नामदार विखे पाटलांनी घेतले शनी दर्शन

मामा -भाच्यांनी केला शनीला अभिषेक 

शिंगणापुर :(सतिश टेमक)
राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी  शनीदेवाला तेलाचा अभिषेक केला.  आज मंगळवार दि.5/11/2019 सायंकाळी  शिंगणापुरला आले होते.ना.विखे हे सायंकाळच्या आरती साठी उपस्थित राहून शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी भाचे युवराज नरवडे हेही बरोबर होते.
शिंगणापुरला मामा -भाच्याच्या अभिषेकाला विशेष महत्व आहे.योगायोगाने भाचे ही बरोबर असल्यामुळे  
शनिदेवाला तेल अभिषेक करण्याचा योग साधत मामा-भाच्यांनी अभिषेक केला.

यावेळी त्यांनी देवस्थान परिसरात झालेल्या विकास कामांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. यावेळी शनैश्वर देवस्थान कार्यालयात विश्वस्त आदिनाथ शेटे व  आप्पासाहेब शेटे यांनी शाल ,श्रीफळ व  प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी शांतीलाल आहेर,विश्वस्त नितीन शेटे, शालिनी राजू लांडे, पोलीस पाटील सयराम बानकर, शकील बागवान आदी उपस्थित होते.

राजकिय साडेसातीतुन पुजा?
नगर जिल्ह्यात भाजपाची पिछेहाट झाल्यामुळे पराभुत उमेद्वारांनी पराभवाचे खापर  विखेवर फोडले.यामुळे
ना.विखे सध्या राजकिय साडेसातीत सापडल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. शनी देवाला मामा भाच्याच्या  अभिषेकाला विशेष महत्व आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget