November 2019

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्च प्रांगणात असलेल्या मतमाऊली यात्रेनिमित्त नेवासा शहरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे सर्वंधर्मीय बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात
आले.शनिवारी दि.३० नोव्हेंबर रोजी झालेल्या यात्रेनिमित्ताने नेवासकर नागरिकांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या.
शनिवारी दि.३० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमाऊली यात्रेनिमित्त सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत आराधना व आरोग्य दानाची प्रार्थना करण्यात आली.या प्रार्थना सभेत आजारी असलेल्या व दुःखी कष्टी लोकांसाठी प्रार्थना करण्यात आली.सायंकाळी ४ वाजता पवित्र मतमाऊली मातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.ज्ञानमाऊली मंदिर चर्च पासून फादर प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला या मिरवणुकीत महिला व पुरुष भाविकांनी प्रभू येशू ख्रिस्त व पवित्र मारिया मातेची भजने गायली. मिरवणुकीचा समारोप ज्ञानमाऊली चर्च प्रांगणात झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता नाशिक धर्मप्रांताचे प्रमुख रेव्हरंट बिशप लुर्ड्स डॅनियल व नाशिक येथील व्हीकर जनरल यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेची पवित्र मिस्सा बलिदान हा धार्मिक विधी झाला 
यात्रेनिमित्त अनेकांनी येथे येऊन बिशप लुर्ड्स डॅनियल व नाशिक येथील व्हीकर जनरल फादर प्रकाश राऊत यांचा सत्काराद्वारे गौरव केला.
सर्वांच्या सुखकरिता व चांगल्या आरोग्य व देशाच्या एकता व अखंडतेसाठी ही यावेळी प्रमुख धर्मगुरूंनी प्रार्थना केली.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.उपस्थित भाविकांनी मतमाऊली यात्रेच्या निमित्ताने मतमाऊलीच्या डोंगरावर जाऊन दर्शन घेतले तसेच मेणबत्या जाळून मतमाऊलीला प्रार्थना केली. यात्रेनिमित्त दि.२७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या तीन दिवस चाललेल्या त्रिदिनी भक्ती सोहळयाला भाविकांनी सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.रविवारी दि.१ डिसेंबर रोजी फादर प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या पवित्र मिस्सा बलिदानाच्या धार्मिक विधीने यात्रा सोहळयाची सांगता करण्यात आली.

नेवासा, प्रतिनिधी
श्रीरामपूर सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश अनुसया पाटील यांनी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट देऊन पैस खांबाचे दर्शन घेतले.या भेटीप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
   यावेळी नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात आगमन झाल्यानंतर नेवासा वकील संघाच्या वतीने अँड.मयूर कारभारी वाखुरे व अँड.सोनल मयूर वाखुरे-पाटील यांनी सहकार न्यायाधीश अनुसूया पाटील यांचे स्वागत केले.यावेळी अँड.सोनल वाखुरे पाटील यांनी शाल घालून तर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी श्रीफळ प्रसाद देऊन न्यायाधीश अनुसूया पाटील यांचा सत्कार केला.
         यावेळी संत सेवक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचनास्थान व पैस खांबाचे महत्व खांबासाठी मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांचे येथील कार्य याविषयी माहिती दिली.विश्वाची माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मभूमीला भेट दिल्याने मनाला समाधान मिळून आत्मिक शांती मिळाली असल्याचे न्यायाधीश पाटील यांनी सांगितले.
       यावेळी रामायणाचार्य ह.भ.प.नंदकिशोर महाराज खरात,ह.भ.प.सचिन महाराज पवार,संत सेवक जगन्नाथ पाटील,सौ.पदमावती पाटील,श्रीधर पाटील,मंदिर व्यवस्थापक भगवानराव सोनवणे,आप्पा महाराज होन, संदीप आढाव उपस्थित होते

नेवासा, प्रतिनिधी
भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्तजयंती सोहळयास दि.५ डिसेंबर पासून प्रारंभ होत असून दि.१२ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या श्री दत्तजन्म उत्सव सोहळयाची श्री क्षेत्र देवगड येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे.या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री दत्तजन्माचा मुख्य सोहळा बुधवार दि.११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता साजरा होणार असल्याची माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
         श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे निर्माते श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेल्या व महाराष्ट्रासह देशामध्ये प्रसिद्ध झालेल्या श्री दत्त जन्माचा सोहळा हा वैभवशाली पद्धतीने देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरी  महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो.
    यावर्षी या  सोहळयास गुरुवार दि.५ डिसेंबर पासून सुरुवात होत आहे यानिमित्ताने पहाटे ४ ते ४.३० मंगल वाद्य सनई, चौघडा वादन,४.३० ते ६.३० काकडा भजन व श्रींची प्रात:आरती,सकाळी ६.३० ते ७.३० दर्शन प्रदक्षिणा ७.३० ते ८.३० गीतापाठ व विष्णू सहस्त्रनाम,९ ते ११ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १ ते ३ यावेळेत
समयानुसार आलेल्या गुणवंतांचे कार्यक्रम, तसेच ३ ते ५ यावेळेत पुन्हा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ७ यावेळेत हरिपाठ व श्रींची सायंम आरती दर्शन, तर रात्री ८.३० ते १०.३० यावेळेत कीर्तन होणार असून त्यामध्ये खोकर येथील हभप सेवानाथ महाराज,आळंदी येथील हभप श्रीनिवास महाराज,माऊली महाराज कदम, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे हभप शिवाजी महाराज देशमुख,वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील हभप चंदीले नाना महाराज,परळी येथील हभप केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनांचा यात समावेश आहे.
         बुधवार दि.११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता देवगडच्या मंदिर प्रांगणात भगवान दत्तात्रयांचा दत्त जन्म सोहळा हजारो भाविक व संत महंतांच्या  उपस्थितीत व प्रवरामाईच्या साक्षीने साजरा होणार आहे गुरुवारी दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० यावेळेत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने आठ दिवस चाललेल्या श्री दत्तजन्म उत्सव सोहळयाची सांगता होणार आहे.यानिमित्ताने भाविकांनी कीर्तन श्रवणाचा व होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
चौकट:-दत्तजयंती सोहळयाची जय्यत तयारी सुरू
आठ दिवस चालणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळयाची मंदिर प्रांगणात जय्यत तयारी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आदी धार्मिक कार्यक्रम जेथे होणार आहे तो ज्ञानसागर सभामंडप सुशोभित करण्यात आला आहे.मंदिर प्रांगणाबाहेर यात्रेनिमित्त येणाऱ्या अनेक दुकानदारांना जागेची व्यवस्था करून उपलब्ध करून देण्यात आली आहे.मंदिर परिसर मंगलमय होण्यासाठी परिसर देखील सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व चांदा गावचे रहिवाशी गोविंदराव आनंदराव  शेटे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.
   कै.गोविंदराव शेटे यांच्या पच्यात तीन मुले,एक मुलगी, सूना,नातवंडे असा परिवार आहे.गोविंदराव शेटे उर्फ दादा हे प्रगतशील शेतकरी व कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. अत्यंत  काटकसरी,सचोटी,चोखंदळ,व्यवहारातील बारकावे याविषयी ते आयुष्यभर सजग राहिले.त्यांच्या या गुणांचा निच्छितचं संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानला फायदा झाला.गुरुवर्य बन्सीबाबांच्या विचारांवर  निरपेक्ष व निस्वार्थपणे त्यांनी सेवा केली व  मंदिरावर शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम केले होते.अंत्यसंस्कार समयी कै.गोविंदराव शेटे यांना संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व विविध संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथील तरुण ग्रामस्थ  एक लग्न एक वृक्ष राबवत असलेल्या उपक्रमात पोलिस निरीक्षक  मा.पवार साहेब,माजी.पी.एस.आय.
मुक्ताजी भगत, 
ग्रामसेवक प्रमोद म्हस्के  यांच्या उपस्थितीत नव वधूवर सतिष व अर्चना जगताप व सुधीर व श्वेता गायकवाड, या दोन वधू वर दाम्पत्य यांनी अनावश्यक खर्च टाळून गावातील मंदीर परीसरात संरक्षित जाळ्यासहीत वृक्षारोपण नववधूच्या हस्ते करण्यात आले.
सुमारे एक वर्षापासून गावातील तरुण व ग्रामस्थ तसेच व्यसनमुक्त युवक संघाचे सदस्य सुखदेव मुरलीधर म्हस्के तसेच युवक मिञ
बंडातात्या कराडकर यांच्या सहकार्याने उपक्रम राबवत आहेत.या उपक्रमात नववधू दाम्पत्य यांच्या हस्ते गावात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचे वृक्षारोपण केले जात आहे.या उपक्रमाला परीसरातून चांगला प्रतिसाद मिळत असून कौतुक केले जात आहे.यामुळे गावाचा परीसर हिरवागार व निसर्गरम्य होणार आहे.यावेळी अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण केलेल्या   नव वधू वर दाम्पत्यांचे अभिनंदन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी आर.वाय.म्हस्के, विक्रम राजळे,आबासाहेब म्हस्के,गणेश भगत,संदिप राजळे, नववधू दाम्पत्यांचा परीवार तसेच गावातील तरुण ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेवासा, प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ देवून हिंदुत्वाचा नारा ज्वलंत ठेवण्यासाठी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांना विधान परिषदेवर घेवून त्यांना लाल दिवा मिळाल्यास पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात शिवसैनिकांना ताकद मिळून सेनेचा झांजावात कायम ठेवण्यासाठी राठोड यांचे राजकिय पुर्नवसन करण्याची मागणी नेवासा तालूक्यातील शिवसैनिकांनी केली आहे.
  नगर जिल्ह्यात शिवसेनेचे नांव आले की,समोर अनिल राठोड नगर जिल्ह्यात दिसतात.हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा हुक्कमी एक्का म्हणून जिल्ह्यात राठोड त्यांच्याकडे पाहीले जाते. शिवसैनिकांना न्याय देणारे ते आसून महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंञी झालेले आसतांना सेनेचा आवाज जिल्ह्यात दबलेला आसून राठोड यांच्या रुपाने त्यांना न्याय दिल्यास शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आसून जिल्ह्यात सेनेचा आवाज वाढविण्यासाठी राठोड यांना विधान परिषदेवर घेवून शिवसेना जिल्ह्यात नव्या जोमाने उभा राहणार आसल्याचेही शिवसैनिकांतून बोलले जात आहे.

नेवासा, प्रतिनिधी
जेव्हा सर्व नागरिक मूलभूत अधिकारांसह मूलभूत कर्तव्याचे पालन करू लागतील तेव्हा खरा संविधान दिन साजरा होईल असे प्रतिपादन नेवासा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम. बेलकर यांनी केले. 
        नेवासा न्यायालयात आयोजित संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दुसरे जिल्हा व अति. सत्र न्या. एस एम तापकीरे, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. बी यु चौधरी, दुसरे वरिष्ठ स्तर तथा मुख्य दंडाधिकारी जे आर मुलाणी, तिसरे वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. श्रीमती एस डी सोनी, कनिष्ठ स्तर दिवाणी न्या. श्रीमती पी व्ही राऊत, तिसरे कनिष्ठ स्तर दिवाणी न्या. ए ए पाचारणे उपस्थित होते.
         स्वागत अँड मयूर वाखुरे यांनी केले तर  प्रास्ताविक न्या. बी यु चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेवासा न्यायालयातील ज्येष्ठ वकील कै.एम बी मुंगसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
             न्या. बेलकर पुढे बोलताना म्हणाले की, कायद्यापुढे सर्व समान आहेत, संविधानामुळे शिस्त आहे, आणि शिस्तीमुळे प्रगती आहे. त्यामुळे संविधानाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. या देशात संविधानामुळे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात यासाठी
मूलभूत कर्तव्याचे पालन आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड मयूर वाखुरे यांनी केले तर  अँड ए.टी. झिने यांनी आभार मानले.

नेवासा,प्रतिनिधी
नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्च प्रांगणात असलेल्या मतमाऊलीची यात्रा शनिवारी दि.३० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्ञान माऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी दिली.मतमाऊली यात्रेनिमित्त ज्ञानमाऊली चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून ही विद्युत रोषणाई सर्व भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
शनिवारी दि.३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमाऊली यात्रेनिमित्त सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत आराधना व आरोग्य दानाची प्रार्थना,सायंकाळी ४ वाजता पवित्र मतमाऊली मातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.मिरवणुकीचा समारोप ज्ञानमाऊली चर्च प्रांगणात झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता नाशिक धर्मप्रांताचे प्रमुख रेव्हरंट बिशप लुर्ड्स डॅनियल व नाशिक येथील व्हीकर जनरल यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेची पवित्र मिस्सा बलिदान हा धार्मिक विधी होणार आहे.यात्रेनिमित्त दि.२७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर त्रिदिनी भक्ती सोहळयाला भाविकांनी सहभाग नोंदवला.
रविवारी दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता संगीत पवित्र मिस्सा बलिदानाने पाच दिवस चाललेल्या यात्रा सोहळयाची सांगता होणार असून यात्रेनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन फादर प्रकाश राऊत यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

विसापूर
पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटीचे सावित्रीबाई कला महाविद्यालयात २६/११  रोजी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थि विकास मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा  करण्यात आला.
 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.ढगे,उपप्राचार्य डॉ.एसआय.घेगडे, सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधानाचे वाचन करण्यात आले तसेच  महाविद्यालयच्या प्राचार्यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे ,देशातील प्रत्येक नागरीकाला  स्वातंत्र्य ,समता , व  न्याय मिळावा ,प्रत्येक नागरिकाचे हक्क व कर्तव्य यांची अंमलबजावणी व्हावी या हेतूने भारतीय संविधानाची निर्मिती झाली.या संपुर्ण संविधानाची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य  डॉ. शांतिलाल घेगडे यांनीही भारतीय संविधानाचा विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करावा असे  सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.एस. आर. दुधकवडे  सर यांचे व्याख्यान आयोजीत कसण्यात आले होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधान निर्मिती प्रक्रियेपासून आजपर्यंत झालेले बदल याची संपुर्ण सखोल माहिती विद्यार्थांना दिली या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शितोळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.शेटे यांनी मानले.सदर उपक्रमास कुकडी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख माजी आमदार राहुल जगताप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांचा प्रतिसाद मिळाला.

नेवासा,प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील बहिरु गंगाराम केदारी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय वर्षे ९० वर्षे होते.
स्वर्गीय बहीरु केदारी यांच्या पच्यात पत्नी,एक मुलगा, मुले,चार मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.माजी मुख्याध्यापक व डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री समर्थ बैठक श्री सदस्य गंगाधर केदारी ‌(गुरूजी) यांचे ते वडील होते.

नेवासा,प्रतिनिधी
नेवासा खुर्द जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल या प्राथमिक शाळेमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य बहुजनांच्या उद्धारासाठी स्त्री शक्तीचा सन्मान वाढविणारे असे होते असे प्रतिपादन जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले 
नेवासा खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळा प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुधीर चव्हाण हे होते तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकीला खान,उपाध्यापक अरविंद घोडके,शिक्षक आण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका शकीला खान यांनी उपस्थित
मान्यवरांचे स्वागत केले अध्यापक अरविंद घोडके यांनी प्रास्ताविकात महात्मा ज्योतिबा फुलेंचे जीवन कार्य विषद केले.
यावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण म्हणाले की स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेण चिखल झेलले मात्र त्यांनी विकृत मनोवृत्तीच्या लोकांना भीक घातली नाही बहुजन समाजाला एकत्रित करून त्यांनी जातीयतेच्या भिंती तोडल्या सामाजिक ऐक्यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव भारतीयांना स्फूर्ती व प्रेरणा देत राहील स्त्री शक्तीचा सन्मान त्याच्या मुळेच वाढला त्यांचे विचार अंगीकारून समाजात मानवता धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती शकीला खान,अरविंद घोडके,राहुल आठरे,साईनाथ वडते,आण्णासाहेब शिंदे, प्रतिभा पालकर,छाया वाघमोडे,प्रतिमा राठोड,मिनाक्षी लोळगे,अश्विनी मोरे,प्रतिभा गाडेकर,विद्या खामकर,ज्योती गाडेकर या शिक्षकांसह पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक आण्णासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

चांदेकसारे ( वार्ताहर) 
उन, वारा,पाऊस,थंडी,बर्फ कशाचीच तमा न बाळगता आपल्या देशाचे वीर जवान देशाचं संरक्षण करण्यासाठी सिमेवर कडा पहारा देतात . परकीय आक्रमणापासून देश वाचविण्यासाठी प्राणाची पर्वा न करता हुतात्मा होतात.त्यांच्या कार्याची दखल सर्वांनी घेतली पाहिजे.त्यासाठी सैनिक कल्याण निधी आपला सहभाग दिला पाहिजे कारण सिमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण व आपला देश सुरक्षित आहे असे प्रतिपादन पोहेगांवचे सरपंच अमोल औताडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथे सैनिक कल्याण निधी संकलन कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेना नेते नितिनराव औताडे यांनी हस्ते सैनिक कल्याण निधी बाँक्स मध्ये सहभाग टाकून सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगिरथ रोहमारे ह़ोते.
यावेळी माजी अध्यक्ष रियाज शेख, बाबासाहेब रोहमारे, ग्राम विकास अधिकारी रामदास काळे, आप्पासाहेब पानगव्हाणे, मुख्याध्यापिका कमल नलगे, राजश्री डोंगरे,शिक्षक सुभाष गरुड, दिपक झावरे, बाळासाहेब गोरे , शिक्षिका प्रतिभा राऊत, अनिता हरदास,निलोफर शेख, श्रीमती शेंडे,श्रीमती बोरशे,श्रीमती सोनवणे अदिसह विद्यार्थी उपस्थित होते.पहीली ते चौथी पर्यंत असलेल्या पोहेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले/मुली येथील चिमुकल्या नी गावात फेरी काढून निधी संकलन केले.
भारतीय संविधान दिन हा कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच अमोल औताडे यांच्या हस्ते निधी संकलन बाँक्स मधील निधीची मोजणी केली.विद्यार्थानी जमा केलेला निधी रुपये ३६००  केंद्रप्रमुख राजेंद्र ढेपले यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या कडून ही रक्कम सैनिक कल्याण निधीत जमा होणार आहे.

अहमदनगर- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथे स्व.राजीव राजळे यांच्या स्मरणार्थ त्याच्या मुळगावी रस्त्याच्या चोहीबाजूने  केली गेलेली वृक्ष लागवड व या वृक्षाची काळजी गावातील तरुण अतुल लंवाडे,तुकाराम कांबळे, इतर ग्रामस्थ काळजीपूर्वक लक्ष देवून झाडांना पाणी देऊन त्यांची दररोज देखरेख व पाहणी संगोपन  करुन काळजी घेत आहेत.कासार पिपंळगाव रस्त्यावर  सावली देणारे  वनस्पतीची रोपे रस्त्याच्या बाजूने लावली असून वड,पिपंळ,चिंच, जांभूळ, बहावा, नारळ, लिंब, साग, आंबा, नारळ, संञा, पारीजातक तसेच  जमीनीची धूप टिकवून ठेवणारी एकशे वीस वृक्ष रस्त्याच्या बाजूने परीसरात लावली आहेत.तसेच काही शोभेच्या वनस्पती आहेत.झाड लावल्यानंतर त्याची काळजी घेऊन संगोपन होणे महत्त्वाचे असते.तरच ते झाड येऊ शकतात. राजीव स्मृती वृक्ष उपक्रम राबविल्यामुळे कासार पिपंळगाव परीसर हिरवागार तसेच निसर्गरम्य होताना दिसणार  आहे.शेवगाव पाथर्डीच्या आ.मोनिकाताई राजळे,जि.प.सदस्य राहुल राजळे,सरपंच मोनाली राजळे व ग्रामसेवक प्रमोद म्हस्के तसेच समस्त गावकरी,तरुण वर्ग यांच्या संकल्पनेतून राजीव स्मृती वृक्ष उपक्रम कासार पिपंळगावात राबविण्यात आला आहे.या उपक्रमाचे परीसरातून कौतुक करण्यात येत आहे.

अहमदनगर - प्रतिनिधी | अमोल म्हस्के
महाराष्ट्रातील शिक्षकेतर महामंडळाची सर्वसाधारण सभा (दि.२४)रोजी पार पडली.सर्वसाधारण सभेमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या असणाऱ्या विविध प्रलंबित प्रश्नासंबधी चर्चा करण्यात आले.शालेय कार्यालयीन कामकाजासंबधी मार्गदर्शन केले.
या सभेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी  संघटना प्रमुख,तसेच लेखापाल,लिपीक कर्मचारी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर  महामंडळाचे अध्यक्ष एस.डी.डोंगरे,उपाध्यक्ष पियंका गुणगेकर,कार्याध्यक्ष अविनाश चडगुंलवार,सर कार्यवाह शिवाजी खांडेकर,नाशिक विभाग प्रमुख प्रमोद पाटील,रवि जाधव,अमरावती प्रमुख केशव पाटील,औरंगाबाद प्रमुख निशार पटेल,लातूर प्रमुख अनिल दरेकर,नागपूर प्रमुख उमेश शेंडे,कोष्याध्यक्ष सुखदेव कंद, आंनदराव पाटील,संजय पाटील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.

नेवासा, प्रतिनिधी
महाशिव आघाडीचे सरकार स्थापण होण्यासाठी १५ - २० दिवसांचा कालावधी लोटला गेला वेगवेगळ्या राजकिय चमत्कार घडले.अखेर पुन्हा सरकार स्थापण होण्याचा मार्ग निघाल्याने नेवासाफाटा येथील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे युवानेते ज्ञानेश सिन्नकर व पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला.
   महाशिव आघाडीचे सरकार स्थापण होण्यासाठी अनेक विघ्न आलेले होते अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेचे सर्वासर्वे शरद पवार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आलेल्या संकंटावर यशस्वी मात करुन सरकार स्थापण करण्याचा मार्ग सुकर केला आसल्याने १५ - २० दिवस चाललेला पाठशिवनीचा खेळ संपुष्ठात येवून सरकार स्थापण होण्याचा मार्ग यशस्वी झाल्याने क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्यावतीने आंबेडकर चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला या प्रसंगी ज्ञानेश सिन्नरकर,दिनेश सरगय्ये,अरिफ पठाण,जब्बार शेख.राजेंद्र गोसावी,शंकर दाणे आदी उपस्थित होते.


स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख विजयी होण्यासाठी ज्ञानेश सिन्नकर यांनी तुळजापूरला जावून नवस पुर्ती करुन त्यांना मंञीपद मिळण्यासाठी साकडे घातले होते.आणि साहेबांना मंञीपद मिळाल्यानंतर पुन्हा तुळजापूरला जावून आई तुळजाभवानीच्या चरणी लिन होणार आसल्याचे सिन्नरकर यांनी सांगितले.शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठींबा दिलेला होता.माञ सत्ता स्थापण होण्यासाठी महाशिव आघाडीला अनेक संकटांचा सामना करावा लागला अखेर मार्ग यशस्वी झाल्यानी त्यांनी फटाके फोडत जल्लोष व्यक्त केला.

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील टोका-प्रवरासंगम येथील सामाजिक कार्यकर्ते व मातंग समाजाचे नेते योगेश श्रीधर आवटी यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने देण्यात येणार मातंग समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी दिली.
        टोका येथील योगेश आवटी यांनी मातंग समाजातील उत्कर्षासाठी व त्यांच्या न्यायहक्कांसाठी मोठे योगदान देत आहे भुकेलेल्याना अन्न,नागड्याला वस्त्र असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदाना बद्दल त्यांना मातंग समाज भूषण पुरस्कार श्रीरामपूर येथे शनिवारी दि.३० नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळील प्रांगणात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या सोहळयात योगेश आवटी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण व कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे यांनी दिली.

भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ रचना-  प्राचार्य लक्ष्मीकांत नांगरे

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील देवगड येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या असलेल्या गुरुदत्त माध्यमिक व उच्च विद्यालयात संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाचे वाचन करून  शपथ देण्यात आली.भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ रचना असल्याने संविधानाचा सन्मान करून जगात देशाची शान वाढवा असे आवाहन  प्राचार्य लक्ष्मीकांत नांगरे सर यांनी यावेळी बोलताना केले.
                संविधान दिनाच्या झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मीकांत नांगरे हे बोलत होते. यावेळी त्यांनी संविधानाचे स्वरुप रचना,निर्मिती याविषयी  मार्गदर्शन करून त्यांनी संविधानाचे महत्व विषद केले.
         संविधान निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे योगदान सर्वश्रेष्ठ असल्याने देशाच्या एकता व अखंडते साठी संविधानाचा सन्मान करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
        कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संविधानाचे वाचन करून एकता व अखंडतेसाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण गंधारे यांनी स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
         या प्रसंगी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,संगीत खुर्ची इत्यादि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी शाळेतील शिक्षक भरत मुराडे,रंगनाथ रिंधे,गणेश आरगडे,दिपक वायकर,संदिप नाईक,नितिन कांबळे, गंगाधर कोहक,किरण दारकर,आप्पासाहेब काळे,मधुकर गवळी,कविता गावडे,सपना शेलार,संतोष भगत,भास्कर दरंदले,अर्जुन ससे,ज्ञानेश्वर मेथे यांच्यासह पालक ही मोठया संख्येने उपस्थित होते.शिक्षक रामसुंदर राशिनकर यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिक्षक गणेश आरगडे यांनी आभार मानले

जीवनात जगावं कसं हे कळण्यासाठी ज्ञानेश्वरीचे वाचन करा-गुरुवर्य भास्करगिरी महाराज

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा शहरातील मारुती चौकामध्ये गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते ध्वजारोहण करून बुधवारी दि.२७ नोव्हेंबर पासून उत्साहात प्रारंभ झाला.जीवनात जगावं कसं व ज्ञानेश्वरीचे ज्ञान कळण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करा असे आवाहन यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
          नेवासा खुर्द येथील मारुती चौकामध्ये श्री हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते धर्मध्वजपूजन करण्यात आले त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या सोहळयाचा शुभारंभ करण्यात आला.
     यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या समवेत ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक, ह.भ.प.नंदकिशोर महाराज खरात,पारायण व्यासपीठ चालक विजय महाराज पवार,सचिन महाराज पवार, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,व्यापारी सूर्यकांत रासने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
    यावेळी सोहळा कमिटीच्या वतीने सर्व संत महंतांचे पूजन करण्यात आले.तर माऊली भक्त प्राचार्य डॉ.अशोकराव शिंदे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा ज्ञानेश्वरी साधक पुरस्कार देऊन गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते  गौरविण्यात आले.
    यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज पुढे म्हणाले की ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे चिंतन व ज्ञानेश्वरीची पारायणे ही खरी सेवा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून साधकाला घडत असते,ईतर ग्रंथ वाचनाने बुद्धी व चातुर्य वाढते मात्र जीवन कसे जगावं हे मनुष्याला ज्ञानेश्वरी वाचनाने कळते व ज्ञानेश्वरी वाचता वाचता तिचे ज्ञान ही कळते म्हणून जीवनात ज्ञानेश्वरीचे पारायण करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.खंडोबा म्हाळसादेवी मंदिर देवस्थान,संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान,जैन मंदिर,संत तुकाराम महाराज मंदिर अशी या पंचक्रोशीतील देवस्थाने आपलीच असल्याने या देवस्थानाच्या उत्कर्षासाठी ही सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
       यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नामदेव महाराज कंधारकर,बाळू महाराज कानडे, खंडोबा-म्हाळसा देवी मंदिराचे मार्गदर्शक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे,प्राचार्य अशोक शिंदे,शंकर ओहोळ,रमेश ओस्तवाल,माजी सरपंच सतीश गायके,नगरसेवक राजेंद्र मापारी,व्यापारी विकास डहाळे, सोहळा कमिटीचे सदस्य भाऊसाहेब माळवे,अशोक लोखंडे,ज्ञानेश्वर काळे,बाबासाहेब कोरेकर, भानुदास गटकळ,संत सेवक शिवा राजगिरे,महेश मापारी यांच्यासह गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संतसेवक सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आभार मानले.

चांदेकसारे(वार्ताहर)  
पोहेगाव  जि.प.प्राथ.शाळा शिंदेवस्ती नवीन येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून संविधानाविषयी जागृती केली.या निमित्ताने शाळेत वकृत्व स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या सुरवातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शिर्डीचे पोलिस उपनिरीक्षक बारकू जाने होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिकारी राठोड, रविंद्र मोकळ, केंद्रप्रमुख आर. के.ढेपले उपस्थित होते.संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. शिक्षक सचिन आढांगळे यांनी भारतीय संविधानाविषयी माहिती सांगितली.यावेळी विध्यार्थीनी अक्षदा डांगे, सृष्टी जाधव,प्रिया देशमुख,श्रद्धा पेटारे,भारती मोरे यांनी भारतीय संविधान या विषयावर भाषणे केली. याप्रसंगी रविंद्र मोकळ यांनी शाळेला संविधान ग्रंथाची प्रत व बारकू जाने यांनी संविधान प्रास्ताविकेची फ्रेम शाळेस भेट दिली.यावेळी शालेय व्यवस्थापनचे उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे,बाळासाहेब गडाख,विजय देशमुख,साईनाथ गायकवाड तसेच दिप्ती मोरे,अंगणवाडी सेविका मंगल देशमुख,संगीता औताडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी अक्षदा डांगे हीने करून सचिन आढांगळे यांनी आभार मानले.

नेवासा तालुक्यात सरकारी कापूस केंद्र सुरू करा-कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांची मागणी


नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याची तक्रार भष्ट्राचार विरोधी जन आंदोलन समितीच्या सदस्यांनी नेवासा येथील सहायक निबंधक सहकार खाते यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न झाल्यास त्रिव आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.नेवासा तालुक्यात सरकारी कापूस केंद्र सुरू करा अशी मागणी यावेळी कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी यावेळी बोलताना केली.
   नेवासा तालुक्यात सरकारी कापूस केंद्र सुरू करण्यात यावे,आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,वजन काटे तपासण्यासाठी छापे टाकावे,कापूस खरेदी झाल्यानंतर
व्यापाऱ्यांकडून अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे, अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या असून या बाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास या संदर्भात त्रिव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
           या निवेदनावर शेतकरी अंबादास कोरडे,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भष्ट्राचार विरोधी जनआंदोलन चे तालुकाध्यक्ष रामराव भदगले,कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे,बहिरु शेजुळ,एस.आर.शिंदे यांच्या सह कापूस उत्पादक यांच्या सहया आहेत

 चक्क बांधकाम खात्याचीच रस्त्यावर काढणार छञपती युवा सेना प्रतिकात्मक प्रेत याञा...  बांधकाम खात्याची लक्तरे वेशीला !


नेवासा, प्रतिनिधी
नेवासाफाटा - शेवगांव राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आसून रस्त्यात खड्डे की खड्डयातून रस्ता असा पेचप्रसंग निर्माण झालेला आसतांना या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी छञपती युवा सेनाचे प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी बांधकाम खात्याला दिलेला होता माञ बांधकाम खात्याने या निवेदनाची दखल घेतली नसल्याने आता २ डिसेंबरला चक्क रस्त्याची प्रतिकात्मक प्रेत याञा काढणार आसल्याचे लेखी निवेदनच बांधकाम खात्याला देण्यात आलेले आहे.त्यामुळे बांधकाम खात्याची लक्तरे वेशीला टांगले जाणार आसून वाहनधारकांच्या रोषाला बांधकाम विभागाला समोरे जाण्याची वेळ आलेली आहे.
  नेवासा फाटा - शेवगांव राज्याची मोठी बिकट अवस्था झालेली आसून या मार्गावर वाहनधारकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्यावर अनेक खड्डे आसल्यामुळे अनेक अपघात झालेले आसून निरापराध लोकांना अपघातातून अपंगत्व येत आहे याबाबत छञपती युवा सेनेने रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता याची दखलच बांधकाम विभागाने घेतलेली नसल्यामुळे आता २ डिसेंबरला बांधकाम खात्याची प्रतित्मक प्रेतयाञा काढण्याचे निवेदन देण्यात आलेले आसून सार्वजनिक बांधकाम खात्याची लक्तरे वेशीला टांगली जात आसल्याचे दिसून येत आहे

गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरण थांबले

चांदेकसारे ( वार्ताहर) 
गेल्या आठ महिन्यापूर्वी गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचा मोठा ओहापोह झाला होता .मात्र उन्हाळ्यात चालू झालेले काम जून महिन्यात पूर्णपणे बंद पडले. आठ महिन्यापासून बंद जलसंधारण विभागाचा जेसीबी बंद असून गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरण थांबले आहे. 
फेब्रुवारी 2019 या महिन्यात गोदावरी कालव्याचे नूतनीकरण करून पाण्याची होणारी गळती थांबवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला .गोदावरी कालव्याच्या कडेला वाढलेल्या बाभळी ही काही ठिकाणी जलसंधारण विभागाच्या वतीने काढण्यात आल्या. याच काळात गोदावरी कालवा बचाव कृती समितीची स्थापना झाली. उन्हाळ्यात सुरू झालेले कालवा नूतनीकरणाचे काम पावसाळ्यात पूर्णपणे बंद पडले. जलसंधारण विभागाने सोनेवाडी परिसरातील कालव्याच्या कामासाठी आणून ठेवलेले जेसीबी मशीनही गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे. गेल्या महिन्यात कालवा बंद झाला होता तेव्हा मात्र परत गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरणाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा होती मात्र मशिनजागेवरूनच पुढे सरकले नसल्यामुळे गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरण पूर्ण थांबले आहे पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने पाहून सोनेवाडी परिसरातील कालव्यांच्या बाजूला वाढलेल्या काटेरी बाबळी काढाव्या अशी मागणी अहमदनगर जिल्हा सचिव संघटनेचे संघटक विठ्ठल जावळे यांनी केली आहे.
सोनेवाडी परिसरात ह्या गोदावरी उजव्या कालव्याच्या दोन्ही बाजूला काटेरी बाभळींनी वेढा दिला आहे त्यामुळे ओव्हरफ्लो चे आलेले पाणी आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसले परिणामी आजपर्यंत ही या शेतकऱ्यांच्या गोदावरी कालव्या लगत असलेल्या जमिनी वाफसावर आलेल्या नाहीत.
पाण्याची गळती थांबविण्यासाठी कालव्याचे पूर्ववत काम पाटबंधारे विभागाने चालू करावे असेही जावळे यांनी सांगितले आहे.

विसापूर
सोमवार दि.25 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नगर-दौंड रोडवर श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारत   माेटारसायकल व इंडिका कार यांचा अपघात झाला.या मध्ये मोटार सायकल वरील दोघे ठार झाले.ते दोघे ऊसतोडणी मुकादम होते. दादा दगडू राठोड वय २६ उमरखेड ता.कन्नड जि.औरंगाबाद व एकनाथ वामन चव्हाण वय ३१ उमरखेड ता.कन्नड जि.औरंगाबाद हे जखमी होऊन मयत झाले आहेत.तर इंडिका कारचा चालक नितीन सूर्यवंशी,रा.चांदा बु.ता.कर्जत हा जखमी झाला आहे. मृतदेहांचे पोस्ट मार्टम साठी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे पाठविण्यात आले. जखमी देखील श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहे. बेलवंडी पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली.पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली.

चंपाषष्टी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

नेवासा(प्रतिनिधी)
लाखो भाविकांचे आराध्य दैवत खंडोबाराय यांची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा-म्हाळसादेवी मंदिर जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आले असून मूर्तीप्राणप्रतिष्ठापणा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास"येळकोट.. येळकोट.. जय मल्हार"च्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात सोमवार दि.२५ नोव्हेंबर पासून धर्मध्वजारोहणाने प्रारंभ झाला.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चंपाषष्ठी ला दि.२ डिसेंबर रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
यावेळी झालेल्या ध्वजारोहन प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व सौ.डेरे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात येऊन अखंड हरिनाम सप्ताहाचे धर्मध्वजारोहण करण्यात आले.आलेल्या सर्व मान्यवरांचे खंडोबा म्हाळसा मंदिराचे प्रमुख प्रा.डॉ.मुरलीधर कराळे यांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच प्रकाश सोनटक्के, माजी सरपंच आण्णा भाऊ पेचे,प्रभाकर बोरकर,अनिल मारकळी, जयमल्हार मित्र मंडळाचे संतोष गायकवाड, सुहास जरे,
नामदेव कुटे,रावसाहेब पेचे,गोकुळ जायगुडे, महिला भजनी मंडळाच्या सौ.कमलताई कराळे,सौ.रंजनाताई भाकरे,यादव ताई यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सौ.सुनिताताई गडाख यांनी सोहळयाला भेट दिली.
गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या प्रेरणेने नेवासा बुद्रुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून चंपाषष्ठीच्या दिवशी दि.२ डिसेंबर रोजी खंडोबा म्हाळसादेवीसह सच्चिदानंद बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे त्यानिमित्त यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन,सकाळी ६ ते ७ यावेळेत विष्णू सहस्त्रनाम,सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण दुपारी १२ ते २ भोजन महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ हरिकीर्तन नंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
दि.२ डिसेंबर रोजी चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा म्हाळसादेवी व सच्चिदानंद बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.अखंड हरिनाम सप्ताहात होणाऱ्या कीर्तन कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे व नेवासा बुद्रुक ग्रामस्थ यांनी केले आहे.

निष्पाप वाहनधारकांचा बळी घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचीच प्रतिकात्मक प्रेत याञा काढणार - नवले

नेवासा, प्रतिनिधी
नेवासाफाटा ते शेवगांव राज्यमार्गाच्या रस्त्याची मोठीे दुरावस्था झाली आसून रस्त्यात मोठ - मोठी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची संपुर्ण चाळण झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावर दररोज निष्पाप वाहन चालकांचे अपघात होत आहेत. वाहनधारकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आयुष्यभर अधू होण्याची वेळ आली आहे. तर काही वाहन चालकांना हाकनाक जीव गमवावा लागत आसून या अपघाताला सार्वजनिक बांधकाम खातेच जबाबदार आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला लेखी निवेदन देवूनही दुरुस्ती होत नाही.त्यामुळे वाहनधारकांना जर जीव गमवावा लागत असेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याचीच प्रकात्मक प्रेत याञा रस्त्यावर काढू असा इशारा छञपती युवा सेनेचे प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी प्रसिद्धी पञकान्वये दिला आहे.
  या निवेदनात नवले यांनी म्हटले आहे की, नेवासाफाटा ते शेवगांव राज्यमार्गाची चाळण झालेली आसून रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरुन वाहने चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे दररोज अपघात होवून लोक अधू होत आहेत.या रस्त्यावर मोठी वाहनांची वर्दळ असते.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आसल्यामुळ मोठी उस वाहतूक करणाऱ्या बैल गाड्यांसह ट्रक,टॅक्टर वाहनांची मोठी संख्या आसतांना अवैद्ध प्रवाशी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु आसते.माञ रस्त्याची झालेली चळण खड्यात पडलेले खड्डे दुरुस्ती होत नाही त्यामुळे निष्पाप लोकांचे प्राण जात आसून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याकडे दुर्लक्ष करत आसल्याने निष्पाप वाहनधारकांचा जीव घेणाऱ्या बांधकाम खात्याची शेवगांव मार्गावर प्रतिकात्मक प्रेत याञा काढण्याचा इशारा छञपती युवा सेनेचे प्रदेश संघटक कमलेश नवले,अक्षय बोधक,राहूल बोधक आदींनी प्रसिद्धी पञकात दिला आहे.

शाळकरी मुले करतात जीव मुठीत धरुन प्रवास

पाथर्डी- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव ते डांगेवाडी जुन्या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थाकडून होत आहे.रस्त्यावरून शाळा,महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन चालावे लागते.कारण रस्त्यावर मोठेमोठे दगड तसेच पाण्यातून चिखल तुडावत पायी प्रवास करावा लागत आहे.या रस्त्याने दररोज ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर,शिक्षक,शेतमजूर प्रवास करतात.काही वेळा लहान मुलांना प्रवास करताना  इजा होत आहे.तसेच या रस्त्या खराब असल्याने मुले शाळेत जाण्यासाठी कंटाळा करत आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.परीसरातील नागरिक रस्त्याचे काम कधी सुरु होईल याची चिंता लागली आहे.शाळकरी मुलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता होणे गरजेचे आहे.
आमची मुले शाळेत जाणार कशी?असा प्रश्न येथील पालकांना  पडला आहे.रस्त्याचे कमीतकमी मजबुतीकरण होणे गरजेचे आहे.तसेच रस्त्यावर आवश्यक ठिकाणी पुलाचे काम होणे गरजेचे आहे.कारण पावसाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते

नेवासा, प्रतिनिधी
नेवासाफाटा येथील शरणपूर वृध्दाश्रमातील वृद्धांना वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत वृद्धांना मिष्टान्न देऊन तीन वर्षीय परी उर्फ अनुश्री या बालिकेला औक्षण करून स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
यावेळी वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी स्वागत केले.तर सचिव सौ.सुरेखा मगर यांनी प्रास्ताविकात वृद्धाश्रमातील उपक्रमाची माहिती दिली.यावेळी पुणे येथील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले नेवासा येथील विठ्ठल चव्हाण व सौ.रुपाली चव्हाण या दाम्पत्याने त्यांची तीन वर्षीय मुलगी परी उर्फ अनुश्री हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शरणपुर वृध्दाश्रमातील मिष्टान्न भोजन देऊन स्त्री जन्माच्या स्वागत उपक्रमाद्वारे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.यावेळी वृद्धाश्रम कमिटीचे जिल्हाध्यक्ष होमगार्ड समादेशक व पत्रकार बाळासाहेब देवखिळे,सौ.रुपाली चव्हाण व प्रज्ञा देवखिळे,कमिटीचे तालुका उपाध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी वृद्धांशी संवाद साधला व समाजासाठी हा 
उपक्रम आनंद व प्रेरणा देणारा ठरला असल्याचे सांगत यापुढे ही वेळोवेळी असे उपक्रम राबवून या वृद्धाश्रमास मदत करण्याची चव्हाण परिवाराने यावेळी बोलताना दिली 
यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांनी प्रार्थना गीते गायली कु.परी उर्फ अनुश्री हिचे औक्षण करून उपस्थित वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले.यावेळी नजीक चिंचोली येथील समाज प्रबोधनकार दिगंबर गोंधळी,व्यापारी विजय दहीवाळकर, वृद्धाश्रम कमिटीचे सदस्य किरण आघाव,व्यवस्थापक संतोष मगर,सौ.ज्योतीताई मगर,सुभाष चव्हाण,नितीन कदम,सचिन कदम,दत्तात्रय गव्हाणे,शुभम गोंधळी,सुनील चव्हाण यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आडलेल्या नारायणाच्या सेवेत व धार्मिक कार्यात केलेल्या दानाने संपत्तीला सुगंधाची प्राप्ती-गुरुवर्य भास्करगिरी महाराज

नेवासा,प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सव सोहळयाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने काल्याची दहीहंडी फोडून  उत्साहात सांगता करण्यात आली. आडलेल्या नारायणाची सेवा व धार्मिक कार्यात केलेल्या दानाने संपत्तीला सुगंधाची प्राप्ती होते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
    यावेळी तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे आगमन झाल्यानंतर प्रवरानदीच्या तीरावर बांधण्यात आलेल्या मंदिरात जाऊन त्यांनी श्री काल भैरवनाथांचे दर्शन घेतले.त्यानंतर पाण्याने घेरलेल्या
मंदिर परिसराची त्यांनी पहाणी केली.काला कीर्तन प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे संतपूजन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.
        यावेळी येथील ज्ञानसागर सभामंडपात झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री कालभैरवनाथ हे भगवान शिव शंकराचा अवतार असून त्यांचा अवतार भक्तांच्या उद्धारासाठी झाला असून क्षेत्र बहिरवाडी हया जागृत  क्षेत्राचा महिमा ही अगाध असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.आपली पंचक्रोशी ही विविध तिर्थक्षेत्राने नटलेली असून संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी, नाथबाबा मंदिर,दक्षिणमुखी मारुती मंदिर,नारदमुनी मंदिर,खंडोबा म्हाळसा मंदिर या क्षेत्राच्या उद्धारासाठी सर्वांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
    प्रेम व जिव्हाळा हे कुठे शाळेतून मिळत नाही तर तो आईवडिलांकडून मिळतो,मुलांमध्ये प्रेम व जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न आईवडिलांनी करावा,केलेल्या दानाने संपत्तीला खरा सुगंध येत असल्याने जीवनात आडलेल्या नारायणाची सेवा करा,गोधनाची व भूमी धनाची जोपासना करा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन व अवतार कार्य त्यांनी काल्याच्या कीर्तनात बोलताना व्यक्त केले.
   यावेळी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगदान देणाऱ्या भाविकांचा गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्रीफळ
प्रसाद देऊन गौरविण्यात आले यावेळी काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.यावेळी हभप रामनाथ महाराज पवार,विजय महाराज पवार,लक्ष्मण महाराज नांगरे,बाळू महाराज कानडे,हभप नामदेव महाराज कंधारकर,हभप भाऊसाहेब महाराज मोरे,हभप नळघे बाबा,मच्छिंद्र महाराज पठाडे,बदाम महाराज पठाडे यांच्यासह सोहळयात योगदान देणारे श्री कालभैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळ तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ व  भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज सोपान महाराज यांचे व त्यांच्या शिष्य वारकऱ्याचे वारीत बुलडोझर अंगावर आल्याने अपघातात निधन झाले या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भक्त परिवाराच्या वतीने यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

नेवासा, प्रतिनिधी
महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली च्या संजीवन समाधी सोहळयानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिपोत्सव करून माऊलीला अभिवादन करण्यात येणार असून यानिमित्ताने भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी केले आहे.
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील 'पैस'खांबाच्या ज्ञानेश्वर मंदिरांमध्ये संजीवन समाधी निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान, संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळ व समर्पण कृषीक्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संत सेवा संघ आळंदीचे प्रसिद्ध संगीतकार जीवन धर्माधिकारी यांच्या 'नमो ज्ञानेश्वरा' या भजन संध्या कार्यक्रमाचे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे व रात्री महाप्रसादाचे ही आयोजन केले आहे.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख,अध्यक्ष माधवराव दरंदले, समर्पणचे प्रमुख अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या उत्कृष्ट नियोजनात होत असलेल्या या कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षां पासून नेवासेचे भूमिपूत्र व पुणे उद्योजक रविंद्र मुनोत यांच्या वतीने आपल्या मातोश्री स्वर्गीय रमाबाई पन्नालाल मुनोत यांच्या स्मरणार्थ याच कार्यक्रमात आदर्श माता पुरस्कार देण्यात येत असतो यावर्षी २०१९ हा पुरस्कार नेवासा येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका सौ.शरादिनी मधुकर देशपांडे यांना जाहीर झाला असून येथे होणाऱ्या कार्यक्रमात सदरचा पुरस्कार हा संत महंतांच्या उपस्थितील तो प्रदान करण्यात येणार आहे

बोधेगाव वार्ताहर 
 राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली, मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चसुद्धा निघणार नाही. त्यामुळे मदतीत हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत भरीव वाढ करावी, अशी मागणी रवी देशमुख या तरुण शेतकऱ्याने आपल्या खात्यावर प्रत्यक्षात मदत मिळण्याआधीच आठ हजार रुपयांचा धनादेश बोधेगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत स्पीड पोस्टद्वारे राज्यपालांना नुकताच पाठवला आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कपाशी, बाजरी, सोयाबीनचे आदी खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करून प्रशासनाने नुकसानीचा अहवाल शासनास दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशासकीय आढावा घेत नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी सरसकट हेक्टरी आठ हजार, तर फळपिकांसाठी अठरा हजार रुपयांसह इतर मदत देण्याची नुकतीच घोषणा केली.
नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. गुंठ्याला अवघ्या ऐंशी रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी करत उमापूर (ता. गेवराई, जि. बीड) येथील रवी रावसाहेब देशमुख या तरुण शेतकऱ्याने हेक्टरी मिळणारी आठ हजारांची मदत राज्यपालांना धनादेशाद्वारे बोधेगाव ता शेवगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत परत केली.
त्यांनी राज्यपालांना पत्रही लिहिले असून त्यात शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान, चालू खरीप हंगामासह थकीत सरसकट कर्ज माफ करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीप पिकांचा विमा तत्काळ लागू करावा आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम वार्षिक साठ हजार रुपये करण्यात यावी, अशा मागण्या केल्या आहेत. देशमुख यांना साडेसात एकर शेती असून त्यांच्या आजोबांच्या (आईचे वडील) नावे मुंगी (ता. शेवगाव) येथे साडेतीन एकर शेतजमीन आहे.

चांदेकसारे (वार्ताहर) 
संत तुकाराम ,संत ज्ञानेश्वर संत एकनाथांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत हे धर्मग्रंथ देऊन जगाला आध्यात्मिक संस्कार दिले.खरा तो एकची धर्म या प्रमाणे संत नेहमी दुसऱ्यासाठी जगले. वारकरी संप्रदायाने अठरा पगड जातीचा समाज एका छत्रछायेखाली बांधला तो केवळ संतांचे अध्यात्मिक वृत्तीमुळे परमेश्वर सर्वांगाने एक आहे त्यामुळे पूर्वी वारकरी भाविक कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता भगवंताची एकरूप होण्यासाठी स्वतःला झोकून देत होते. आताच्या भाविकाची व्याख्या बदलली असून केवळ स्वार्थासाठी सर्व चालले आहे.परंतु आजही दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणारा व देशाचं संरक्षण करणारा सीमारेषेवर आपलं आयुष्य समाजासाठी घालवणारा सैनिकच खरा भाविक आहे असे प्रतिपादन अक्रूर महाराज साखरे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे बाल भैरवनाथ जयंती सोहळ्यात बोलत होते.
श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट व चांदेकसारे ग्रामस्थांच्यावतीने बाल भैरवनाथ यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. यावेळी धर्मदाय आयुक्त सौ  शेळके,सौ भिंगारकर,सौ साधना जाधव, सभापती अनुसयाताई होन, मनसुख महाराज दहे , श्रीराम पंचायतन आश्रम ट्रस्टचे सर्व सदस्य,आदीसह चांदेकसारे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रस्टच्यावतीने संजीवनी ब्लड बँक यांना बोलावून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात तब्बल 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सकाळी भव्य सत्यनारायण महापूजा करण्यात आली त्यात जवळजवळ 51 जोडपे सहभागी झाले होते. पुरोहीत विनोद जोशी ,उमेश जोशी व त्यांचे सर्व सहकारी यांनी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरीची विधिवत पूजा केली. श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टच्यावतीने संपूर्ण चांदेकसारे गावातून बालभैरवनाथ व माता जोगेश्वरी ची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
डॉ. विजय होन ,दिगंबर गुरसळ, वैभव पवार व योगेश अंबिलवादे यांनी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची पंगत दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ राजश्री पिंगळे यांनी केले.

नेवासा, प्रतिनिधी
तोफांच्या सलामी देत नेवासा तालुक्यातील प्रवरानदीतीरावर असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथे मंगळवारी दि.१९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता श्रीकालभैरवनाथांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरण साजरा करण्यात आला.
दिवसेंदिवस बहिरवाडी या क्षेत्राचा महिमा वाढत असून गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी लक्ष घातल्याने सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे प्रवरा नदीच्या मध्य धारेवर बांधलेले मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.पौष महिन्यात देखील पाच ही रविवारी येथे यात्रा भरते श्री कालभैरव नाथांच्या जन्मोत्सवानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्ताने दि.१९ नोव्हेंबर मंगळवारी रात्री १० ते १२ या वेळेत सावखेडा येथील हभप नारायण महाराज यांचे श्री कालभैरवनाथ अवतारावर कीर्तन झाले.किर्तनानंतर रात्री १२ वाजता पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पाळण्यामध्ये श्री कालभैरवनाथांची मूर्ती ठेवण्यात आली होती.उपस्थित संत महंतांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली उपस्थित महिला भाविकांनी श्री काल भैरवनाथांच्या जन्माचा पाळणा म्हटला पुष्पवृष्टी करून श्री काल भैरवनाथांचा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी जन्म सोहळया प्रसंगी श्री कालभैरवनाथ मंदिर प्रांगणात तोफांची सलामी देत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.उपस्थित भाविकांना रात्री १२ नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.जन्मोत्सवा निमित्ताने मंदिर व परिसरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती.प्रवरामाईच्या साक्षीने परिसरातील हे दृष्य भाविकांचे आकर्षण ठरले होते.आलेल्या सर्व भाविकांचे व योगदान देणाऱ्या तरुण मंडळातील कार्यकर्त्यांचे सोहळा कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले बहिरवाडी क्षेत्र हे जागृत देवस्थान मानले जाते,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा येथे येत त्यांच्या नावाने कुंड देखील येथे असून अनेक त्वचारोगाने व्याधीग्रस्त येथे येऊन स्नान करतात व व्याधी दूर होते अशी श्रद्धा अजून ही भाविकांमध्ये जोपासली जात आहे.तसेच येथील नदीपात्रातील ओली वाळू घराच्या अंगणात शिंपल्यास
विंचू व साप फिरकत नाही अशी ही श्रद्धा असल्याने भाविक प्रवरेत स्नान करून मूठभर वाळू घरी घेऊन जातात.
दिवसेंदिवस बहिरवाडी या क्षेत्राचा महिमा वाढत असून गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी लक्ष घातल्याने नव्याने सव्वा कोटी रुपये खर्चाचे बांधलेले मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.पौष महिन्यात देखील पाच ही रविवारी येथे यात्रा भरते भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री कालभैरवनाथांच्या या क्षेत्राला "ब"वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा 
मिळावा अशी मागणी भाविकांनी केली आहे.

लाखोंचा महसूल पाण्यात ! महसुलचे दुर्लक्ष !

राजेंद्र वाघमारे | नेवासा 
नेवासा तालुक्यात शहरासह वाड्यावस्त्यांवर सुरु आसलेल्या शेकडो विट भट्ट्या अनाधिकृत राजरोस सुरु आसून महसुल विभागाचे दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा महसूल पाण्यात गेला आसून याला जबाबदार कोण ? असा सवाल जनतेतून व्यक्त केला जात आहे.
   नेवासा तालूक्यात सुमारे दोन वर्षापासून  सुरु आसलेल्या एकाही विट भट्टी चालकाने महसुल विभागाकडून परवानगी घेतलेली नसल्याने शासनाच्या तिजोरीत भर पडलेली नसून विट्टभट्टी चालकांकडून प्रदुषण होवून जनतेला उग्रवासाला सामोरे जावे लागत आसतांना शासनाचा महसुलही बुडविला जात आसून याला जबाबदार आसणाऱ्या महसुल अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

बेलवंडी 
कोळगाव ता.श्रीगोंदा येथे मोहरवाडी शिवारात बुधवार दि.१३ रोजी दुपारी साडेबारा वाजता एका तिस वर्षीय महिलेवर ऊसाच्या शेतात ओढत नेवुन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 
   या बाबत पिडीत महिलने बेलवंडी पोलीस ठाण्यात शनिवार दि.१६ रोजी नितीन शिवाजी मोहारे याचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर कलम ३७६,३५४,३२३ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर महिलेने तक्रारीत सांगितले की,घटना घडली त्या वेळी ती शेतात काम करत होती.त्यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या ठिकाणी नितीन मोहारे आला.माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून लागला.मी प्रतिकार केल्याने त्याने मारहाण करत जवळील ऊसाचे शेतात ओढत नेवुन अत्याचार केला असल्याचे नमूद केले आहे.पिडीत महिलेच्या तक्रारी नुसार कर्जतचे  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.आरोपी नितीन मोहारे यास तत्काळ अटक करुन श्रीगोंदा न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला दि.२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावणावली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे हे करत आहेत.

वाहनचालकांना करावा लागतो मनस्ताप सहन

पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी  शहरातून जाणाऱ्या चिंचपूर रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. दुचाकीसह फोरव्हिलर गाड्या चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. तरी रस्त्याची पाहात, संबंधित विभागाने चिंचपूररोड त्वरित दुरुस्त करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी केली आहे. 
शहरातून जाणारा वर्दळीचा रस्ता असलेला चिंचपूररोडवर अतिशय खराब झाला आहे.अनेक वर्षांपूर्वी या रस्ताचे डांबरीकरण करण्यात आले त्यानंतर याकडे पूर्णतः सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे . डांबराचा पूर्ण थर यावरून निघून गेला तर त्यामधली खडी सुद्धा पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे. मोठ्या स्वरूपाचे खोलच खोल खड्डे पडल्याने नागरिकां बरोबर वाहन धारकांना याचा त्रास सहन करण्याबरोबर अपघात घडण्याच्या ही घटनेला सामोरे जावे लागत आहे.छोटे मोठे अपघात झाल्याने लोकांना दुखापती झाल्या आहेत. नाईक चौक,अजंठा चौक ,उपजिल्हा रुग्णालय ,टाकीय मजीद ,शनी मंदिर हा असणारा चिंचपूररोड मार्ग पूर्णपणे याची चाळण झाली आहे. याचा मार्गावरून अनेक भाविक नवरात्री मध्ये पायी अथवा वाहनांनी ये जा करत असतात . मोहरी ,महिंदा ,मोहटा ,करोडी ,चिंचपूर इजदे ,चिंचपूर पांगुळ ,टाकळी मानूर या परिसरातील नागरिक व्यावहारीक दृष्टया या रस्ताचा वापर करतात .असे असतांना सार्वजनिक खात्याने याकडे हा मार्ग आपला आहे की नाही ? याची माहिती त्यांना नसावी असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.या रस्ताचे येत्या 7 दिवसात दुरुस्ती कारणाचे काम न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांच्या विरोधात आंदोलन उभा करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी दिला आहे .

पाथर्डी तालुका काँग्रेस कमीटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आक्रमक 


पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
 अतिवृष्टी,बॅंकाची दिवाळखोरी,आर्थिक मंदी,बेरोजगारी,महगाई,शेतकरी आत्महत्या,गुन्हेगारी,ठप्प झालेले उद्योग,आरोग्य,शिक्षण आदी समस्यावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ  पाथर्डी तालुका नायब तहसिलदार शैलजा सरोदे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  नासीर शेख,उपाध्यक्ष रवी पालवे, सेवादल चे किशोर डांगे, उपाध्यक्ष वसंत खेडकर, तालुका संघटक सचिन राजळे, अल्पसंख्यांक चे तालुका अध्यक्ष अकबर पटेल, मुन्ना खलिफा, जुनेद पठाण, लहानू गर्जे, दिलीप पानखडे, सुरेश डोमकावळे, सय्यद अस्लम, जब्बार आतार, माजी नगर सेवक नसीर आतार, गोवर्धन लवांडे, नितीन खंडागळे, राजू मनेळ, दीपक चंदनशिव, जावेद पिंजारी, शैजादे शेख,  मुन्ना भाई शेख,योहान खंडागळे, ज्ञानेश्वर भाबड, कल्याण बर्डे,तसेच इतर पदाधिकारी सह नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेवासा, प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन सोहळया निमित्त नेवासा येथील जयहरी आध्यात्मिक प्रतिष्ठान प्रांगणात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू करण्यात आले असून गुरुवर्य कडूभाऊ काटे महाराज यांच्या प्रेरणेने व हभप सौ.मंगलताई काटे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हभप डॉ.अमरनाथ काटे महाराज यांनी दिली.
          नेवासा शहर उपनगरातील अहिल्यानगर जवळ असलेल्या जयहरी अध्यात्मिक प्रतिष्ठान प्रांगणात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू असून यानिमित्ताने पहाटे ५ ते ६
चिंतन,६.३० वाजता आरती,सकाळी ७.३० ते ११.३० यावेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ५ प्रवचन,
असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.रविवारी दि.२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता जयहरी अध्यात्मिक प्रतिष्ठानचे प्रमुख ह.भ.प. कडूभाऊ काटे महाराज यांच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार असून दिपोत्सव करून जयहरी आध्यत्मिक प्रतिष्ठानमध्ये असलेल्या भगवान दत्तात्रय,सदगुरू श्रीपाद बाबा घोटीकर व  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीची पूजा करून दिपोत्सवद्वारे संजीवन सोहळयानिमित्ताने माऊलीला अभिवादन करण्यात येणार असून भाविकांनी या निमित्ताने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.अमरनाथ काटे यांनी केले आहे.

महंत राधाकृष्ण महाराजांनी गायलेल्या विठ्ठल.. माझा.. माझा.. .मी विठ्ठलाचा..या भजनाने भाविक तल्लीन

नेवासा, प्रतिनिधीराजस्थान जोधपूर येथील भागवताचार्य गोवत्स राधाकृष्ण महाराज यांनी सोमवारी दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडला व मुरमे गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळयाला भेट दिली.यावेळी विठ्ठल माझा माझा,मी विठ्ठलाचा या गायलेल्या भजनाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले या भजनाने भाविक तल्लीन झाले होते.यावेळी गोवत्स राधाकृष्ण महाराजांचे देवगड संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यांनी स्वागत करून त्यांचा संतपूजन करून गौरव केला.यावेळी भागवताचार्य राधाकृष्ण महाराजांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.तसेच परिसराची ही पहाणी केली.दत्तजयंती सोहळया निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची ही त्यांनी माहिती घेतली.यानंतर त्यांनी देवगडच्या मुरमे गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने व गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तपपूर्ती सोहळयाला भेट दिली व शुभेच्छा ही दिल्या.यावेळी सोहळा कमिटीच्या वतीने गोवत्स भागवताचार्य महंत राधाकृष्ण महाराज यांचे स्वागत व संतपूजन सरपंच अजय साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाविकांना शुभाशीर्वाद देतांना गोवत्स महंत राधाकृष्ण महाराज म्हणाले की भगवंत हा भक्ताने केलेल्या भजनाने आनंदी होत असतो भगवंताला भेटायचे असेल तर त्याला विषय बनवा नक्कीच भेटेल,भगवंताचे सतत नाम हे ज्याच्या मुखात असते जो हरिनामाचा रस प्राशन करतो तोच खरा वैष्णव असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.मुरमे गावच्या अखंड हरिनाम सप्ताहानेबारा वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केल्याबद्दल त्यांनी हा सोहळा वर्षानुवर्षे वृद्धिंगत व वैभवशाली होत राहो, सर्वांच्या जीवनात भगवंत हाच विषय होत राहो अशा शुभेच्छा व शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी बोलताना दिल्या.यावेळी हभप ऋषिकेश महाराज गोंधवणीकर, ह.भ.प.डॉ.वेणूनाथ महाराज वेताळ,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,तात्या महाराज शिंदे,राजेंद्र मते,नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे,मुरमे देवगडचे सरपंच अजय साबळे,माजी सरपंच आप्पासाहेब वरखडे, रामकृष्ण मुरदरे,सुदाम चरवंडे, दादासाहेब साबळे, शंकर चरवंडे, वल्लभ वरखडे, दत्तात्रय वरखडे,सागर वरखडे, अर्जुन वरखडे,शरद पल्हारे,भिमाशंकर वरखडे,कल्याण वरखडे, काकासाहेब वरखडे, मारूती साबळे,अंबादास मुरदरे, गणेश मुरदरे,संदीप साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर सरपंच अजय साबळे यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.

करजगाव
खातेदारास चांगली सेवा देणे हेच स्टेट बॅकेचे धोरण असुन पानेगाव शाखेकडुन खातेदारांचे समाधान होईपर्यत सेवा देण्यास तत्पर असल्याचे शाखाधिकारी किरण केकाण यांनी सांगितले.

स्टेट बॅकेच्या पानेगाव शाखेत यशवंत संतु विटनोर यांचे प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते होते.त्यांचा
13/04/2019 रोजी अपघाती निधन झाले होते.त्यांचे अपघातामध्ये मृत्यु झाल्याची माहिती घेत  शाखाधिकारी केकाण यांनी काही दिवसापुर्वी विटनोर कुंटुबियाकडुन कागदपत्राची पुर्तता करूण हे प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले  होते.

प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत रूपे डेबिट कार्ड चा वापर करणा-या ग्राहकाचा एक लाख रूपयांचा अपघाती विमा असतो.या योजनेचा फायदा खातेदारास मिळवुन दिल्याने विटनोर कुटुबियाने 
स्टेट बॅकेच्या पानेगाव शाखेचे व शाखाधिकारी केकाण यांचे आभार मानले.

यावेळी सदर विमा योजनेची रक्कम मयताच्या पत्नी संगिता यशवंत विटनोर यांच्या खात्यात जमा करण्यात आली.यासंबधिचे पत्र  संगिता यशवंत विटनोर व मुलगा रावसाहेब विटनोर यांना पानेगाव शाखेत  प्रदान करण्यात आले.
यावेळी शाखेचे रोखपाल राहुल पवार,निवृत्ती शेंडगे, ग्राहक सेवा केद्रांचे सुजित पवार,दिगंबर जाधव,संपत विटनोर आदि उपस्थित होते.

प्रधानमंत्री जन धन खाते अंतर्गत असणा-या रूपे डेबिट कार्ड धारक खातेदाराचा अपघाती मृत्यु झाल्यास बॅकेकडुन एका लाख रूपये त्याच्या वारसदारास देण्यात येतो.



प्रधानमंत्री जन धन खात्याबरोबर सर्वसाधारण खात्याच्या एटीएम व रूपे डेबिट कार्ड चा वापर करण गरजेचे आहे. खातेदारांना पुर्ण लाभ देण्यास बॅक पुर्पणे सहकार्य करते 
- किरण केकाण (शाखाधिकारी,स्टेट बॅक पानेगाव )

चोरट्यांचा कापड दुकानासह बिअर शॉपीवर डल्ला. 

विसापूर
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रविवारी रात्री चोरट्यांनी तिन दुकाने फोडली आहेत.
 या दुकानात कापड दुकान,बियर शॉपी व हॉटेलचा समावेश आहे.विसापूर स्टेशन रोडवर अमित अमर शेख यांचे आलेशा कलेक्शन नावाने कापड दुकान आहे.सदर दुकानाच्या शटरचे लॉक चोरट्यांनी तोडून दुकानातील जिन्स पँटी,शर्टस् व शुज असा चोरट्यांनी सुमारे एक लाख सहा हजाराचा माल लांबवला आहे.विशेष म्हणजे एका चोरट्याने दुकानातील शुज व शर्ट घालून जुने कपडे व चप्पल तेथेच सोडून दिली.तसेच त्यांच्या समोर असलेल्या अविनाश काटे यांच्या हॉटेलच्या टपरीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी उचकापाचक केली.मात्र त्या ठिकाणी चोरट्यांना चिल्लर सोडून फारसे हाती काही लागले नाही.चोरट्यांनी सुनील गटणे यांचे संकेत बिअर शॉपी फोडून तेथील काही रोकड व माल लंपास करुन पोबारा केला.आलेशा कलेक्शनचे अमित शेख यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात चोरी बाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली.तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.मात्र श्वान पथक आलेशा कलेक्शन पासून दोनशे मीटर अंतरावर संकेत बिअर शॉपी पर्यंत गेले व पुन्हा आलेशा कलेक्शन जवळ येऊन थांबले.चोरट्यांनी या ठिकाणाहून गाडी चा वापर केला असावा असा पोलीसांचा कयास आहे.

Crime
नेवासा, प्रतिनिधी
नेवासा व नेवासाफाटा परिसरात विशिष्ठ जातीचे गुन्हेंगारी पार्श्वभूमी आसणारे सराईत चोरटे मोहळ विकण्याचा बहाणा करुन दिवसभर मद विकण्यासाठी परिसर पिंजून काढून राञी चोऱ्या व घरफोड्या करत आसल्याचे उघड झाले आसून हे गुन्हेगारी पार्श्वभूमी आसणारे सराईत गुन्हेगारांनी नेवासा फाटा येथे बस्तान बसवून दिवसा हेरगिरी करुन राञी चोऱ्यांचे सञ सुरु केले आहे.
  नेवासा शहर व परिसरात मद विकण्यासाठी मोहळ घेवून फिरण्याचा उद्योग सराईत गुन्हेगार करुन दिवसा बंगले रस्ते दुचाक्या बघून राञी चोऱ्यांचा सपाटा सुरु केलेला आहे.नेवासाफाटा येथील श्रीमती आलका मगर यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या मालकीची पल्सर मोटारसायकल गेल्या आठ दिवसांपुर्वी गुन्हेगारांनी चोरुन नेवून चोरीच्या गुन्ह्यात वापरल्याचे उघड झाले आहे.नेवासाफाटा व परिसरात दररोज राञी चोऱ्या होत आसून अनेक दुचाक्या लंपास करण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आसून भेंडा बुद्रूक येथे संतनागेबाबा देवस्थानची दानपेटी फोडून सोनाराचे दुकाणही फोडण्यात आलेले आसून नेवासा पोलिसांनी मद विकण्याचा बहाना करुन चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर खाकीचा हिसका दाखविण्याची मागणी जनतेतून व्यक्त केली जात आहे.नेवासा पोलिसांकडून गुन्हेगारांवर अंकूश नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरात पोलिसांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त होत आहे.

श्रीसंत नागेबाबा मंदिरातील दानपेटीसह एक लाखाचा ऐवज लंपास

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावात काल मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून भेंडा गावचे ग्रामदेवत श्रीसंत नागेबाबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलुन नेली आहे तर बसस्थानक चौकातील पंडित सराफ हे सोने-चांदी विक्रीचे दुकान फोडण्यात आले आहे.

सोमवारी दि.18 नोव्हेंबर पहाटे 3 वाजता पुजारी अशोक परशराम गव्हाणे हे मंदिरात साफसफाई साठी  आल्याने  मंदिराचा पूर्वेकडील मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.आत मंदिरात पाहिले असता मंदिरातील दानपेटीत गायब असल्याचे लक्षात आली.त्यानंतर त्यांनी लगेच ही घटना मंदिर विश्वस्त व गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज वरून काल रविवार दि.17 रोजी रात्री  1:13 मिनीटांनी 6 चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे मंदिरात असल्याचे स्पष्ट होत आहे.
या चोरीत चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची दानपेटी आतील पैसे व ऐवज 60 ते 65 हजार रुपये असे अंदाजे  1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.मागील महिन्यात दानपेटी उघडून आतील जमा रक्कम बँकेत जमा करण्यात आली होती.
तर दुसऱ्या घटनेत भेंडा बसस्थानक चौकातील नागेबाबा मंदिर रस्त्यावर असलेले सागर पंडित यांचे पंडित सराफ या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली आहे.अजून प्रत्यक्ष मोजदाद न झाल्याने  नेमका किती ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप समजलेले नाही.

नागेबाबा मंदिरात दुसऱ्यांदा दानपेटीची चोरी...
या पूर्वीही 4 ऑगस्ट 2016 रोजी श्रीसंत नागेबाबा मंदिराचे मुख्य प्रवेश व्दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दान पेटी,सीसीटीव्ही कॅमेरा मशीन(डीव्हीआर)  व रोख रक्कम असा 89 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती.या घटनेचा अद्याप ही तपास लागलेला नाही.

नेवासा,प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नेवासा येथील पठाण यांच्या वाड्याचे छत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता याबाबत आमदार शंकरराव गडाख यांनी शासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे  पठाण कुटुंबीयांना सोळा लाखाची आर्थिक मदत देण्यात आली. सदरचे धनादेश आमदार शंकरराव गडाख यांच्याहस्ते पठाण परिवाराकडे सुपूर्त करण्यात आले.
     अतिवृष्टीत दि.२३ ऑक्टोबर रोजी पाऊस पडत असतांना रात्री ८.३० च्या सुमारास पठाण कुटुंब जेवत असतांना पठाण कुटुंबातील जाफरखान मेहताबखान पठाण,आमनखान उर्फ उसानाखान जाफरखान पठाण,
नर्गिस सहजादेखान पठाण,रिजाला उर्फ बीबी रहेमतुल्ला खान पठाण यांचा वाड्याचे छत अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता.या घटनेने पठाण कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. सर्व गावाने या घटनेबाबत दुःख व्यक्त करून दुःखवटा पाळला होता.
    याबाबत नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती त्यानुसार चार लाखांचे दोन धनादेश तर आठ लाखाचा एक धनादेश असे एकूण १६ लाख रुपयांचे धनादेश आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते रहेमततुल्ला खान उर्फ रम्हूशेठ पठाण,शहजादेखान पठाण,खुर्शिदा बेगम जाफरखान पठाण या वारसांकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,पठाण कुटुंबीयातील सदस्य जातीय सलोखा समितीचे सदस्य असिफभाई पठाण उपस्थित होते.

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget