युवा व्यावसायिक नितीन एडके यांचा परदेशात सन्मान

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी सारख्या दुष्काळी तालुक्यात बांधकाम व्यवसायात गगन भरारी घेणाऱ्या नितीन एडके या २४ वर्षीय युवा व्यावसायिकाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला.इंटरनॅशनल बिझनेस कॉन्फरन्स दुबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा युवा बांधकाम व्यावसायिक २०१९ हा पुरस्कार नितीन एडके यांना प्रदान करण्यात आला.
दुबई येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात एडके यांना बक्षिस व सन्मानपञ देऊन सत्कार करण्यात आला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा व्यावसायिकांना या समारंभात सन्मानित करण्यात आले.दुबई येथील नामाकींत व्यावसायिक दिनेश प्रधान यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी शिवव्याख्याते प्रा.नामदेव जाधव,दिलीप ठाणेकर,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन एडके यांना वडीलोपार्जित पाच एकर जिरायती शेती आहे.तालुक्यात सतत असलेल्या दुष्काळाच्या छायेमुळे शेतीच्या जीवावर उपजिवीका करणे कठीण होते.बांधकाम व्यावसायात मोलमजुरी करुन त्यांनी बांधकाम व्यावसायाचे रोपटे लावले.मुलगा नितीन याला सिव्हिल इंजिनियर बनवले.तर एक मुलगा भारतीय नौदलात देशसेवा करत आहे.वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी नितीन यांनी ए.एन.गृप ऑफ बांधकाम व्यावसायिक कंपनीची स्थापना केली.ग्राहकांचा विश्वास हाच प्रगतीचा मार्ग या तत्वावर काम केले.थोड्याच कालावधीत हा व्यवसाय मोठ्या शहरात जाऊन पोहचला आहे.शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.युवकांनी परीस्थीतीवर रडण्यापेक्षा नवनवीन कल्पना आखून व्यवसाय करायला हवा.नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असा संदेश एडके देतात.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget