शिंदेवस्ती शाळेत ‘संकल्प मतदानाचा’कार्यक्रम.

चांदेकसारे(वार्ताहर ) 
मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो,मतदानासाठी वेळ काढा,आपली जबाबदारी पार पाडा.मतदान करूया,देश घडवूया.’यासारख्या विविध घोषणा देत कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील माधवराव बारकुजी पाटील शिंदे जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्ती नवीन येथील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती केली.मतदानाचे कर्तव्य सर्वांनी पार पडावे यासाठी 'संकल्प मतदानाचा' हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.प्रारंभी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून मतदानाचा अधिकार वापरण्याचे नागरिकांना आवाहन केले.मतदानाबाबद लोकांच्या मनात कर्तव्य भावना निर्माण होण्यासाठी पालक व ग्रामस्थ यांच्याकडून संकल्पपत्रे भरून घेण्यात आली.मतदान जनजागृतीसाठी चित्ररंगभरण स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धा राबविल्या गेल्या.मुख्याध्यापक सचिन आढांगळे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी काळू मुठे,मंगल देशमुख,संगीता औताडे यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षणविस्तार अधिकारी श्रीम.मीनाक्षी पेंडभाजे व केंद्रप्रमुख आर.के.ढेपले यांनी सदर उपक्रमाबाबद विध्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget