سبتمبر 2019

पुढचा मुख्यमंत्री आघाडी सरकारचा आ, थोरात 

संगमनेर (प्रतिनिधी) 
राज्याची जबाबदारी सांभाळत असतांनाच आ. थोरातांनी आपल्या मतदारसंघात पकड मजबूत करत आपला उमेदवारी अर्ज सोमवारी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला, 
संगमनेर येथे प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता अर्ज भरला ,यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ.सुधीर ताजे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे, जिल्हा, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळूके, कांचनताई थोरात , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात,माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, उद्योगपती मनिष मालपाणी,माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, दिलीप पुंड,आदिसह पदाधिकारी उपस्थित होते. पितृपक्ष संपताच सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी व युतीची चर्चा सुरू असून काँग्रेसनेही पक्षाच्या उमेदवाराची यादी रविवारी जाहीर केली होती, त्यात प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांचे सह एकूण 51उमेदवारांचा समावेश  होता,यामुळे या उमेदवारांनी  मुहुर्त पाहुन आपला भरण्यावर भर दिला आहे, दिवस थोडेच राहील्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे, राज्यात उमेदवार निवडीवर चर्चा अंतिम टप्प्यात आहे, आ. थोरात राज्याची जबाबदारी सांभाळत असतांनाच आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी आर्वजून उपस्थित होते, आ. थोरातांच्या शिवाजी नगर येथील निवासस्थाना पासुन ,जाता राजा मार्ग, नवीन नगर रोड प्रांताधिकारी कार्यालय असे जात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले, घराघरात बाळासाहेब थोरात अशा घोषणा देण्यात आल्या, निवासस्थानी झालेल्या सभेत माणिकराव ठाकरे म्हणाले युती शासनाने जनतेची दिशाभूल करणारे निर्णय घेतले आहे, हे सरकार उलथून टाकण्याची संधी मिळाली आहे, थोरात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असून मुख्यमंत्री आमचाच होणार आहे, राज्यावर कर्ज डोंगर आहे  संधी पुन्हा येणार नाही, यावेळी हजारोंच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते,

प्रश्नांच्या सोडवणूकीकरीता महाराष्ट्राला शंकरराव गडाखांच्या रूपाने नेवासा तालुक्याची ताकद दाखवून दया- यशवंतराव गडाख

नेवासा(प्रतिनिधी)
क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून शंकरराव गडाख यांनी सोमवारी शक्तीप्रदर्शन करत नेवासा तहसील कचेरीवर जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.प्रश्नांच्या सोडवणूकीकरीता महाराष्ट्राला शंकरराव गडाखांच्या रूपाने नेवासा तालुक्याची ताकद दाखवून दयावी असे आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या अगोदर नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्याकार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी बोलतांना केले.
यावेळी राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख हे अध्यक्षस्थानी होते तर जेष्ठ नेते विश्वासमामा गडाख ,माजी आमदार शंकरराव गडाख, प्रशांतभाऊ गडाख,जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, तुकाराम शेंडे,जबाजी फाटके,भाऊसाहेब मोटे,भैय्यासाहेब देशमुख, तुकाराम नवले,प्राचार्य आगळे  सर,डॉ.अशोकराव शिंदे,मच्छिंद्र हापसे,नानासाहेब रेपाळे,कारभारी जावळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,अतुल महाराज आदमने, रोहिदास लंघे, रामभाऊ केंदळे, व्यापारी अशोकलाल गुगळे,अशोक तांबे सर,ज्ञानदेव आरगडे,अनिल मते, नगरसेवक लक्ष्मणराव जगताप व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक करून सद्याची नेवासा तालुक्याची सुरू असलेली दैना व विद्यमान प्रतिनिधीनी लोकांची केलेली दिशाभूल,गडाख यांच्यावर होत असलेले खालच्या पातळीवरील आरोप या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून एकच निर्धार ..शंकरराव गडाख ... आमदार... हा नारा दिला.शंकरराव गडाख  आगे बढो..हम तुम्हारे साथ है..अशा घोषणा दिल्या त्याला उपस्थित युवकांनी दाद दिली.
यावेळी विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे चुलत बंधू संभाजी मुरकुटे यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला शंकरराव गडाख यांनी त्यांचा सत्कार करून आलिंगन देऊन  त्यांचे स्वागत केले तर असंख्य युवकांनी यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना माजी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की नेवासा तालुक्याच्या विकासासाठी मी या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय जुगार खेळत आहे गेल्या पाच वर्षात नेवासा तालुक्याचा विकास झाला नाही त्यामुळे शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे प्रचंड नुकसान झाले त्यास सद्याचे लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी आमदार मुरकुटे यांचे नाव न घेता केला.धरणात पाणी असताना देखील नेवासा तालुक्यातील ८० गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला हे दुर्दैव होते असे सांगून लोकप्रतिनिधीने काढलेल्या विकास रॅलीत वाळूवाले व ठेकेदारांचा सहभाग होता अशी टीका त्यांनी यावेळी बोलतांना केली.
जेष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले की कोणत्याही पक्षाचा आधार न घेता नेवासा तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उभे रहात आहे हे धाडस त्यांनी दाखवले असून कोणीही त्यांच्या प्रचारासाठी येथे येणार नाही मात्र.. शंकरराव..डरो मत मै हू ना..अशी भावनिक साद घालत त्यांनी शंकरराव गडाख यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न यावेळी बोलतांना केला.
तसेच नेवासा तालुक्याचा विकास विचार व संघटनेच्या ताकदीच्या जोरावर या निवडणुकीत विजय ओढून आणू मात्र भिस्त कार्यकर्त्यांवरती असल्याने सर्वांनी आपली ताकद पणाला   लावून तुम्ही आमची दिवाळी चांगली करा असे आवाहन यशवंतराव गडाख यांनी यावेळी केले.
यावेळी झालेल्या मेळाव्यात बहिरवाडी येथील हभप रामनाथ महाराज पवार,शरदराव आरगडे,संभाजी मुरकुटे, सुहास गोंटे,अनिल मते,यांनी मनोगत व्यक्त केले.जेष्ठ विधी तज्ञ अँड.के.एच. वाखुरे व सुभाष राख यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.तर युवा नेते प्रशांतभाऊ गडाख यांनी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद गटवाईज मताधिक्य वाढवा तनमनएकाग्र करून स्व:तच्या ताकदीने काम करा असे आवाहन करून उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मेळाव्यानंतर वाजत गाजत मंगल कार्यालयाच्या प्रांगणातून शक्ती प्रदर्शन करत मुख्य रस्त्यावरून घोषणा देत शंकरराव गडाख हे सर्व कार्यकर्त्यांसह नेवासा तहसील कचेरीवर गेले व अर्ज दाखल केला.यावेळी नागरिक व सर्व कार्यकर्ते हे स्वयंस्फूर्तीने शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते.झालेल्या शक्तिप्रदर्शनाने रस्ते गर्दीने फुलून गेले होते त्यामुळे नेवासकर ही आकर्षित झाले होते.

रोहित पवारांचा पालकमंत्री राम शिंदेवर जोरदार पलटवार

सत्तार शेख | जामखेड 
सरपंच परिषदेच्या वतीने आयोजीत महामेळाव्यात पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे नाव न घेता बाहेरचे सावज टप्प्यात आले आहे आता शिकार तर मीच करणार अशी भिष्मगर्जना दोन दिवसांपूर्वी जामखेडच्या सभेत केली होती. यावर रोहित पवारांनीही राम शिंदेंचे नाव न घेता फेसबुक पोस्टद्वारे त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्याच गोष्टी करतो अशी पोस्ट करून जोरदार पलटवार केला. 

सरपंच परिषदेत काय म्हणाले होते राम शिंदे ? 
पाच वर्षात मंत्रीपदाच्या माध्यमांतून काम करताना विरोधकांचीही कामे केली. कुठलाही भेदभाव केला नाही. विकासकामांच्या झंझावातापुढे मतदारसंघात माझ्याविरोधात स्थानिक   उमेदवार विरोधक देऊ शकले नाहीत. असे सांगत आमचे नेते कै गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास देणार्या बारामतीकरांचा बदला घेण्याची संधी मी सोडणार नाही कारण माझ्या मतदारसंघात बाहेरची शिकार चालून आली आहे. टप्प्यात आलेल्या सावजाची शिकार मी करणारच अशी भिष्मगर्जना करून पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी आक्रमक भूमिका मांडत मतदारसंघात विधानसभेची लढत जश्यास तशी होणार असल्याचे संकेत दिले होते. 

राम शिंदेंच्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवारांनी राम शिंदेच्या वक्तव्याचा फेसबुक पोस्टद्वारे जोरदार समाचार घेतला. रोहित पवारारांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी - रोहित पवार म्हणतात " काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीला शिकारीची हौस आलेली. आपल्या घरचं जनावर मरायला लागलं तर त्याला पाहूण्याच्या दारात नेऊन दावणीला बांधायचा सल्ला देणारेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात.
असो, त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्या गोष्टी करतो."



रोहित पवारांचा आज रविवारी वाढदिवस आहे. वाढदिनाच्या दिवशी रोहित पवारांची राम शिंदेंचे नाव घेता त्यांनी सरपंच परिषदेने आयोजित केलेल्या महामेळाव्यातील वक्तव्यावर केलेला पलटवार दिवसभर सोशल मिडीयात चर्चेत होता. आता राम शिंदे रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टमधील वक्तव्याचा काय समाचार घेणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

मुरुमाच्या ऐवजी माती टाकल्याने नागरीकांतून संताप ! 

नेवासा,(प्रतिनिधी) 
नेवासा फाटा येथील मक्तापूर  रस्त्याच्या कडेला आसलेल्या आंबेडकर नगर वसाहतीमध्ये दोन चार दिवस सतत झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्याची पुरती वाट लागली आसून रस्ते दुरुस्तीसाठी मुरुमा ऐवजी माती टाकल्यामुळे रस्त्यावरुन नागरीकांना चालणेही मोठी मुश्कील बाब झाली आहे रस्तावर मुरुमा ऐवजी माती टाकण्याचा प्रताप करण्यात आला आहे.
  या आंबेडकर नगर वसाहतीच्या जिल्हा परिषद शाळेजवळच खड्डा खोदून दुरावस्था झालेल्या दलदलीच्या रस्त्यावर माती टाकण्यात आल्यामुळे आंबेडकर नगर वसाहतीच्या नागरीकांना रस्त्यावरुन चालणेही मुश्कील बाब बनली आसून रस्त्यावर मुरुमाऐवजी माती टाकण्यास कोणी "राजमान्यता" दिली असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळच जेसीबीच्या सहाय्याने मोठे खड्डे करुन दलदलीच्या रस्त्यावर माती टाकण्यात आली आहे.तर दुसरीकडे शाळेतील विद्यार्थ्यांनाही या खड्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
  मुरुमा ऐवजी रस्त्यावर माती टाकण्यास कोणी राजमान्यता दिली.असा सवाल अंबादास विटकर यांनी उपस्थित करुन गोरगरीबांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगून दिवसा ढवळ्या मुरुमाऐवजी माती टाकून आगीत तेल ओतण्याचा प्रताप करण्यात आला आसल्याचे विटकर यांनी केला आहे. या रस्त्यावर मुरुमा ऐवजी माती कोणी टाकली असे विचारले आसता ग्रामपंचायतने टाकल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आसता ते नॉट रिजेबल आसल्याने संपर्क होवू शकला नाही.

नेवासा 
नेवासा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुर्गादेवी मंदिरातील दुर्गा भवानी ज्योतीचे नेवासा येथे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत मोहटादेवी गडावरून दुर्गाभक्तांनी ही ज्योत आणली.या ज्योतीचे फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.
यावेळी नेवासा शहरातील विविध तरुण मंडळांच्या वतीने मोहटादेवी गडावरून ज्योती आणण्यात आल्या. नेवासा येथील श्री मळगंगा देवी मंदिरात देवीभक्त रेणुकादास घोलप व सौ.सुमनताई घोलप,रामभाऊ घोलप,सौ.ज्योती घोलप यांनी स्वागत केले तर एस.टी. स्टँड मध्ये ज्योत आल्यानंतर मार्केट कमिटीचे माजी सहसचिव बाळासाहेब पारखे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आढाव,प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे,अभिषेक गाडेकर,शिवसेनेचे राजेंद्र काळे, अँड.बाळासाहेब कराळे, अंबादास लष्करे,पिंटु जिरे,जालिंदर गवळी,कृष्णा परदेशी, यांनी दुर्गाभवानी ज्योतीचे पुष्पहार घालून स्वागत केले.
या दुर्गाभवानी ज्योतीचे दुर्गादेवी मंदिरात आगमन झाल्यानंतर मंदिर जेष्ठ पत्रकार रामभाऊ पठाडे,विश्वस्त सुधीर जामदार, सुधीर चव्हाण,राजेंद्र पठाडे, विलास शिंदे,देवभक्त पुजारी सुभाष चव्हाण यांनी स्वागत केले नमापाटील कडू यांनी स्वागत केले तर सुवासींनीनी पंचारती ओवाळून ज्योतीचे दर्शन घेतले.
नेवासा शहरातील दुर्गादेवी तरुण मंडळ,शिवएकता तरुण मंडळ,श्रीकृष्ण तरुण मंडळ,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान,श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळ,संत सावता युवक मंडळ यांच्या वतीने काढण्यात आलेल्या ज्योतीचे ही दुर्गादेवी मंदिरात स्वागत करण्यात आले.घटस्थापना प्रसंगी युवकांचा उत्साह मोठया प्रमाणात दिसून येत होता त्यामुळे नेवासा नगरीतील वातावरण दुर्गामय बनले होते.दुर्गादेवी मंदिरात बाळासाहेब पारखे यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

