सोनईत सर्व जाती-धर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
सोनई
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक मार्ग ( दिंडोरी प्रणित) विवाह संस्कार विभागाच्या वतीने दि.9/11/2019 रोजी दहा ते पाच या वेळेत सोनई (ता.नेवासा) येथिल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे सर्व जाती-धर्मीय वधू- परिचय मेळावा आयोजित केले आहे. नाव नोंदणी व प्रवेश विनामुल्य असुन मेळाव्याची जोरदार तयारी तालुक्यातील सर्व सेवेक-यांनी केली आहे.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून विवाह मेळाव्यास प्रारंभ होणार आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातुन अनेक विवाह जुळविले जात असून, या मेळाव्यात विविध जाती धर्माच्या उपवर युवक-युवतींची मोफत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. या सर्वांची माहिती विवाह संस्कार विभागाच्या वेबसाईट वर प्रकाशित होईल. तसेच विवाह
इच्छुकांना विवाह स्थळांची माहिती प्रिंट सेवेद्वारे , ऑनलाइन सेवे द्वारे हि उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Post a Comment