चांदेकसारे (वार्ताहर )
ग.र.औताडे विद्यालयामध्ये कर्मवीर जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी
रयतशिक्षणसंस्थेच्या मँनेजिंग कौंन्सिल सुजाता पोखरकर होत्या प्रमुख
पाहुणे लक्ष्मण कोल्हे होते. जयंती निमित्ताने रांगोळी स्पर्श
वकृत्वस्पर्धा निबंध स्पर्धा गायनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच गुणवंत
विद्यार्थांना एस आर आंबिलवादे यांचे हस्ते पारीतोषिके वाटण्यात आली.
वृक्षवेध
फाऊंडेशन अंजनापुर यांचे वतीने शाळेच्या परीसरात ७१विविध प्रकाराचे
वृक्षारोपन करण्यात आले फाऊंडेशनच्यावतीने खते व संगोपनाचा खर्च देण्यात
आला विद्यालयाचे प्राचार्य आर.जी.गमे यांनी सदस्यांचा सन्मान
केला.कार्यक्रमाचे प्रास्तविक आर जी गमे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे
स्थानिक स्कुल कमेटी तसेच जनरल बाँडी सदस्य सर्व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित
होते सुञसंचलन आर एस देव्हारे यांनी केले बी.ए,बांगर यांनी आभार मानले.

Post a Comment