कपाशी कीड व नियंत्रण याविषयी मार्गदर्शन 

नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील माळेवाडी खालसा येथील मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या फॉर्मवर आयोजित कृषी विषयक मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी कपाशी कीड व नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
राशी सिड्स कंपनी यांच्या वतीने यावेळी झालेल्या कृषी मार्गदर्शन शिबीर प्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी लक्ष्मण सुडके,राशी सिडस कंपनीचे राम जाधव,श्री उकिरडे,निखिल नागे, प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी सरपंच राहुल पाटील,महेश कोठारी,कैलास डावखर, संजय ललवाणी,माजी सरपंच मुरलीधर खेमनर, बाळासाहेब कदम,माधवराव शिंदे,मोहनराव पवार, सत्यवान मोहन,शंकरराव पाटोळे प्रमुख म्हणून उपस्थित होते तर प्रवरासंगमचे सरपंच सुनील बाकलीवाल मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचे प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील यांनी स्वागत केले.यावेळी अमोल पाटील गणेश पाटील योगेश पाटील,माजी सरपंच राहुल पाटील
यांनी राशी सिडस कंपनीच्या लावलेल्या कपाशी पिकाची पहाणी केली तसेच दमदार कपाशी आढळून आल्याने कंपनीच्या वतीने कृषी विभागाचे अधिकारी लक्ष्मण सुडके यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी झालेल्या मेळाव्यात कृषी विभागाचे अधिकारी लक्ष्मण सुडके यांनी पीकावरील कीड नियंत्रणाबाबत कमी खर्चात घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.यावेळी अद्रक व कपाशीची पहाणी करून त्यांनी उपस्थित प्रगतिशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पाटील परिवाराच्या वतीने राशी सिडस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा व कृषी अधिकारी लक्ष्मण सुडके यांचा सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.उपस्थित शेतकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.तर मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
न्यु इंग्लिश स्कूल कवडदरा विद्यालयातील  कला शिक्षक श्रीराम शंकर लोहार यांना प्रा.मा.य.गोडबोले   उपक्रमशील विज्ञान शिक्षक  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्याबद्दल  भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी  नलगे,सचिव श्री प्रकाशराव जाधव, तसेच सर्व संचालक व कवडदरा विद्यालयाचे प्राचार्य कचेश्वर मोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी सारख्या दुष्काळी तालुक्यात बांधकाम व्यवसायात गगन भरारी घेणाऱ्या नितीन एडके या २४ वर्षीय युवा व्यावसायिकाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला.इंटरनॅशनल बिझनेस कॉन्फरन्स दुबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा युवा बांधकाम व्यावसायिक २०१९ हा पुरस्कार नितीन एडके यांना प्रदान करण्यात आला.
दुबई येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात एडके यांना बक्षिस व सन्मानपञ देऊन सत्कार करण्यात आला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा व्यावसायिकांना या समारंभात सन्मानित करण्यात आले.दुबई येथील नामाकींत व्यावसायिक दिनेश प्रधान यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी शिवव्याख्याते प्रा.नामदेव जाधव,दिलीप ठाणेकर,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन एडके यांना वडीलोपार्जित पाच एकर जिरायती शेती आहे.तालुक्यात सतत असलेल्या दुष्काळाच्या छायेमुळे शेतीच्या जीवावर उपजिवीका करणे कठीण होते.बांधकाम व्यावसायात मोलमजुरी करुन त्यांनी बांधकाम व्यावसायाचे रोपटे लावले.मुलगा नितीन याला सिव्हिल इंजिनियर बनवले.तर एक मुलगा भारतीय नौदलात देशसेवा करत आहे.वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी नितीन यांनी ए.एन.गृप ऑफ बांधकाम व्यावसायिक कंपनीची स्थापना केली.ग्राहकांचा विश्वास हाच प्रगतीचा मार्ग या तत्वावर काम केले.थोड्याच कालावधीत हा व्यवसाय मोठ्या शहरात जाऊन पोहचला आहे.शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.युवकांनी परीस्थीतीवर रडण्यापेक्षा नवनवीन कल्पना आखून व्यवसाय करायला हवा.नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असा संदेश एडके देतात.

चांदेकसारे (वार्ताहर )
ग.र.औताडे विद्यालयामध्ये कर्मवीर जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी रयतशिक्षणसंस्थेच्या मँनेजिंग कौंन्सिल सुजाता पोखरकर होत्या प्रमुख पाहुणे लक्ष्मण कोल्हे होते. जयंती निमित्ताने रांगोळी स्पर्श वकृत्वस्पर्धा निबंध स्पर्धा गायनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थांना एस आर आंबिलवादे यांचे हस्ते पारीतोषिके वाटण्यात आली. 
वृक्षवेध फाऊंडेशन अंजनापुर यांचे वतीने शाळेच्या परीसरात ७१विविध प्रकाराचे वृक्षारोपन करण्यात आले फाऊंडेशनच्यावतीने खते व संगोपनाचा खर्च देण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य आर.जी.गमे यांनी सदस्यांचा सन्मान केला.कार्यक्रमाचे प्रास्तविक आर जी गमे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे स्थानिक स्कुल कमेटी तसेच  जनरल बाँडी सदस्य सर्व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते सुञसंचलन आर एस देव्हारे यांनी केले बी.ए,बांगर यांनी आभार मानले.

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget