जिल्हापरीषद परीषद मराठी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन
चांदेकसारे (वार्ताहर )
मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत दैनंदिन व्यवहारातील आर्थिक -देवाण घेवाण या विषयी ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहीती शालेय समिती व्यवस्थापन समिती अध्यक्ष डाँ सुनिल होन यांनी चांदेकसारे येथे जिल्हापरीषद परीषद मराठी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन घेण्यात आला यावेळी बोलताना केले . अध्यक्षस्थानी सुधीर जावळे होते
,विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी भेंडी.डांगर टोमॅटो .मेथी बटाटे उपवासाची पदार्थ पाववडे भजी वेफर्स विक्रीसाठी आणली पालकांनी पैसेदेऊन खरेदी केली यामध्ये अंदाजे पाचहचार रु उलाढाल झाली. पालकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता यावेळी शाळाव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बालआनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सिताराम गुरसळ वाल्मिक खंडीझोड विलास शिंदे राजेंद्र पोटे किरण गायकवाड गायञी बुरकुले आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले प्रास्तविक राजेंद्र पोटे यांनी केले सुञसंचलन सिताराम गुरसळ यांनी केले वाल्मिक खंडीझोड यांनी आभार मानले.




















