार्थ्यांना ही या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असून अनेक लहान मुले यामुळे आजारी पडले असून नेवासा शहरातील दवाखाने हे रुग्णांनी गजबजले असल्याने त्यातच मलेरिया,डेंगू सदृश्य तापाचे रुग्ण आढळत असल्याने हा मोर्चा काढण्यात आला.
            यावेळी बोलतांना भाऊसाहेब वाघ म्हणाले की शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून त्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा तसेच डासांच्या समस्येवर उपाययोजना करावी अन्यथा नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात येईल.
        यावेळी बोलताना रामभाऊ केंदळे म्हणाले की प्रभाग क्रमांक सहा मधील संभाजी नगर येथील एका अंगणवाडी ची अवस्था अत्यंत वाईट झाली असून अंगणवाडी भोवती उघड्या गटारी असल्याने अनेक चिमुकले आजारी पडले आहे.भटक्यांचे नेते पोपटराव जिरे म्हणाले की अडीच वर्ष झाले शहरात नगरपंचायत होऊन मात्र शहरातील एक रस्ता ही नीट नाही प्रत्येक भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे साथीचे आजार पसरत आहे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी कार्यालयीन प्रमुख रविंद्र गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.
         यावेळी भाऊसाहेब वाघ,महेश मापारी,अभिजित मापारी,सुनील धायजे,युसूफ बागवान,रामभाऊ केंदळे, अंकुश पंडुरे,शिवा राजगिरे,शिक्षक काकासाहेब काळे, अनिल भणगे,गणेश पोटे,अरविंद घोडके,राहुल आठरे, कडूबाल काळे,विश्वनाथ नाणेकर,शिवा राजगिरे व शाळेतील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

ग्रामपंचायतीची जागा महाराष्ट्र शासनाचे नावे परस्पर वर्ग झाल्याने गावच्या विकासात अडथळा. 

शुभम एन.जठार - विसापूर
सुरेगाव ता.श्रीगोंदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे माजी सरपंच डॉ.वैशाली मोरे व उपसरपंच गुलाब रामफळे यांचे तिन वर्षांपासुन चालू असलेल्या प्रयत्नांना यशस्वी होणार आहे.
  कोळगाव येथे ग्रामीण आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने तेथे सध्या सुरू असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर सुरेगाव येथे होणार आहे.याबाबत राज्य आरोग्य संचालनालयाने काही बाबींची पुर्तता करण्याचे निर्देश जिल्हा परिषद,पंचायत समिती व सुरेगाव ग्रामपंचायतीला दिले आहेत.या आरोग्य केंद्रामुळे सुरेगाव,घुटेवाडी व उखलगाव या दुर्गम गावातील नागरीकांना सरकारी आरोग्य सुविधा मिळणार आहे.तसेत सुरेगाव येथे आध्यात्मिक गुरू पपु आनंदाश्रम स्वामींची संजिवन समाधी असल्याने वर्षभर सतत वारकऱ्यांचा वावर असतो.त्या वारकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.या ठिकाणी आरोग्य केंद्र व्हावे यासाठी तत्कालीन सरपंच डॉ.वैशाली मोरे व उपसरपंच गुलाब रामफळे यांनी विशेष प्रयत्न केले.सरपंच सर्जेराव रोडे यांनी पाठपुरावा केला. 

ग्रामपंचायतीची आडोतीस एकर जमीन राज्य शासनाने परस्पर घेतली वर्ग करून.
सुरेगाव ग्रामपंचायतीची दावल मलिक देवस्थानच्या जवळ गट नंबर १०७ मध्ये आडोतीस एकर जमीन होती.सदर जमीनीच्या सातबारा उता-यावर परस्पर महाराष्ट्र शासन वनखाते राखीव जागा अशी नोंद करण्यात आली.सुरेगाव गावठाण क्षेत्र केवळ बावीस एकर असुन या क्षेत्रात लोकवस्ती आहे.त्यामुळे शासनाने वर्ग करुन घेतलेली ही जमीन ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी परत करण्यात यावी ही मागणी उपसरपंच गुलाब रामफळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे २६ जुलै २०१७ रोजी केली होती. या बाबत रामफळे यांचा जबाब व चौकशी झाली मात्र पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.या जागेपैकी दोन एकर जागा या मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अवश्यक आहे.या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पा करीता तसेच शौचालय,क्रीडांगण,वाचनालय,शाळा इमारत या साठी ग्रामपंचायतीला ही जागा अवश्यक आहे.आनंदाश्रम स्वामी देवस्थान समितीच्या पार्किंग व गार्डन साठी जागा मिळावी यासाठी संस्थान समितीचे अध्यक्ष मनमोहनसिंग कोचर व विश्वस्तांनी जागेची मागणी ग्रामपंचायतीला केली आहे.गावच्या विकास कामांसाठी सदर जमीन ग्रामपंचायतीला परत करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

माजी खासदार तुकाराम गडाख युवा मंचचा आंदोलनाचा इशारा !

नेवासा, प्रतिनिधी
सोनई गावाला गेल्या सतरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली रस्ते, पथदिवे या मुलभूत सुविधा तर लांबच राहिल्या. साधं पिण्याचं पाणीही पुरवू न शकणार्‍या निष्क्रिय सोनई ग्रामपंचायत प्रशासनाला येथील जागरुक तरुणांनी नुकतंच  निवेदन दिलं. माजी खा. तुकाराम गडाख युवा मंचने यासाठी पुढाकार घेतला.
  माजी आ. मुरकुटेंचा पराभव करुन नेवाशाचे लोकप्रतिनिधी झालेल्या आ. शंकरराव गडाख यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. विशेष म्हणजे  सोनईसह अठरा गाव पाणी योजने संदर्भात अहमदनगरच्या तारकपूर परिसरातल्या जीवन प्राधिकरण विरोधात आक्रमक पवित्रा घेत आ. गडाखांनी आंदोलही केलं होतं. या आंदोलनानंतर सदर पाणी योजना सुरळीत सुरु देखील झाल्याचा दावा आ. गडाख समर्थकांमधून करण्यात आला. मात्र तरी ही तब्बल सतरा दिवसांपासून सोनई गांव तहानलेलं आहे. ग्रामस्थ विकत पाणी घेऊन कशी तरी तहान भागवत आहेत. तीन दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली नाहीतर कुठल्याही क्षणी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. गेली अनेक वर्षे आमदार, खासदार देणार्‍या गावाला पाणीच मिळत नसेल तर गांवचा काय विकास होणार ? असा सवाल अॅड. प्रफूल्ल जाधव यांनी बोलतांना उपस्थित केला. यावेळी युवा नेते अमोल चव्हाण, प्रमोद कुमावत आदी उपस्थित होते.

दिव्यांगांचा न्याय हक्कासाठी गोल्डन ग्रुप सदैव पाठीशी - बब्बूभाई बागवान


नेवासा, प्रतिनिधी
दिव्यांग दिनानिमित्त नेवासा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गोल्डन ग्रुपच्या वतीने दिव्यांगांचा गौरव करण्यात आला.दिव्यांगांचा न्याय हक्कासाठी गोल्डन ग्रुप योगदान देईल व सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष बब्बूभाई बागवान यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी गोल्डन ग्रुपचे प्रमुख बब्बूभाई बागवान,गोल्डन ग्रुपचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण,नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी भास्करराव नरसाळे,दाऊदभाई बागवान यांच्या हस्ते प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शेजुळ, उपाध्यक्ष वैजनाथ जाधव,तालुका सचिव विजय शेरे,महिला अध्यक्षा तब्बूताई थेरकर यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संदीप डौले,अशोक विधाते, बापूसाहेब मोरे गोल्डन ग्रुपचे सदस्य जहिर बागवान,समीर बागवान उपस्थित होते.
शिक्षण विभागाच्या मार्फत अपंग बालकांना मिळणाऱ्या तत्परतेने सवलती देण्याचा आपण प्रयत्न करू अशी ग्वाही शिक्षण विभागाचे अधिकारी भास्करराव नरसाळे यांनी यावेळी बोलतांना दिली.
गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष बब्बूभाई बागवान म्हणाले की गोल्डन ग्रुपने नेहमी उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याने आपण ही अपंगासाठी खारीचा वाटा देऊन योगदान देऊ व त्यांच्या न्याय हक्कासाठी पाठीशी उभे राहू अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा येथील गावकऱ्यांच्या वतीने सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायणाची समाप्ती ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे ग्रंथाचे  विधीवत पूजनाने मंगळवार दि.३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आली.
      यावेळी पारायण व्यासपीठ चालक हभप विजय महाराज पवार व गायनाचार्य हभप ज्ञानेश्वर माऊली शिंदे मृदुंगाचार्य भास्कर महाराज तारडे,पत्रकार सुधीर चव्हाण  यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पारायण समाप्ती प्रसंगी ज्ञानेश्वरी वाचक संजय देशपांडे व सौ.सुषमा देशपांडे यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोष करत पूजा करण्यात आली.
   ज्ञानेश्वरीच्या वाचनाने जीवाचा उध्दार होत असल्याने 
ज्ञानेश्वरीचे वाचन प्रत्येक घरातील सदस्यांनी करावे ज्ञानेश्वरी वाचनाने माऊलींची खरी भेट होत ज्ञानेश्वरीच्या पारायणात सहभाग वाढणे ही गरजेचे असल्याचे हरिभक्त परायण विजय महाराज पवार यांनी सांगितले व जिवाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरीचे पारायण करा असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले
   यावेळी ज्ञानेश्वरी ग्रंथाची विधीवत पद्धतीने पूजा महिला व पुरुष भाविकांनी केली यावेळी सोहळा कमिटीचे सदस्य भाऊसाहेब माळवे,ज्ञानेश्वर काळे,अशोकराव लोखंडे, भानुदास गटकळ,बाबासाहेब कोरेकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर भाऊसाहेब माळवे यांनी आभार मानले.बुधवारी दि.४ डिसेंबर रोजी सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या सकाळी ८ ते १० यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने आठ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सोहळयाची सांगता होणार आहे.

'काळी आई वाचवा अभियान'

पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथे ऊस,कांदा,डांळीब व सेंद्रिय शेती तसेच मिशन - काळी आई वाचवा अभियान अंतर्गत अनेक शेती विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय जैविक शेती मार्गदर्शक प्रकाश मगर,अक्षय हांडगे,ज्ञानेश्वर बेरड यांनी शेतकऱ्यांना शेतामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकासंबधी मार्गदर्शन केले.

एकवीसाव्या शतकामधील शेतकरी फक्त उदर निर्वाहासाठी शेती करतात.आज शेतामध्ये दरवर्षी एकच प्रकारचे पीक घेतल्याने जमीन नापिक होत चाललेली आहे.दरवर्षी वेगवेगळी बदलून पीक घेणे गरजेचे आहे.तसेच शेतकऱ्यांनी डांळीब,संञा यासारख्या फळबागाचे उत्पादन घेणे गरजेचे आहे.

मागील पिढीने आपल्याला शेतीसंबधी खूप  काही शिकवण दिली असून आणखी शेतीसंबधी ज्ञान व माहीती मिळवून साधन संपत्तीचा चांगला उपयोग करुन घेऊन आपण कमी खर्चात जास्तीत जास्त पिकाचे उत्पादन घेणे गरजेचे आहे.असे मत जैविक शेती तज्ञ प्रकाश मगर यांनी व्यक्त केले.
परीसरातील शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध शेती विषयी असणाऱ्या समस्या व पिकाच्या अडचणी यावेळी समजावून घेतल्या.तसेच डांळीब,संञा या फळबागासंबधी असणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण केले.
तसेच शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे मत जाणून घेतले.

यावेळी जि.प.सदस्य राहुल राजळे,डांळीब,द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्धव ताठे, भाऊपाटील राजळे,विक्रम राजळे, संदिप राजळे,ग्राम पंचायत सदस्य गणेश भगत,अर्जुन राजळे,दत्ताञय भगत,आबासाहेब म्हस्के,
गोरक्ष राजळे,संतराम पवार,शिवाजी खोजे,आबासाहेब राजळे,रामदास शेळके,ज्ञानदेव जगताप,अमोल म्हस्के,आदिनाथ कवळे, बापूसाहेब भगत,अर्जुन देशमुख,राजू तुपे,दादाभाऊ तुपे उपस्थित होते.

यावेळी कृषिमिञ तसेच प्रगतशील शेतकरी संदिप राजळे यांनी बाजरी,ज्वारी,हुलगे,मका या पिकाऐवजी शेतकऱ्यांनी डांळीब,संञा यासारख्या फळबागा आपल्या शेतात करुन भरघोस उत्पादन घेणे गरजेचे आहे.तसेच दिवसेंदिवस शिक्षण घेऊन नोकरी मिळेलच याची शाश्वती नसून जास्तीत जास्त तरुणांनी फळबाग शेतीकडे वळणे गरजेचे आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय जैविक शेती मार्गदर्शक तज्ञ प्रकाश मगर,अक्षय हांडगे,ज्ञानेश्वर बेरड तसेच परीसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेवासा, प्रतिनिधी
लाखो भाविकांचे कुलदैवत खंडोबा रायाची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील प्रवरानदीच्या तीरावर जीर्णोद्धार करून नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसा मंदिरासह घोड्यावर स्वार 
असलेल्या खंडोबा-म्हाळसाच्या नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा  येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात चंपाषष्ठीच्या दिवशी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत करण्यात आले.
              यावेळी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास तळीभंडाऱ्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रसिध्द किर्तनकार हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या  कीर्तनाने करण्यात आली.या प्रसंगी श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व हभप मीराबाई मिरीकर,सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज मंडलिक,हभप संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख,महंत सुनीलगिरी महाराज,सौ.सुनीताताई गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात बसविण्यात आलेल्या म्हाळसा खंडोबा या मुख्य मूर्तीसह शेजारीच स्थापना करण्यात आलेल्या देवर्षी नारदमुनी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंद बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आली.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेसदेवा गुरू कुलकर्णी व ब्रम्हवृंद मंडळींनी केले.
    यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व संत महंतांचे स्वागत व पूजन मंदिराचे व्यवस्थापक प्रा.डॉ.
मुरलीधर कराळे व सौ.कमलताई कराळे यांनी केले.यावेळी म्हाळसादेवीच्या नेवासा येथील माहेरचा महिमा असलेले म्हाळसा माहेर पुस्तकाचे अनावरण यावेळी संत महंतांच्या हस्ते करण्यात आले.गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यावेळी बोलताना गावकरी व जावई मंडळींच्या सहकार्याने हया मंदिराची उभारणी झाली याबद्दल समाधान व्यक्त केले.
   यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बाळू महाराज कानडे, नामदेव महाराज कंधारकर,हभप कोंडीराम बाबा पेचे, सरपंच प्रकाश सोनटक्के,माजी सरपंच दादासाहेब कोकणे,बाबा कांगुणे,भानुदास रेडे,बाळासाहेब कोकणे, संभाजी ठाणगे,बाबा कांगुणे, माऊली पेचे,अनिल मारकळी,प्रभाकर दादा बोरकर,पोलीस पाटील दिलीप गायकवाड यांच्यासह जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य ग्रामस्थ सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना खंडेरायांना प्रिय असलेला वांग भरीत व भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात आला.

गावकऱ्यांच्या एकोप्याचे कौतुक
मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी कमी पडत असल्याने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन बोली पध्दतीने निवडणूक बिनविरोध केली ज्याला सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व्हायचे त्याने मंदिरास देणगी द्यावी असे जाहीर करण्यात आले त्यानंतर निवडणुक बिनविरोध करून सुमारे पंधरा लाखांचा निधी जमा झाला हे सर्व आदर्शवत काम गावकऱ्यांच्या एकोप्याने झाले असल्याने गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.व मंदिर पूर्ण केल्याबद्दल व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे यांना देखील धन्यवाद देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला.

रस्ता दुरुस्ती न केल्यास बांधकाम खात्याच्या कार्यालयात दशक्रिया विधी करणार - कमलेश नवले

नेवासा, प्रतिनिधी
नेवासाफाटा - शेवगांव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आसून रस्त्यात खड्डा की खड्ड्यातून रस्ता असा पेचप्रसंग निर्माण झालेला आसल्याने छञपती युवा सेनेचे प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता.बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे सोमवार (दि.२) रोजी सकाळी ९ वाजता छञपती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने चक्क बांधकाम खात्याचीच प्रेत याञा काढून बांधकाम खात्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रस्त्याच्या कडेलाच अग्नीडाव देवून अनोखे आंदोलन करण्यात आले.
  या आंदोलनाप्रसंगी नेवासा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब घुगरकर यांनी आंदोलन करर्त्यांना संयममाने आंदोलन करण्याची विनंती केली. हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे रस्त्यात अपघात होवून अनेकांना कायमचे अधू होण्याचे वेळ येत आसतांना बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आसल्याने वाहनधारकांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.छञपती युवा सेनेने याबाबत उपोषणाचे निवेदन देवूनही बांधकाम खात्याने दखल घेतली नाही त्यामुळे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक प्रेत याञा काढल्याने झोपलेल्या बांधकाम खात्याला जाग आली यावेळी आंदोलन कर्त्यांना रस्त्याचे काम करण्यात येईल असे लेखी पञ देण्यात आले.माञ छञपती युवा सेनेचे प्रदेश संघटक नवले म्हणाले की, सात दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर बांधकाम खात्याच्या कार्यालयातच दशक्रिया विधी करु असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.याप्रसंगी सरपंच शरद अरगडे,अक्षय बोधक,राहूल बोधक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

चांदेकसारे ( वार्ताहर ) 
कोपरगाव तालुक्यातील हॅरिसन ब्रँच शाळेत केंद्रस्तरीय मासिक शिक्षण परिषद केंद्रप्रमुख दिलीप ढेपले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.शिक्षण परिषदेची सुरुवात वळवी सर यांनी विपश्यनेबद्दल माहीती देऊन १०मिनिटे ध्यानधारणा घेऊन शिक्षकांची मनं एकाग्र केले व श्वासावर नियंत्रण कसे ठेवायचे?याबाबत सखोल माहीती दिली.तसेच शिष्यवृत्ती भाषा,गणित व इंग्रजी विषयांवर घटकनिहाय प्रश्नपत्रिकेचे स्वरुप समजून सांगण्यात आले.दिक्षाॲपचा अध्यापनात वापर कसा करावा याबद्दल प्रत्यक्ष ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून माहीती देण्यात आली.तसेच समृद्ध  ग्रंथालय,विज्ञान विषय व पुस्तक परिक्षण इ.तासिका घेऊन सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
  सदर परिषदेस गटशिक्षणाधिकारी पोपट काळे हजर होते.त्यांनी यावेळी केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन केले.यापुढे अधिकाऱ्यांची शाळातपासणी व  वर्गतपासणी ही सुलभकाच्या भूमिकेतून केली जाणार आहे असे सांगितले.तसेच त्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेला बसण्याची सर्व विद्यार्थ्यांना संधी देण्याचे आवाहन सर्व शिक्षकांना केले.सदर शिक्षण परिषदेत तज्ञ मार्गदर्शक म्हणूनअण्णा मोकळ  वळवी  कुळधरण व सचिन आढांगळे सर यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेचे कामकाज  सुधाकर निकुंभ,नवनाथ सुर्यवंशी व मनिषा शिंपी यांनी पाहिले.
मासिक शिक्षण परिषद चांदेकसारे केंद्रातील वेगवेगळ्या शाळांवर घेण्याचे सर्व मुख्याध्यापकांनी ठरवले होते.यावेळी हॅरिसन ब्रँच शाळेने शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.त्याबद्दल केंद्रातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

नगर - औरंगाबाद महामार्गावर तब्बल तीन तास वाहतूक ठप्प ! पोलिसांचे दुर्लक्ष ! 

नेवासा, प्रतिनिधी
नगर - औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे वाहतूक पोलिस नेमणूकीच्या ठिकाणी हजर नसल्याने रविवारी दुपारी तीन तास वाहतूक ठप्प झाली होती सुमारे पाच किलो मिटर लांबच लांब वाहनाच्यां रांगा लागलेल्या होत्या.अनेक वाहनधारकांनी नेवासा पोलिसांशी संपर्क साधला आसता नेवासा फाटा येथे नेमणूकीस आसलेले वाहतूक हवालदार बाहेर आहेत तर पोलिस निरिक्षक रणजित डेरे साप्ताहिक सुट्टीवर आसल्याचे सांगण्यात आले.
   नेमणूकीस आसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ठप्प झालेल्या वाहतूकीकडे दुर्लक्ष करुन वाहतूक नियंञनात न आणल्यामुळे महामार्गावर पाच किलो मिटर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.त्यामुळे वाहतूक ठप्प होवून वाहने जागेवर थांबल्यानंतर पोलिस कर्मचारी नेवासाफाटा येथे दाखल होवून वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी एक तासापासून प्रयत्न करुनही वाहतूक व्यवस्था सुरुळीत झाली नाही. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. नेवासा फाटा येथे वाहतूक ठप्प होण्याच्या घटना दैनंदिन बाब झाल्यामुळे नेमणूकीस आसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी वाहनधारकांतून व्यक्त केला जात आहे.


नेवासा, प्रतिनिधी
चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा रायांची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथे यात्रा भरत असून मंदिर जीर्णोद्धार झाल्याने नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि.२ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे यांनी दिली.चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा म्हाळसा मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या प्रेरणेने नेवासा बुद्रुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून चंपाषष्ठीच्या दिवशी दि.२ डिसेंबर रोजी खंडोबा म्हाळसा देवीसह,त्रैलोक्य स्वामी नारद मुनी, सच्चिदानंद बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे यानिमित्त यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन, सकाळी ६ ते ७ यावेळेत विष्णू सहस्त्रनाम,सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण दुपारी १२ ते २ भोजन महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ हरिकीर्तनाचे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
आज सोमवार दि.२ डिसेंबर रोजी चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा म्हाळसादेवी व सच्चिदानंद बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.चंपाषष्ठी निमित्ताने होणाऱ्या कालाकीर्तन कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे व नेवासा बुद्रुक ग्रामस्थ यांनी केले आहे.

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget