नेवासा शहरात दुर्गाभवानी ज्योतीचे सुवासींनीकडून पंचारती ओवाळून उत्स्फूर्त स्वागत

नेवासा 
नेवासा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुर्गादेवी मंदिरातील दुर्गा भवानी ज्योतीचे नेवासा येथे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत मोहटादेवी गडावरून दुर्गाभक्तांनी ही ज्योत आणली.या ज्योतीचे फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.
यावेळी नेवासा शहरातील विविध तरुण मंडळांच्या वतीने मोहटादेवी गडावरून ज्योती आणण्यात आल्या. नेवासा येथील श्री मळगंगा देवी मंदिरात देवीभक्त रेणुकादास घोलप व सौ.सुमनताई घोलप,रामभाऊ घोलप,सौ.ज्योती घोलप यांनी स्वागत केले तर एस.टी. स्टँड मध्ये ज्योत आल्यानंतर मार्केट कमिटीचे माजी सहसचिव बाळासाहेब पारखे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आढाव,प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे,अभिषेक गाडेकर,शिवसेनेचे राजेंद्र काळे, अँड.बाळासाहेब कराळे, अंबादास लष्करे,पिंटु जिरे,जालिंदर गवळी,कृष्णा परदेशी, यांनी दुर्गाभवानी ज्योतीचे पुष्पहार घालून स्वागत केले.
या दुर्गाभवानी ज्योतीचे दुर्गादेवी मंदिरात आगमन झाल्यानंतर मंदिर जेष्ठ पत्रकार रामभाऊ पठाडे,विश्वस्त सुधीर जामदार, सुधीर चव्हाण,राजेंद्र पठाडे, विलास शिंदे,देवभक्त पुजारी सुभाष चव्हाण यांनी स्वागत केले नमापाटील कडू यांनी स्वागत केले तर सुवासींनीनी पंचारती ओवाळून ज्योतीचे दर्शन घेतले.
नेवासा शहरातील दुर्गादेवी तरुण मंडळ,शिवएकता तरुण मंडळ,श्रीकृष्ण तरुण मंडळ,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान,श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळ,संत सावता युवक मंडळ यांच्या वतीने काढण्यात आलेल्या ज्योतीचे ही दुर्गादेवी मंदिरात स्वागत करण्यात आले.घटस्थापना प्रसंगी युवकांचा उत्साह मोठया प्रमाणात दिसून येत होता त्यामुळे नेवासा नगरीतील वातावरण दुर्गामय बनले होते.दुर्गादेवी मंदिरात बाळासाहेब पारखे यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget