माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्याच गोष्टी करतो

रोहित पवारांचा पालकमंत्री राम शिंदेवर जोरदार पलटवार

सत्तार शेख | जामखेड 
सरपंच परिषदेच्या वतीने आयोजीत महामेळाव्यात पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे नाव न घेता बाहेरचे सावज टप्प्यात आले आहे आता शिकार तर मीच करणार अशी भिष्मगर्जना दोन दिवसांपूर्वी जामखेडच्या सभेत केली होती. यावर रोहित पवारांनीही राम शिंदेंचे नाव न घेता फेसबुक पोस्टद्वारे त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्याच गोष्टी करतो अशी पोस्ट करून जोरदार पलटवार केला. 

सरपंच परिषदेत काय म्हणाले होते राम शिंदे ? 
पाच वर्षात मंत्रीपदाच्या माध्यमांतून काम करताना विरोधकांचीही कामे केली. कुठलाही भेदभाव केला नाही. विकासकामांच्या झंझावातापुढे मतदारसंघात माझ्याविरोधात स्थानिक   उमेदवार विरोधक देऊ शकले नाहीत. असे सांगत आमचे नेते कै गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास देणार्या बारामतीकरांचा बदला घेण्याची संधी मी सोडणार नाही कारण माझ्या मतदारसंघात बाहेरची शिकार चालून आली आहे. टप्प्यात आलेल्या सावजाची शिकार मी करणारच अशी भिष्मगर्जना करून पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी आक्रमक भूमिका मांडत मतदारसंघात विधानसभेची लढत जश्यास तशी होणार असल्याचे संकेत दिले होते. 

राम शिंदेंच्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवारांनी राम शिंदेच्या वक्तव्याचा फेसबुक पोस्टद्वारे जोरदार समाचार घेतला. रोहित पवारारांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी - रोहित पवार म्हणतात " काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीला शिकारीची हौस आलेली. आपल्या घरचं जनावर मरायला लागलं तर त्याला पाहूण्याच्या दारात नेऊन दावणीला बांधायचा सल्ला देणारेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात.
असो, त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्या गोष्टी करतो."



रोहित पवारांचा आज रविवारी वाढदिवस आहे. वाढदिनाच्या दिवशी रोहित पवारांची राम शिंदेंचे नाव घेता त्यांनी सरपंच परिषदेने आयोजित केलेल्या महामेळाव्यातील वक्तव्यावर केलेला पलटवार दिवसभर सोशल मिडीयात चर्चेत होता. आता राम शिंदे रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टमधील वक्तव्याचा काय समाचार घेणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget