पुढचा मुख्यमंत्री आघाडी सरकारचा आ, थोरात
संगमनेर (प्रतिनिधी)
राज्याची जबाबदारी सांभाळत असतांनाच आ. थोरातांनी आपल्या मतदारसंघात पकड मजबूत करत आपला उमेदवारी अर्ज सोमवारी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला,
संगमनेर येथे प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता अर्ज भरला ,यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ.सुधीर ताजे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे, जिल्हा, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळूके, कांचनताई थोरात , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात,माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, उद्योगपती मनिष मालपाणी,माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, दिलीप पुंड,आदिसह पदाधिकारी उपस्थित होते. पितृपक्ष संपताच सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी व युतीची चर्चा सुरू असून काँग्रेसनेही पक्षाच्या उमेदवाराची यादी रविवारी जाहीर केली होती, त्यात प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांचे सह एकूण 51उमेदवारांचा समावेश होता,यामुळे या उमेदवारांनी मुहुर्त पाहुन आपला भरण्यावर भर दिला आहे, दिवस थोडेच राहील्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे, राज्यात उमेदवार निवडीवर चर्चा अंतिम टप्प्यात आहे, आ. थोरात राज्याची जबाबदारी सांभाळत असतांनाच आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी आर्वजून उपस्थित होते, आ. थोरातांच्या शिवाजी नगर येथील निवासस्थाना पासुन ,जाता राजा मार्ग, नवीन नगर रोड प्रांताधिकारी कार्यालय असे जात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले, घराघरात बाळासाहेब थोरात अशा घोषणा देण्यात आल्या, निवासस्थानी झालेल्या सभेत माणिकराव ठाकरे म्हणाले युती शासनाने जनतेची दिशाभूल करणारे निर्णय घेतले आहे, हे सरकार उलथून टाकण्याची संधी मिळाली आहे, थोरात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असून मुख्यमंत्री आमचाच होणार आहे, राज्यावर कर्ज डोंगर आहे संधी पुन्हा येणार नाही, यावेळी हजारोंच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते,

إرسال تعليق