कपाशी कीड व नियंत्रण याविषयी मार्गदर्शन
नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा
तालुक्यातील माळेवाडी खालसा येथील मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब
पाटील यांच्या फॉर्मवर आयोजित कृषी विषयक मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला यावेळी कपाशी कीड व नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करण्यात आले.
राशी
सिड्स कंपनी यांच्या वतीने यावेळी झालेल्या कृषी मार्गदर्शन शिबीर प्रसंगी
कृषी विभागाचे अधिकारी लक्ष्मण सुडके,राशी सिडस कंपनीचे राम जाधव,श्री
उकिरडे,निखिल नागे, प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील,मुळा कारखान्याचे संचालक
बाळासाहेब पाटील, माजी सरपंच राहुल पाटील,महेश कोठारी,कैलास डावखर, संजय
ललवाणी,माजी सरपंच मुरलीधर खेमनर, बाळासाहेब कदम,माधवराव शिंदे,मोहनराव
पवार, सत्यवान मोहन,शंकरराव पाटोळे प्रमुख म्हणून उपस्थित होते तर
प्रवरासंगमचे सरपंच सुनील बाकलीवाल मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी
उपस्थित शेतकऱ्यांचे प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील यांनी स्वागत
केले.यावेळी अमोल पाटील गणेश पाटील योगेश पाटील,माजी सरपंच राहुल पाटील
यांनी
राशी सिडस कंपनीच्या लावलेल्या कपाशी पिकाची पहाणी केली तसेच दमदार कपाशी
आढळून आल्याने कंपनीच्या वतीने कृषी विभागाचे अधिकारी लक्ष्मण सुडके यांचा
सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी
झालेल्या मेळाव्यात कृषी विभागाचे अधिकारी लक्ष्मण सुडके यांनी पीकावरील
कीड नियंत्रणाबाबत कमी खर्चात घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना
माहिती दिली.यावेळी अद्रक व कपाशीची पहाणी करून त्यांनी उपस्थित प्रगतिशील
शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी
पाटील परिवाराच्या वतीने राशी सिडस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा व कृषी अधिकारी
लक्ष्मण सुडके यांचा सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.उपस्थित शेतकऱ्यांना
अल्पोपहार देण्यात आला.तर मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी
उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.

Post a Comment