पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव परीसरात शेवगाव मतदारा संघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आ.मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी मोटार सायकल रॅली काढण्यात आली.यावेळी स्व.राजीव राजळे यांचे चिरंजीव व आ.मोनिका राजळे यांचा मोठा मुलगा कृष्णा राजळे याने यावेळी आपल्या आईच्या प्रचारात सक्रिय होवून रॅलीत सहभागी होवून परीसरातील मतदाराशी संवाद साधला.त्याने ऑस्ट्रेलिया देशात आर्किटेक्चर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे.दोन दिवसांपूर्वी तो ऑस्ट्रेलियातून परत आला आहे.
यावेळी मतदाराकडून त्याला चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. रॅलीला सुरवात कासार पिपंळगाव गावातून होवून परीसरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.यावेळी परीसरातील तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.या रॅलीत जि.प.सदस्य राहुल राजळे,कृष्णा राजळे,ज्येष्ठ नेते विष्णूपंत अकोलकर तसेच परीसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी,पदाधिकारी सहभागी झाले होते.

إرسال تعليق