October 2019

नेवासा, ( प्रतिनिधी)
निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येते बळीराजाला निसर्गाच्या तडाख्याच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आसल्याने निसर्ग शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याने यंदा नेवासा तालूका ओल्या दुष्काळाने ओलाचिंब न्हावून निघाला आहे शेतकऱ्यांची उभी पिकांची नासाडी झाली आहे.
  तालूक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी साचल्याने पिके सडण्याची वेळ आली आसून ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. कधी वरुणराजा शेतकऱ्यांना हुलकावणी देत आसल्याने पाण्या अभावी पिके वाळून जातात. तर एखाद्या वेळेस ओला दुष्काळ पडल्याने पिकांची नासाडी होते.निसर्ग शेतकऱ्यांचा पिच्छाच सोडायला तयार नसल्याने बळीराजा निसर्गाच्या लहरी कारभाराला कंटाळला आहे.बाजरी,मका,कापशीची प्रचंड नुकसान झाले आसून उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे व घराच्या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आसून ओला दुष्काळ पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आसले तरी आता पाण्याचा प्रश्न सुटला आसल्याने शेतकऱ्यांत 'कभीं गम कहीं खुशी'चे वातावरण बळीराजाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

नेवासा, (राजेंद्र वाघमारे)
नगर जिल्ह्यात 12-0 हा नारा उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला होता. पण आम्हला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही.अपयश का आले ? याची कारणे शोधले जातील.आत्मपरीक्षण करण्याची आमच्या सर्वांना गरज आहे. या निकालापासून मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. एक ते दोन महिन्यात जिल्ह्यातील अपयशाचे सर्व कारणे शोधले जातील असे खासदार डॉ.सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असे कोणी अधिकृत वक्तव्य केले नाही. त्यामुळे यावर बोलण्यात अर्थ नाही. जोपर्यंत याबाबत कोणी अधिकृत बोलणार नाही, तोपर्यंत मी यावर काही बोलणार नसल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले.
जिल्ह्यधिकारी कार्यलयात आज बुधवारी खा.विखे आले होते. त्यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलतांना विखे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत खासदार म्हणून जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात सभा घेतल्या. त्यानंतर देखील अपयश आले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती होती, म्हणून मला मताधिक्य मिळाले होते. बारा शून्याचा नारा हा उमेदवारांचे मनोबल वाढविण्यासाठी दिला होता. बीड, नाशिक, शिरूरसह ग्रामीण भागात अनपेक्षित निकाल लागले आहेत. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात देखील यश मिळाले नाही. जे पराभूत झाले त्यांच्याविषयी आम्हाला दुःख वाटत आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील उमेदवारांच्या पराभवाची कारणे शोधली जाणार असून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येकांची पराभवाची कारणे समोर येतील. त्यातून कोणाचा पराभव कशामुळे झाला याचे आम्ही सर्वजण आत्मपरीक्षण करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होते. त्यामुळेच मला खासदारकीच्या निवडणुकीत मताधिक्या मिळाले, माझ्या दक्षिण लोकसभा मतदार संघात चार आमदार निवडून आले आहेत. यांची अडचण मला माझ्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे पराभवाची कारणे मी स्वतः जाणून घेणार आहे. तसेच विखेची संपूर्ण यंत्रणा भाजपत होती.ती कायमच राहणार आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा शेवटपर्यंत प्रचार करत होता. आम्ही जनतेसाठी काम करतो. पक्षणे जी जबाबदारी दिली होती ती आम्ही समर्थपणे सांभाळली. अनेक मतदारसंघात सभा देखील घेतल्या, प्रत्येक ठिकाणी जाऊन विनंती केली. लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत काय निर्णय घेतले, याचे आम्ही आत्मचिंतन करणार आहोत. मला दुःख वाटत आहे की, आम्हाला जो अपेक्षित निकाल होता, तो लागला नाही यात माझे देखील मोठे नुकसान आहे, पक्षाने आमच्याकडे विचारणा केल्यास आम्ही त्यांना उत्तर देऊ असे खा.विखे पत्रकाराशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री यांना जिल्ह्यातून जाऊन जे भेटले,त्यांची बंद खोलीत काय चर्चा झाली,यावर तर्कवितर्क लावण्यात अर्थ नाही – डॉ.सुजय विखे

नेवासा मतदारसंघात अपक्ष म्हणून शंकरराव गडाख हे निवडून आले.त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने पुरस्कृत केले होते. गडाख यांनी भविष्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मात्र आम्ही बाळासाहेब मुरकुटे यांच्या सोबत राहणार असल्याचे खा.विखे यांनी सांगितले.

चांदेकसारे (वार्ताहर )
 तेरा वर्षानंतर एकञ येऊन मढीखुर्द मढीबुदृक देर्डेको-हाळे देर्डेचांदवड चार गावच्या छञपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी मढीखुर्द भागच्या माजी विद्यार्थांनी ओमसाई लाँन्स देर्डेको-हाळे येथे घेतला माजी विद्यार्थी,विद्यार्थींनी शिक्षकांचा मेळावा 
      अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गवळी होते.  यावेळी सदानंद सोनवणे भाऊसाहेब गवळी पांडुरंग दिघे सदाशिव कदम बाळासाहेब गुडघे राजेंद्र धेनक आबा भोर आर एन पगार एस एस खरनार काळे प्रकाश देशमुख  शिक्षकांना साईबाबांची तसबीर शालश्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले 
    वर्षा चासकर या माजी विद्यार्थींने साईनाथ स्तवन मंजुरी पुस्तक व साईबाबांची उदी देऊन गौरव केला 
    यावेळी सोनाली गाढे गणेश भागवत संदिप डुबे योगेश भागवत अविनाश गाढे वर्षा चासकर महेश आभाळे यांनी आम्ही कसे घडलो याची सविस्तर माहीती दिली 
    यावेळी शिक्षक पांडुरंग दिघे आबा भोर आर एस पगार सदाशिव कदम एस एस खरनार सदानंद सोनवणे भाऊसाहेब गवळी सौ काळे शिक्षकांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले 
   सर्व आजी माजी विद्यार्थांनी सर्वांच्या सुखदुखात सहभागी होऊन तसेच ब-याच वर्षानंतर एकञ जुन्या आठवनींना उजाळा देण्याचा उजाळा देण्याचा उदेश असल्याचे माजी विद्यार्थां महेश आभाळे यांनी सांगितले .
    योगिता आभाळे रुपाली टिळेकर ज्योती आभाळे वंदना गवळी संदिप डुबे ज्योती आभाळे गणेश आभाळे निलेश आभाळे महेश आभाळे प्रकाश देशमुख गोरक गवळी रामदास डुबे आदि विद्यार्थी उपस्थित होते 
   प्रास्तविक सुञसंचलन महेश आभाळे यांनी केले संदिप डुबे यांनी आभार मानले.

नेवासा, (प्रतिनिधी)
झी टॉकीज या वाहिनीवर नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमात नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती प्रसिद्ध युवा किर्तनकार व समाज प्रबोधनकार रामायणाचार्य वाणीभूषण हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासकर यांचे कीर्तन दि.३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ६ वाजता दाखविण्यात येणार आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या खास वक्तृत्व शैलीने हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी थोड्या कालावधीतच महाराष्ट्रात नावलौकीक मिळवला आहे.रामायणाचार्य ही पदवी त्यांना नाणीज धामचे महामंडलेश्वर जगदगुरू नरेंद्रजी स्वामी महाराज यांनी प्रदान केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या वाणीने त्यांनी समाजाला जागृत करण्याचे काम त्यांनी आपल्या खास विनोदी शैलीत केले आहे
झी वाहिनीवर ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत सुरू होणाऱ्या नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम साधना आश्रमाचे महंत गुरुवर्य सुनीलगिरी महाराज व भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

राजकिय निरिक्षकांच्या भुवय्या उंचवल्या !


नेवासा, (प्रतिनिधी)
नेवासा विधानसभा निवडणूकीत दोन साखर सम्राटांमधील चिघळलेला वाद शमवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांनी महत्वाची भूमिका घेवून माजी आमदार चंद्रशेखर घुले व शंकरराव गडाख यांच्यातील राजकिय युद्ध संपुष्ठात आणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणूकीत उमेदवार न देता घुले बंघूनी अपक्ष उमेदार गडाख यांना विजयी केले. माञ गडाख विजयी झाल्यानंतर त्यांनी सेनेला पाठींबा दिल्याने जिल्ह्यात राजकिय निरिक्षकांच्या चांगल्याच भुवय्या उंचवल्या आसून गडाखांच्या पाठिंबा निर्णायाच्या खेळीने नगर जिल्ह्यात चांगलेच चर्चेचे काहूर माजले आहे.
  नेवासा विधानसभा निवडणूक ही अटीतटीची होवून तीस हजाराच्या मताधिक्याने गडाख विजयी झाले त्यांना राष्ट्रवादीने मोठी मेहनत घेवून विजयी केले आमदार झाल्यावर भाजपा अन् सेनेचे नेते गडाखांच्या संपर्कात लागून राहीले अखेर त्यांनी सेनेला पाठिंबा दिला.अर्थात त्यांच्या पाठिंबा खेळीचे नाट्य विचारपुर्वक आसले तर तालूक्यात गडाखांनी राष्ट्रवादीच्या जिवावर निवडून येवून सेनेला पाठिंबा दिला कसा अशा चर्चा झडतांना दिसत आसून गडाखांच्या निर्णयाचा राजकिय निरिक्षक कस लावतांना दिसत आहेत.

नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा येथील अहिल्यानगर प्रभागात रहाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या माजी आदर्श शिक्षिका श्रीमती शांताबाई आसाराम बहिरट उर्फ आवारे बाई यांचे नुकतेच निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते.
    कै.बहिरट उर्फ आवारे बाई यांच्या मागे एक मुलगा किशोर बहिरट,एक मुलगी सुरेखा माळवदे,भाया,दिर, जावा,नातू असा परिवार आहे.नेवासा येथील जिल्हा परिषद शाळा,कडा कॉलनी येथील जिल्हा परिषद शाळेत श्रीमती शांताबाई बहिरट उर्फ आवारे बाई यांनी उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य केले त्यांच्या निधनाने अहिल्यानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव बहिरट यांच्या त्या भावजई होत्या.

नेवासा, (प्रतिनिधी)
लोकशाहीमध्ये जय - पराजय हा ठरलेला आसतो पराभवामुळे खचून न जाता जनतेच्या ऋणात राहून ८५ हजार लोकांनी निवडणूकीत विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला तडा न लागू देता सदैव त्यांच्या पाठीशी राहून पुढील वाटचाल करण्याची व्युहरचना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आसून शनिवार (दि. २ रोजी) देवगांव येथे त्यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या फराळ कार्यक्रमाचे आयोजन केली आहे.तर विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी शुक्रवार (दि.१) रोजी सोनईतही फराळ कार्यक्रम आयोजित करुन जनतेच्या ऋणात राहण्याची राजनिती आखल्यामुळे आगामी काळात आजी - माजी आमदार राजकारणात सक्रिय राहण्याचे संकेत दिवाळी फराळातून स्पष्ट होतांना दिसत आहेत.
   माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडे जनाधार नसतांना केवळ गडाखांवर नाराजी म्हणून मागील निवडणूकीत मुरकुटेंचा विजय झाला शुन्यातून विश्व निर्माण करुन त्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला. तर गडाख यांनी या निवडणूकीत जनता - जनार्धन हीच आपली कवचकुंडल समजून कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून सत्तेचे गणित जळवून घेतले.शंकरराव गडाख यांचा स्पष्टोक्ता सभाव जनतेला भावला.त्यामुळेच गडाखांनी बाजी मारली.गडाखांनी - मुरकुटेंवर खालच्या स्थरात जावून टिका केली नाही मुरकुटे अन् युवानेते प्रशांत गडाख यांच्यात टिकेचे शितयुद्ध  चांगलेच रंगले होते. माञ निवडणूक झाल्यानंतर युवानेते प्रशांत गडाख यांनी पराभत उमेदवार मुरकुटेंसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे,उद्सोगपती प्रभाकर ससे यांची भेट घेतली. तर विजयी आमदार गडाख यांनी मी सुद्धा मागचे विसरलो आसल्याची मार्मिक प्रतिक्रिया दिली. असे आसतांना आजी - माजी आमदारांनी दिवाळी फराळ आयोजित करुन पुन्हा रणांगण सक्रिय ठेवणार आसल्याचे या फराळातून अस्पष्टरित्या संकेत दिले आहेत.

पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथील आबासाहेब म्हस्के यांनी स्वतःच्या विहीरीत पडलेला साप पाहील्यानंतर सर्पमिञ आकाश जाधव यांच्याशी संपर्क केल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी सर्पमिञ आकाश जाधव व त्याच्या सहकारी मिञांनी किंग कोर्बौ जातीच्या विषारी सापाला सर्प मिञ आकाश जाधव व सहकारी मिञ अतुल पाखरे,ऋषिकेश जाधव,निलेश साळवे,ऋषिकेश परदेशी,नवाज शेख यांनी  घटनास्थळी जावून अडचणीत असलेल्या सापाला विहीरीच्या बाहेर काढून सर्प मिञानी जिवदान दिले आहे.विहीरीत पाणी खूप असल्याने साप विहीरीच्या बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होता.सर्प मिञाशिवाय त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते.आकाश जाधव यांनी   रस्सीच्या साहाय्याने विहीरीत जावून त्याचे प्राण वाचविले.
विहीरीतून बाहेर काढल्यानंतर त्या सर्पाबद्दल माहीती दिली.तसेच त्याला इजा झाली असल्याचे सांगितले.सापाला विहीरीतून बाहेर काढत एक प्रकारे जिवदान दिले आहे.तसेच त्या सापाला जंगलात सोडून देण्यात आले.
सर्पमिञ आकाश जाधव व त्याचे सहकारी अहमदनगर शहरात वाईल्ड लाईफ रेस्कयू संघटना असून जिल्ह्यात सर्पमिञ  म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांनी आत्ता पर्यंत अनेक सापांना जिवदान दिले आहे.

नेवासा, (प्रतिनिधी)
नुकत्याच घेण्यात आलेल्या रेल्वेच्या आय.ए. एस.च्या परीक्षेत नेवासा येथील कुमारी काजल
दीपक देशमुख हिने देशात अठराव्या क्रमांकाने तर मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांकाने उतीर्ण होण्याचा बहुमान मिळविल्याने तिने महाराष्ट्रासह नेवासनगरीची मान उंच केली आहे तिच्या या विशेष यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
        कु.काजल हिच्या या यशाबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.कु.काजल ही माजी सैनिक मेजर दीपक देशमुख यांची कन्या आहे.मेजर दीपक देशमुख यांनी देशाच्या सीमेवर एकेकाळी अहोरात्र सेवा केली हीच देशभक्ती मनात ठेवून कु.काजल हिने देखील रेल्वे विभागाच्या माध्यमातून आय.ए. एस. अधिकारी होऊन देशसेवा करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे यामुळे देशमुख परिवारासह मित्र परिवार व नातेवाईकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
          कु.काजल हीने इयत्ता १२ वी नंतर पुणे येथील सी ओ पी कॉलेज मध्ये मॅकेनिकल इंजिनियरिंग केले तर दोन वर्षे वाराणशी येथील हिंदालको येथे नोकरी केली त्यानंतर एक वर्षे युपीएससी वर अभ्यास करून तिने अत्यंत मेहनतीने हे यश संपादन केले आहे.भारतात रेल्वेमध्ये आय.ए.एस. अधिकारी झाल्याबद्दल तिचे विविध स्थरावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

नेवासा, (प्रतिनिधी)
ब्रम्हलिन सदगुरू नारायणगिरी महाराज यांचे हेमाडपंथी मंदिर कुशल दगडी बांधकाम करून उत्कृष्ट कारागिरीचे दर्शन घडविणारे नेवासा येथील मूर्तिकार बजरंग ईरले यांचा गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
   नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रोडवरच पदमश्री माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या पुढाकाराने मूर्ती शिल्पकार बजरंग भिमा ईरले आणि चिरंजीव कमलेश बजरंग ईरले ,विलास बजरंग  ईरले, कैलास बजरंग ईरले आणि इतर सह कारागीर आभा आळपे,राम धोत्रे, आमोल धोत्रे कीरण ईरले, किशोर धोत्रे, संपत धोत्रे यांनी या मंदिर बांधकामासाठी अहोरात्र परिश्रम घेतले होते.जुन्या हेमाडपंथी शिल्पकलेचे  दगडी बांधकाम
करणे हे आजच्या युगात जिकरीचे काम होते मात्र शिल्पकार बजरंग ईरले यांनी अत्यंत मेहनतीने हे काम पूर्ण केले आहे बजरंग इरले यांच्या या उत्कृष्ट कारागिरी बद्दल गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
     दगडी बांधकाम असलेले सदगुरू नारायणगिरी महाराजांचे हेमाडपंथी मंदिर बांधणे हे देखील ईच्छा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे होते दगडी बांधकाम असलेले हेमाडपंथी मंदिर बांधून पूर्ण केल्याबद्दल गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक व शिल्पकार बजरंग ईरले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

चौकट:-नेवासा येथील दगड हा राज्यात प्रसिद्ध आहे,जेजुरी गडावर जीर्ण झालेल्या पायऱ्यांना ही नेवासा येथील दगड वापरण्यात आला आहे.विशेष म्हणजे खंडोबारायाची सासुरवाडी ही नेवासा आहे म्हाळसादेवीचे माहेर आहे हा योगायोग समजला जातो.

तीन सुवर्ण,पाच रौप्य,तीन कांस्य पदकांची कमाई


नेवासा(प्रतिनिधी)
राष्ट्रीय शालेय आष्टेडु आखाडा स्पर्धेत नेवासा येथील राजे मल्टीस्पोर्ट अकॅडमी व राजे शिव कालीन मर्दानी खेळ अँकेडमी च्या खेळाडूंनी तीन सुवर्ण पदके,पाच रौप्य पदकांसह तीन कांस्य पदकांची कमाई करत विशेष यश संपादन केले.
    स्कूल गेम फेडरेशन इंडिया व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने उमादत्त पब्लिक स्कूल ढोलपूर (राजस्थान)येथे दि.२० ते २४ ऑक्टोबर २०१९ रोजी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सीबीएससी स्कूल, राजस्थान, महाराष्ट्र,दिल्ली,गुजराथ,आंध्रप्रदेश, आसाम,
विद्याभारती,जम्मू काश्मीर इत्यादी राज्यातील संघ सहभागी झाले होते.
    यामध्ये १९ वर्षे वयोगटात नेवासा येथील प्रसाद मापारी याने सुवर्णपदक मिळविले,तसेच १७ वर्षे वयोगटात पूजा मिटकरे हिने सुवर्णपदक तर १४ वर्षे वयोगटात ज्ञानेश्वर तवले याने सुवर्णपदक मिळविले. तसेच १९ वर्षे वयोगटात
प्राजक्ता काकडे,अनिल सासवडे यांनी रौप्य पदक  तर १७ वर्षे वयोगटात भाग्यश्री यादव,धनश्री शिंगी,अभिषेक ढोकणे यांनी रौप्यपदक मिळविले.तसेच १९ वर्षे वयोगटात
दिव्या चक्रनारायण हिने कांस्यपदक तसेच १७ वर्षे वयोगटात वेद याने कांस्यपदक तर १४ वर्षे वयोगटात 
ओम आगळे याने कांस्यपदक मिळविले.
        या खेळाडूंना राजे मल्टी स्पोर्ट अँकेडमीचे प्रमुख मास्टर सुरेश लव्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले.क्रीडा प्रशिक्षक सूरज पटारे,दिनेश चक्रनारायण, अंजली निंबाळकर,आनंद वाघ,रोहन पोतदार,महेश काकडे या प्रशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
x

शेवगाव प्रतिनिधी  
शेवगाव नगर परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीला न दिल्यामुळे शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रणकंदन पेटवले. भर दीपावलीच्या सणामध्ये आरोग्य, पाणी या सेवांवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पहावयास मिळते. शहरामध्ये ठिकठिकाणी कचर्याचे ढीगच ढीग पहावयास मिळत आहेत. तसेच ऐन सणाच्या तोंडावर पाणी पुरवठा कोलमडलेला पहावयास मिळाला. पगार नसल्यामुळे कर्मचारी दररोज नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये येऊन पदाधिकारी व अधिकारी यांना जाब विचारताना दिसत आहेत. परंतु पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामध्ये कोणताही समन्वय असल्याचे दिसत नाही. यामुळे कर्मचारी वर्ग मात्र नाहक भरडला जात आहे. सणाला पगार नसल्यामुळे कर्मचारी मात्र आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहेत. व त्यांनी शहरातील कचरा काढण्यास मनाई केलेली आहे. दररोज येणारा कचऱ्याच्या घंटा गाडीचा आवाज दिवाळीच्या सणामध्ये कुठेही ऐकायला मिळत नाही. शहरामध्ये असणारा क्रांतिकारकांचे स्मरण असणारा क्रांती चौक येथील क्रांतिकारकांचा स्तंभही कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. शहरामध्ये मेन रोडला मात्र कचर्याचे ढीगच ढीग दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य दिसत आहे. यामुळे शहरमध्ये डेंगू मलेरिया टायफॉईड अशा साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे.पदाधिकारी व कामगार यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्यामुळे दररोज नगर परिषदेमध्ये पदाधिकारी व कामगार यांच्यामध्ये हमरीतुमरीच्या घटना पहावयास मिळत आहेत. नगर परिषदेचे मुख्यधिकारी मात्र आपली कोणतीही भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. त्यामुळे हा वाद वाढतच जात असल्याचे पहावयास मिळत आहे. कर्मचारी आपल्याला पदाधिकारी दमबाजी करत असल्याच्या तोंडी तक्रारी करत आहेत. मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा संपर्क केला असता ते मात्र फोन उचलत नसल्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. इकडे मात्र कर्मचारी व पदाधिकारी यांच्यामध्ये रणकंदन माजले आहे व याचा शहराच्या सार्वजनिक सेवांवर गंभीर परिणाम होत आहे.शहरामध्ये सडलेली झेंडूची फुले, रिकामी खोकी, प्लास्टिकच्या पिशव्या, जनावरांचे मलमूत्र, मेलेले प्राणी, पावसामुळे गटारी तुंबून बाहेर आलेले सांडपाणी, दुकानांचा कचरा, सडलेला भाजीपाला आणि प्रचंड दुर्गंधी असे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न मात्र सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसत आहे.

नेवासा,(प्रतिनिधी)
प्रसिद्ध मराठी चिञपट "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" या सुप्रसिद्ध चिञपटाच्या कथानकात राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आसल्याचे दाखवून देत चिञपटात समाजप्रबोधन  झाले. राजकारणी लोक सत्ता मिळविण्यासाठी ऐकमेकांवर टिका - टिप्पणी व कुरघोड्यांचा डाव - प्रतिडाव खेळून जनतेला उल्लू बनवून सत्ता काबिज करण्याचा प्रयत्न करत आसतात हे जनतेने बघितलेले आसून चांगल्या वाईट गोष्टींबाबत लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पञकारितेतून याबाबत समाजात चांगल्या - वाईट घटनांकडे लक्ष केंद्रीत करुन वाचा फोडली जाते त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच नेवाशात पोखरण्याचे काम करुन पञकारितेचे भांडवल करुन पञकारतेच्या माध्यमातून जनतेला उल्लू बनविण्याचा डाव खेळला गेला माञ तरीही येथील पञकारांनी एक चकार शब्दाचाही निषेध केला नसल्याने पञकार राजकारण्यांचे हातचे बहूले तर बनले नाही ना ? अशी शंकाच उभी राहीली.
   नेवासा विधानसभा मतदार संघात १७ उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते.भाजपाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्यामध्येच खरी लढत होवून गडाखांनी या निवडणूकीत बाजी मारली.निवडणूक प्रचार काळात मुरकुटेंनी गडाखांवर तर गडाखांनी मुरकुटेंवर राजकिय कुरघोड्याचा डाव - प्रतिडावाचा निवडणूकीत भडीमार केला.प्रचार काळात नेवासा येथे एक चतु:सिमा नावाचे साप्ताहिक वस्तूस्थितीच्या भडक बात्तम्या देत होते.कधी गडाखांवर तर कधी मुरकुटेंच्या चांगल्या वाईट पराक्रम प्रसिद्ध करत होते. या निवडणूकीच्या काळातच चतु:सिमाचा  बनावट चतूरसिमा असा बनावट अंक काढून मुरकुटेंची ४८ कोटींची उरण येथे कंपणी आसल्याचे अंक छापून वाटले गेले त्यामुळे चतु:सिमा आणि चतुरसिमा मिळते जुळते नांव आल्याने चतु:सिमाच्या संपादकाला या अंकाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगून निषेध केला.अंक कोणी छापला कोणी वाटला या फंदात पञकारांना पडायचे नाही माञ आज पर्यंत राजकारणी पञकारांना हाताशी धरून एकमेकांचे उट्टे काढतात असा समज होता माञ राजकारण्यांनी पञकारांचेच भांडवल नेवाशात करुन डाव साधला गेला आहे.तरी येथील पानटपऱ्या प्रमाणे पञकारांच्या आसलेल्या संघटनांनी साधा निषेधही केला नसल्याने येथील पञकार राजकारण्यांच्या हातचे बाहूले तर झाले नाही ना ? अशी शंका अनेकांच्या मनात घर करुन बसल्याचे वास्तवचिञ निर्माण झाले आहे.

नेवासा,(प्रतिनिधी)
शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी  पाडव्याच्या निमित्ताने माजी खासदार जेष्ठनेते यशवंतराव गडाख व नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांची नार्वेकर यांनी सोनई येथील गडाख यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी मंगळवार (दि २८) रोजी थेट मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले.
   नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आलेले आहेत. ते कुठल्या पक्षात जातील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.मात्र सोमवार (दि.२८) रोजी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे माजी खासदार जेष्ठनेते यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी सोनई येथे आल्यानंतर कुटुंबीयांसोबत काढलेला फोटो आमदार शंकराव गडाख यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि दुपारनंतर नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख हे मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट देवून पाठिंब्याचे पञ देत शिवसेनेत दाखल झाले
   त्यामुळे आता गडाख कुठल्या पक्षात जातील या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.नवनिर्वाचित आमदार गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर बोलतांना सांगितले की, मी ग्रामिण भागातील समस्याचा निपटारा करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देत आसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. गडाख यांनी सेनेला पाठिंबा दिल्यानंतर सोशल मिडियावर नामदार गडाख असे संदेश व्हायरल होत आसतांना दुसरीकडे ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटलांच्या मदतीने गडाख यांनी विजय मिळविला त्या आमदार गडाखांनी सेनेला पाठिंबा देवून राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला आसल्याच्या टिकेचा भडीमारही एकीकडे होत होता. गडाख यांच्याकडे गेले दोन - तीन दिवस राष्ट्रवादी,भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधला माञ त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला अन् नेवाशात गडाख नामदार असे संदेश सोशलमिडिवावर झळकू लागले आहेत.त्यामुळे सरकारमध्ये गडाखांना लालदिवा मिळणार आसल्याची चाहूल नेवासकरांना लागली आहे.

 झेंडु २० रु.,शेवंती ३० रु.किलो, भाव कोसळले

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील परीसरातील मुख्य बाजारपेठ समजली जाते.तिसगाव मध्ये वस्तू,कपडे, भेटवस्तू,फराळ मिठाई खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात दुकानात परीसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी दिसून आली.येथे  झेंडुच्या फुलांचे भाव ४० रु.किमतीने  व्यापाऱ्यानी विक्री केली.सकाळ पासूनच झेंडु,शेवंती फुले बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच शेतकऱ्यांनी आणली होती.वर्षाअखेर असणाऱ्या दिपावली सणामुळे झेंडुच्या फुलांच्या किमती कमी झाल्या असे काही फुले विक्रेत्यानी सांगितले.दिपावली सणानंतर झेंडु,शेवंती फुलांची विक्री होईल असा कोणताही सण उत्सव नाही.यामुळेच व्यापारी व शेतकऱ्यांनी झेंडुची फुले बाजारात विक्री साठी मोठ्या प्रमाणात आणली होती.परीसरातील पारेवाडी,कासार पिपंळगाव,हनुमान टाकळी,मढी,मांडवे,घाटशिरस,चितळी भागातील लोकांसाठी तिसगाव मधील बाजारपेठ महत्त्वाची समजली जाते.
दिपावलीसाठी फटाक्यांच्या दुकाने तिसगावात लागलेली आहेत.फटाके खरेदीसाठी तरुण मुले खरेदी गर्दी करत आहेत.

घड्याळात बँटरी शिल्लक न ठेवण्याची वल्गना फेल ! पराभूत आमदार विखेंवर फोडताहेत खापर ?


नेवासा,(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यात घड्याळात नावालाही बँटरी शिल्लक राहणार नसल्याची निवडणूक काळात जाहीर सभेत मोठ्या राणाभिमदेवी थाटात बोलणाऱ्या विखे पिता - पुत्रांची वल्गना फेल ठरली आसून नगर जिल्ह्यात भाजपाच्या पराभूत उमेदवारांनी विखेंच्याच अंतर्गत कुरघोड्याच्या राजकारणातून आमचा पराभव केल्याचे विधानसभा निवडणूकीच्या राजकीय मैदानात कार्यकर्त्यांतून बोलले जात आसून विखेंमुळे पक्ष वाढला नाहीतर अस्थित्वच कमी झाल्याचे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
  नेवाशात बाळासाहेब मुरकुटे,राहूरीत शिवाजी कर्डीले,कोपरगावांत स्नेहलता कोल्हे तर कर्जत - जामखेडमध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला विखे पाटील भाजपात आल्याने पक्षाला बळकटी येईल असे वाटत होते विखे पिता - पुत्रांनी नगर जिल्ह्यात घडाळात बँटरी नावालाही शिल्लक राहणार नसल्याचे जाहीर सभेतून सांगितले मात्र गणितच उलट झाल्याने स्वपक्षातील विखे विरोधी गट तयार झाला आसून विखे - पाटलांविरुद्ध जिल्ह्याच्या राजकीय मैदानात नाराजीचा सुरु निर्माण झाला आसून सरकार बनले तर त्यांना मंत्रिमंडळात घेवू नये यासाठी विघ्नसंतोषी पराभूत आमदारांचे कटकारस्थान पडद्यामागून व्युहरचना आखतांना दिसत आसल्याचे बोलले जात आहे.
   नगर जिल्ह्यातील पराभूत आमदारांच्या कार्यकर्त्यांमधून विखे पाटलांमुळे आमचा राजकीय गेम झाल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत सुटले आसून विखेंविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विखे पिता - पुत्रांना भाजपात घेवून नगर जिल्ह्यात कमळ पावर फुल्ल होण्याची दिव्यस्वप्न पहाण्याचा योगायोग जुळून न येता घड्याळ्याची बँटरीच पावरफुल्ल झाल्याने पक्षश्रेष्ठींनी काय बोध घ्यावा असा सुरुही निर्माण झाला आहे.

Candle
नेवासा,(प्रतिनिधी)
ऐन दिपावलीच्या मंगलमय सणात महावितरणच्या दे धक्यामुळे नेवासा तालूक्यातील जनतेतून नाराजीचा सुर निर्माण झाला आसून विजेच्या लपंडावामुळे दिपोत्सवाच्या सणाला महावितरणचा खो निर्माण झाल्याने विज वितरणच्या कारभाराबाबत जनतेतून संतापाची लाट उसळली आहे.
  दिवसातून अनेकदा महावितरणचा खो - खो सुरु झाला आसल्याने ऐन सणासुदीच्या मंगलमय आनंदात महावितरण कंपणीने विरजण घातले आसून महावितरणने हा लपणडाव बंद करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

हातचे पिक वाया जाते कि काय ? शेतक-यांपुढे चिंता, भरघोस मदतीची सरकार कडुन अपेक्षा.

चांदेकसारे (वार्ताहर ) 
       परीसरात शेतक-यांनी काबाडकष्ट करुन तसेच प्रसंगी व्याजाने पैसे काढुन सोयाबीन .बाजरी मका.फळबागांची पेरणी केली पिकेही चांगल्या प्रकारे डवलु लागली शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या येणारी दिवाळी आनंदात  साजरी करु आसा सुरही परीसरातुन आवाज घुमु लागला 
       परंतु परतीचा पाऊस सुरु झाल्याने आलेली बाजरी सोयाबीन मका भाजीपाला पिके सडु लागली तसेच बाजरी सोयाबीन मका पिकांना कोंब पडु  लागली सडु लागली प्रचंड आळी पडू लागली हातची पिके वाया जाणार असुन शेतक-यांना सरकारी मदतीची अपेक्षा तसेच पिकविम्याची अपेक्षा लागली.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील  युवा उद्योजक नितीन एडके यांच्याकडून परीसरातील नागरिकांना  दिवाळी भेट म्हणून पैठणी साडी,तसेच मिठाई वाटप करण्यात आले.एडके तालुक्यात युवा उद्योजक असून परीसरात बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत.तसेच अहमदनगर च.उ.स.भाजप जिल्हा उपाध्यक्ष आहेत.त्यांनी पाथर्डी तालुक्यातील अनेक तरुण युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.दिपावली निम्मित मिठाई वाटप कार्यक्रम प्रंसगी परीसरातील विकास आव्हाड मेजर,बाजीराव खेडकर,संभाजी बडे,जयकिसन ढाकणे,मिसाळ मेजर,भारत गाडेकर,रवि हिले,भागवत गरकळ,खंडु आव्हाड,नवनाथ आंधळे,प्रदिप आंधळे,तसेच परीसरातील महीलासह ४७५ मान्यवर मंडळी उपस्थित होते.परीसरातील नागरिकांनी तसेच हितचितकांनी या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले.

नेवासा,(प्रतिनिधी) 
दिपावली म्हणजे जिववातील अंधार दुर करुन उजेडाला सामोरे जाण्याचा सण दिपोत्सव तेजोमय अन् प्रकाशमय करण्यासाठी घरासमोरील अंगणात लखलखत्या पत्यांनी नटलेला हा सण मानला जातो ग्रामिण भागात मातीच्या पंत्यामध्ये तेल ओतून पंत्या पेटविल्या जातात माञ यंदा परतीच्या पावसामुळे सलग चालू आसलेल्या पावसामुळे पंत्याविना दिपावली साजरी करण्याची वेळ ग्रामिण भागावर येवून ठेपली आहे.
   शहरी भागात डिजीटल युग आसल्यामुळे विद्युत वाहीनीतूनही पणत्या लावल्या जातात माञ ग्रामिण भागात आजही मातीच्या पणत्यांमध्ये गोडतेल टाकून दिपावलीच्या दोन - तीन दिवस आधी व दोन - तीन दिवस नंतर हा दिनक्रम चालू आसतो.माञ पाऊलामुळे पणत्या विना दिपावली साजरी करण्याची वेळ परतीच्या पाऊसामुळे ग्रामिण भागात आली आसल्याचे वास्तव यंदाच्या पाऊसामुळे आलेली आहे.

नेवासा,(प्रतिनिधी)
नेवासाफाटा येथील शरणपूर वृध्दाश्रमातील वृद्धांना दिवाळीचे मिष्टान्न देऊन स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नागरिक देवततसे गुरुजी,भारतीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष कमलेश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष रेवणनाथ नजन, माजी सैनिक मेजर विनोद शेळके,भारतीय पत्रकार संघाचे सदस्य संतोष औताडे,चंद्रशेखर शेटे,संदीप जाधव,वृद्धाश्रम कमिटीचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, महेश देवतरसे,आयोजक गणेश मुळे,माहेर संस्थेच्या श्रीमती मीना भागवत यावेळी उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांचे वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी स्वागत केले.तर सचिव सौ.सुरेखा मगर यांनी प्रास्ताविकात वृद्धाश्रमातील उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी रेवणनाथ नजन व मेजर विनोद शेळके,यांनी वृद्धाश्रमासाठी हवे ते सहकार्य केले जाईल त्यासाठी मूठभर धान्य वृद्धांसाठी हा उपक्रम हाती घेऊन वृद्धाश्रमासाठी शिधा उपक्रम राबविला जाईल असे जाहीर केले.
यावेळी कु.उत्कर्षा देवतरसे हिने मनोगत व्यक्त करतांना वाढदिवसासारखे उपक्रम वृद्धाश्रमात येऊन सर्वांना आनंद वाटून व मिष्टांन भोजन देऊन तो साजरा करण्याचा मी प्रयत्न करेन व मैत्रिणींना ही सांगेन असा संकल्प यावेळी बोलताना केला. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांनी प्रार्थना गीते गायली उपस्थित वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले तर उपस्थित दात्यांनी यावेळी रोख स्वरूपात वृद्धाश्रमासाठी देणगी दिली.

 सत्तेच्या समिकरणात वाटा मिळविण्याचा प्रयत्न !


नेवासा,(प्रतिनिधी)
राज्यात सत्तेची चुल मांडण्यासाठी भाजप - सेनेसह मिञ पक्षांना यश आलेले आसतांना शिवसेनेला सत्तेत वाटाच नव्हे तर युवासेना प्रमुख आमदार अदित्य ठाकरे यांना मुख्यमंञी पदाचे दावेदार आसल्याने व भाजपाने सेनेला सत्तेत समावेश करतांना हातचा राखल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक वेळी समजून घेणार नसल्याचा गर्भित इशारा दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस अपक्ष आमदारांच्याही संपर्कात आसून सत्तेच गणित यशस्वी करण्यासाठी सेनेला विश्वासात घेण्यासाठी युद्ध पातळीवर शर्यतीचे प्रयत्न सुरु आसून अपक्षांच्या संपर्कात नेवाशाचे नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख लोणीचे राज्याचे गृहनिर्माणमंञी राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या सोबत मुंबईत संपर्कात आसून सत्तेत वाटा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.सत्तेच गणित भाजपा सोबत किंवा आघाडी सोबतही झाल तरी प्रथमच नेवासा तालूक्याला लाल दिवा मिळण्याचे चिन्ह निर्माण झाले आसल्याने तालूक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
   नेवासा विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करुन शंकरराव गडाखांनी या मतदार संघात विजय मिळविला आहे.गडाख यांची मतदार संघावर मोठी पकड आहे.मागिल निवडणूकीत त्यांनी हाताने दुर्लक्ष केल्यानेच त्यांचा पराभव झालेला होता आता सत्तेच्या समिकरणात सरकार कोणीही बनवलय तरी नेवासा तालूक्याला लाल दिवा मिळणार आसल्याचे चिन्ह निर्माण झाल्याने तालूक्यात ऐन दिपावलीत जल्लोष साजरा होतांना दिसत आसून प्रथमच गडाख यांच्या रुपातून लाल दिवा मिळणार आसून सत्तेत वाटा मिळण्यासाठी गडाख प्रयत्नशिल आसून नेवासकर आनंद आसल्याचे चिञ आसल्याने ही दिपावली दिव्याने तेजोमय होण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.

दिपावलीच्या धामधूमीत जन्म देणाऱ्या आईचा प्रताप ! 

नेवासा,(प्रतिनिधी)
नेवासा तालूक्यातील घोडेगांव येथे नुकत्याच जन्म दिलेल्या नवजात अर्भकाला कापडात गुंडाळून रस्त्याच्या कडेला टाकून अज्ञात मातेने पोबारा केला ही घटना जवळच नळाचे पाणी भरण्यासाठी आलेल्या महीलांना बाळाचा आवाज ऐकू आल्याने त्या चिमकल्याचा जीव वाचला ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घोडेगांव घडली.
  याबाबत अधिक वृत्त असे,की घोडेगांव येथील झोपडपट्टी जवळ हातपंपावर महीला पाणी भरण्यासाठी सकाळी येत होत्या येथून जवळच रस्त्याच्या कडेला लहान बाळ रडण्याचा आवाज महीलांच्या कानावर आला महीला तिथे गेल्या आसता कापडात गुंडाळलेल बाळ दिसले.महीलांनी या घटनेची माहीती  पोलिस पाटील भरत वैरागर यांना दिली. पोलिस पाटलांनी या बाळाला ताब्यात घेत पोलिस हवालदार किरण गायकवाड यांना घटनेची माहीती दिली ते त्वरीत घटनास्थळी दाखल झाले या गोंडस बाळाला कापडात गुंडाळून त्याला प्रथम सरकारी दवाखाण्यात तपासणी केली.बाळाची तब्येत ठिक आसल्याचे सांगण्यात आले.येथून या गोंडस अर्भकाला पोलिस ठाण्यात घेवून जाण्यासाठी डोंबारी समाजाची महीला लिलाबाई वाघ हिने त्याला कुशीत घेवून पोलिस ठाण्यात दाखल केले असता या बाळाला पालनपोषणासाठी पोलिस पाठविणार आसल्याची माहीती देण्यात आली. ऐन दिपावलीच्या सुनासूदीच्या काळात जन्म देत्या मातेने हा प्रकार केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आसून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला आसल्याची चर्चा या निमित्ताने चर्चिली जात आहे.

चांदेकसारे (वार्ताहर ) 
आत्मामलिक इंटरनॅशनल स्कुल कोकमठाण येथे  क्लस्टर खो,खो मँचेस घेण्यात आल्या होत्या याच महा विद्यालयामध्ये इ.१२वी मध्ये शिक्षण घेत आसलेला चांदेकसारे येथिल डाँ गोरक्षनाथ रोकडे यांचे चिरंजीव सौरव याची हरीयाणा येथे होत आसलेल्या खो.खो स्पर्धेकरीता  आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल च्या वतीने निवड करण्यात आली
      सौरव याचे कोपरगाव तालुक्याचे आमदार अशुतोष काळे पंचायत समिती सभापती अनुसया होन माजीआमदार अशोकराव काळेअहमदनगर जिल्हाबँकेच्या संचालिका चैताली काळे चांदेकसारेच्या पोलिसपाटील मिरा रोकडे आदिंनी कौतुक केले.

नेवासा(प्रतिनिधी)
भगवंताच्या नामचिंतनात आलेल्या संकटाला परतवून लावण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन हभप पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांनी केले ते सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन महोत्सवाचे पाचवे पुष्प गुंफतांना केले.
नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळयाच्या निमित्ताने आयोजित अखंड
हरिनाम सप्ताहातील पाचवे पुष्प गुंफतांना हभप पांडुरंग महाराज गिरी हे बोलत होते.
यावेळी बोलताना पांडुरंग महाराज गिरी म्हणाले की मनुष्य जीवन परतंत्र व प्रारब्धाच्या हातात आहे,आतापर्यंत जीवनात सर्वकाही घडले ते इच्छेनुसार घडले का याचा विचार करा,मनासारखं घडत नाही पण जीवनात घडत ते आनंदाने मानणे व स्वीकारणे याच्यातच समाधान मानले पाहिजे, प्रत्येकाचे जीवन हे कर्माप्रमाणे चालत असते,सुख व दुःख हे कर्मानुरूप येणारे दोन पाहुणे आहे,सुख आले तर हुरळून जाऊ नका दुःख आले तर शोक करू नका दुःखाला घाबरू नका दुःखाचा भार भगवंताकडे द्या त्याचे नामचिंतन करा संकटाचे निश्चितच निवारण होईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी सोहळा संयोजक गुरुवर्य उध्दव महाराज मंडलिक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. भागवतराव निमसे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.यावेळी गायनाचार्य प्रकाश महाराज कातकडे, किशोर महाराज शेळके,बाळासाहेब मगर,कैलासराव पवार,युवराज महाराज देशमुख,रामनाथ महाराज पवार, सागर महाराज आधाने,कृष्णा महाराज मते, शंकरराव लोखंडे,पुणे येथील उद्योजक रविंद्र मुनोत, जयप्रकाश रासने,संत सेवक रखमाजी नाचन, रामनाथ नन्नवरे,सुदाम मंडलिक,सोमनाथ वाखुरे,लक्ष्मण महाराज नांगरे यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात आला.

पाथर्डी-शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
 जिल्ह्यातील 12 विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राधाकृष्ण विखे पा., मोनिका राजळे व बबनराव पाचपुते निवडून आले तर राष्ट्रवादीकडून किरण लहामटे, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, निलेश लंके, संग्राम जगताप, घनश्याम शेलार रोहित पवार आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व लहू कानडे ही सर्व मंडळी निवडून आली आहेत. सर्वात जास्त लिडने शिर्डी मतदारसंघातून भाजपाचे राधाकृष्ण विखे- 86235 इतक्या मताने निवडून आले आहेत.
. शिवसेनेचा जिल्ह्यातून एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांचा सुपाटा साप झाला आहे.
विधानसभा मतदारसंघातून निवडून उमेदवार एकूण मते याप्रमाणे अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी,112830मते विजयी), वैभव पिचड (भाजपा 55427 मते). संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस124354मते विजयी), साहेबराव नवले ( शिवसेना 62870मते). शिर्डी - राधाकृष्ण विखे (भाजपा 131394 मते विजयी), सुरेश थोरात (काँग्रेस 45159मते). कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी 77669मते विजयी), स्नेहलता कोल्हे (भाजपा 75255 मते). श्रीरामपूर- लहू कानडे (काँग्रेस 88347 मते विजयी), भाऊसाहेब कांबळे (शिवसेना 70375मते). नेवासा- शंकरराव गडाख (शेतकरी 103108 मते विजयी), बाळासाहेब मुरकुटे (भाजपा 75636मते). शेवगाव- मोनिका राजळे (भाजपा 109044 मते विजयी), प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी 94526 मते). राहुरी-प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी 108273मते विजयी), शिवाजी कर्डिले (भाजपा 85061मते). पारनेर-निलेश लंके (राष्ट्रवादी 138570मते विजयी), विजय औटी (शिवसेना 102403 मते). अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी 77945मते विजयी),  अनिल राठोड (शिवसेना 68189मते). श्रीगोंदा- घनश्याम शेलार (राष्ट्रवादी 97980 मते ), बबनराव पाचपुते (भाजपा 70420मते). कर्जत-जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी 99576मते विजयी), राम शिंदे (भाजपा 69355मते).
लिड याप्रमाणे - किरण लहामटे - 57403, बाळासाहेब थोरात-61484, राधाकृष्ण विखे- 86235, आशुतोष काळे- 2414, लहू कानडे - 17972, शंकरराव गडाख - 27472, मोनिका राजळे- 14518, प्राजक्ता तनपुरे-23212, निलेश लंके- 59234, संग्राम जगताप- 9756, , रोहित पवार - 30221 लिडने ही सर्व उमेदवार निवडून आले आहेत.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
शेवगाव
पाथर्डी मतदार संघाच्या विजयी उमेदवार आ.मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव पाथर्डी मतदार संघातील सर्व तरुण,ज्येष्ठ मंडळी  मतदाराचे मनपूर्वक आभार मानले.माझा विजय हा सर्व सामान्य जनतेचा असून मला शेवगाव पाथर्डी मतदार संघातील जनतेचा अभिमान आहे.तसेच मला माझ्या विजयाचा आत्मविश्वास होता.मला पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी मतदार संघातील जनतेने दिली आहे.मी त्याचे आभार मानते. अशा शब्दांत आ.मोनिका राजळे यांनी मत व्यक्त केले.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथे आ.मोनिका राजळे यांची शेवगाव विधानसभा मतदार संघात पुन्हा आमदार म्हणून विजयी झाल्याने कासार पिपंळगावात मोनिका राजळे समर्थक व गावक-यांनी फटाके वाजून डिजेसह मिरवणूक  व विजयाचा गुलाल उधळण करुन आंनद उत्सव साजरा केला.कासार पिपंळगाव परीसरात सकाळ पासूनच विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळीना लागली  होती.आ.मोनिका राजळे यांच्या विजयाने गावात तसेच परीसरात ठिकठिकाणी फटाके व गुलाल उधळण मोनिका राजळे समर्थकांनी आंनद उत्सव साजरा केला.आ.मोनिका राजळे यांच्या कासार पिपंळगाव येथील  निवासस्थानी सकाळ पासूनच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेलार पराभूत

विसापूर
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनशाम शेलार यांच्यावर ४ हजार ७४० मतांनी विजय मिळविला.
गुरूवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्येक फेरीत पाचपुते-शेलार यांच्या मतांची आघाडी कमी जास्त होत होती. मागील वेळेस पाचपुते यांचा राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी पराभव केला होता. परंतु यावेळी जगताप यांनी कुकडी कारखान्याच्या व शेतकºयांच्या हितासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीने घनशाम शेलार  यांना उमेदवारी दिली. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करुन पाचपुते यांना बळ दिले. दरम्यान शेलार यांच्या बाजूने आमदार राहुल जगताप यांनी आपली ताकद उभी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांनीही शेलार यांना ताकद दिली होती. पाणी प्रश्न, दुष्काळाचे प्रश  निवडणुकीत महत्वाचे ठरले. परंतु भाजपचे सरकार सत्तेत असल्याने याचा फायदा पाचपुते यांना झाला.राहुल जगताप यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने घनश्याम शेलार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळताच पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन एकतर्फी विजयाच्या वल्गना केल्या.पाचपुतेंचे कार्यकर्ते सत्तर ते पंचाहत्तर हजार मताधिक्याने विजय मिळेल हा करत होते तो फोल ठरला.मात्र शरद पवार यांची श्रीगोंदा येथील सभा पाहून त्यांचे पाय जमिनीवर आले.सहज विजय मिळेल अशी अपेक्षा करणा-या पाचपुते यांना शेवटच्या फेरीतील मतमोजणीची वाट पहावी लागली.एवढी चिवट झुंज शेलार यांनी दिली.पाचपुते यांच्या पेक्षा शेलार यांची उमेदवारी निश्चितच सर्वसामान्य अशी होती.पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून अनेक वेळा प्रतिनिधीत्व केले आहे.

घनश्याम शेलार-97,980
बबनराव पाचपुते-1,02,403
अटीतटीच्या लढतीत भाजप च्या बबनराव पाचपुतेंचा विजयी
एकूण 4,750 मतांनी पाचपुतें विजयी

नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन ३० हजार ३०९ मतांनी विजय मिळवत बाजी मारली. या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून होते.मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांनी बाळासाहेब मुरकुटेंच्या विजयासाठी जाहीर सभा घेतली होती.गडाख यांनी स्वकर्त्तृत्वावर अपक्ष उमेदवारी दाखल करुन मोठ्या मतधिक्याने विजयश्री खेचून आणला.
  महाराष्ट्रात तिकट मिळविण्यासाठी उमेदवार या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आसतांना शंकरराव गडाख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन विधानसभेच्या रणधुमाळीत राजकिय जुगाराचा डाव मांडला होता.त्यांच्याकडे आसलेल्या कार्यकर्त्यांनी राञंदिवस कष्ट घेवून विधानसभेच्या रणांगणात लक्ष केंद्रीत करुन दोन दिवसात राजकिय मैदानावर ताबा घेत भाजपाच्या मुरकुटे यांचा दारुण पराभव करत विजय मिळविला. या निवडणूकडे राज्याचे लक्ष लावून होते.

नेवासा,(प्रतिनिधी)
नेवाशात पावसामुळे घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील 4 जण मातीच्या ढिगाऱ्या खाली दबून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि.23 रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान घडली.
नेवासा शहरातील डॉ.करवंदे हॉस्पिटल जवळ ही घटना घडली आहे.
घटनास्थळी पोलीस प्रशासन व महसूल विभाग दाखल.नागरिकाच्या मदतीने मयताना मातीच्या ढिगाऱ्यातुन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
मृतांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.मृतांची नावे अशी..
जाफरखान पठाण (वय 62 वर्षे),उसमा खान पठाण (वय 18 वर्षे),नर्गिस शहजादेखान पठाण(वय 30 वर्षे),बेबी रहमतुल्लाखान पठाण( वय 60 वर्षे).
आज बुधवार दि.23 रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसाने पठाण वाड्यातील एका खोलीचे छत कोसळले. या छताखाली दबल्याने चौघांचा मृत्यू झाला. संपूर्ण खोलीच खाली बसल्याने चौघांना बाहेर पडणे कठीण झाले. मातीखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडताच नागरिकांनी पठाण वाड्याकडे धाव घेतली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. दबलेल्या पाच जणांना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यातील जखमी अरमान पठाण याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अहमदनगर
विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक 2019 करीता दि. 24 ऑक्टोबर 2019 रोजी  मतमोजणी  होणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बाराही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून दि.२४ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानुसार 216- अकोले (अ.ज) -‍  पॉलीटेक्निक वर्कशॉप व कन्या विद्या  मंदिर, अकोले,  217- संगमनेर -  सहकार महर्षी  भाऊसाहेब संतुजी  थोरात, क्रिडा संकुल, संगमनेर, 218 - शिर्डी - तालुका मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, राहाता, 219- कोपरगाव- सेवानिकेतन कॉन्व्हेंट  स्कुल,  कोपरगाव, 220 - श्रीरामपूर (अ. जा.) - मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत,  तहसिल  कार्यालय,  श्रीरामपूर, 221 नेवासा - नविन शासकीय धान्‍य गोडाऊन, सेंन्‍ट मेरी स्‍कुल रोड, (मुकिंदपुर) नेवासा , 222-  शेवगाव- नविन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय शेवगाव, 223 राहुरी - लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला,शास्‍त्र व वाणीज्‍य महाविद्यालय, राहुरी , 224- पारनेर - राजर्षी शाहु महाराज सभागृह,  न्‍यु आर्टस कॉमर्स व सायन्‍स कॉलेज, पारनेर,  225- नगर - महाराष्‍ट्र राज्‍य वखार महामंडळ, गोडाऊन क्रमांक 4, नागापुर, अहमदनगर,  226-  श्रीगोंदा-  शायकीय धान्‍य गोडाऊन, पेडगाव रोड, श्रीगोंदा, 227 - कर्जत -जामखेड  -(शासकीय गोडाऊन, नविन तहसिल कार्यालय, कर्जत येथे मतमोजणी होणार आहे.  

मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणीचे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्‍याची शक्‍यता गृहीत धरुन मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्‍यवस्‍था बाधित राखण्‍याच्‍या  दृष्‍टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्‍या कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार,कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मतमोजणी ठिकाणीपासुन 200 मीटर अंतराच्‍या आतील कोणत्‍याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्‍ये  निवडणूकीचे मतमोजणीसाठी नियुक्त सरकारी अधिकारी/ कर्मचारी,  उमेदवार व त्‍यांचा निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी तसेच भारत निवडणूक आयोगातर्फे परवानगी देण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍ती यांच्या व्‍यतिरिक्‍त इतरांना मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेशास मज्जाव असेल.  निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्‍या कामासंबंधी अहमदनगर जिल्‍ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी/सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्‍यक्‍ती व्‍यतिरिक्‍त  कोणासही पेन, मोबाईल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणच्या 200 मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही किंवा 200 मीटरच्‍या आतील परिसरात पी.सी.ओ.चालू ठेवणार नाही.

कोणीही व्‍यक्‍ती शस्‍त्र, क्षेपक, काड्यांची पेटी, लायटर, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्‍तू,  वॉकी-टॉकी, कॉडलेस टेलिफोन, ज्‍वलनशील पदार्थ घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करणार नाहीत.  मतमोजणीचे ठिकाणा पासुन 200 मीटरच्‍या आत कोणत्‍याही पक्षाचे कार्यालय किंवा उमेदवाराचे कार्यालय उघडे राहणार नाही किंवा राजकीय होर्डींग, बॅनर, नोटीस फलक, झेंडे लावले जाणार नाहीत.  परवानगी देण्‍यात आलेल्‍या वाहना व्‍यतिरिक्‍त मतमोजणी केंद्रापासुन 200 मीटर परिसरात कुठलेही वाहन आणता येणार नाही.   निवडणूकीचा निकाल लागल्‍यानंतर अहमदनगर जिल्‍ह्याच्या महसुल स्‍थळसीमेच्‍या हद्दीत संबंधीत पोलीस अधिकारी यांची परवानगी घेतल्‍याशिवाय कोणासही मिरवणूक काढता येणार नाही.  तसेच,कोणीही निवडणूकीत पराभूत उमेदवाराच्‍या घराजवळ वा इतरत्र जमा होणार नाहीत व प्रक्षोभक घोषणा  देणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. हे आदेश दि.24/10/2019 रोजीचे 00.00 वाजता पासुन ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अथवा दि.24/10/2019 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत ( यापैकी जे उशिरा असेल तो पर्यंत ) लागु राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा बुद्रुक शिवारात असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानमध्ये बांधण्यात आलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या मंदिरातील सभामंडपाचे उदघाटन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबाद येथील जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी यांच्या हस्ते बुधवारी दि.२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आले.अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार सोमाभाई मोदी यांनी यावेळी बोलताना काढले.
    नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सद्या प्रतिष्ठान प्रांगणात उभारण्यात आलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या सप्ताहाला सोमाभाई मोदी यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी झालेल्या धामिर्क कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न गणेशदेवा कुलकर्णी यांनी केले.
     यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सोमाभाई मोदी समवेत त्यांच्या धर्म पत्नी सौ.चंद्रिकाबेन मोदी हभप पांडुरंग महाराज गिरी वावीकर,हभप बाळा महाराज खरात,आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, चंद्रभान महाराज चौधरी,पंडितराव थोरात,पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे,शंकरराव लोखंडे, नगरसेवक इंजिनियर सुनीलभाऊ वाघ,हभप विश्वनाथ मंडलिक, जिल्हा बँकेचे रावसाहेब वर्पे, सुदामभाऊ मंडलिक,संजय पवार,राजेंद्र ठाणगे, दीपक ठाणगे,मेजर धर्मराज ठाणगे, मेजर मंगेश ठाणगे, दत्तात्रय पादीर,पुणे येथील उद्योजक रविंद्र मुनोत नेवासकर,वरद विनायक देवस्थानचे कचरू पाटील निर्मळनाना आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना सोमाभाई मोदी यांनी गुरूंबद्दल असलेल्या श्रद्धेला जपण्याचे गुरूंमुळे ज्ञानाद्वारेच मनुष्य जीवाचा उध्दार केला असल्याचे सांगत गुरूबद्दल असलेला महिमा विषद केला.अशा या धार्मिक संस्थानच्या माध्यमातून संस्काराची समृद्धी होत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.
     यावेळी हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी हिंदी मध्ये सोमाभाई मोदी यांच्या कार्याचा परिचय करून दिला. मोदीजींनी देशाची मान जगात उंचाविण्याचे कार्य केले. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती भक्तिभावाने केली जाते त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध जातीच्या धर्माच्या संतांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय ऐक्याची निर्मिती केली असल्याचे सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच ठिकाणी थांबून विश्व ची माझे घर हा संदेश दिला असल्याचे मोदींजींना सांगितले.
        यावेळी सोहळा संयोजक गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या उपस्थितीत आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच  पोपटराव पवार यांच्या हस्ते सोमाभाई मोदी यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
      पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात नेवासे ही तपोभूमी असल्याची ओळख सोमाभाई मोदींना करून दिली.या भूमीचा सन्मान झाल्याचे त्यांनी सांगितले व आदर्श गाव हिवरे बाजारला यायचे आमंत्रण दिले.मी एकटाच मोदींजींचा भाऊ नसून देशातील १३० करोडची जनता नरेंद्र मोदी यांचे भाऊ बहीण आहे त्याचप्रमाणे मी आहे असे भावनिक उदगार काढले.व गुरुवर्य उद्धव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन  प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
    यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,कृषी तज्ञ एकनाथराव भगत,राजेंद्र मापारी,सुदामराव खजिनदार, अशोक टेकणे,किशोर गारुळे, बाबासाहेब महाराज सातपुते यांच्या सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव परीसरात दुपारी एकच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.त्यामुळे पीक काढणीस आलेले बाजरी,भुईमूग,मका,कापूस पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.सकाळ पासूनच आकाशात ढगाळ वातावरण होते.कपाशीच्या झाडाचा कापूस भिजलेला दिसून आला.परंतु मागील आठवड्यात झालेल्या ज्वारी पिकाला पाऊस फायदेशीर ठरला आहे.पाऊसामुळे रस्त्याची अवस्था वाईट झाली असून खड्डामध्ये पाणी साचले आहे.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पावसाळ्यात परीसरात ठिकठिकाणी वाढत्या हिरव्या गवतामुळे व खड्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.डास चावल्याने डोकेदुखी,अंगदुखी व ताप यासारखे आजाराचे प्रमाण वाढले आहे.परीसरात वाढलेल्या गवतावर उपाययोजना म्हणून  औषध फवारणी प्रशासनाने  करणे गरजेचे आहे.रस्त्यावर तसेच ओढे,नाल्याच्या ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांना बसण्यासाठी जागा मिळत आहे.ग्रामीण भाग असल्याने लहान मुले घराबाहेर खेळण्यासाठी येतात.त्यावेळी डास लहान मुलांच्या अंगावर बसून चावा घेतात.यावर त्वरीत उपाययोजना लोकप्रतिनिधीनी करणे गरजेचे आहे.परीसरात डासामुळे आजारी पडण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये वाढले आहे.वयस्कर व्यक्ती सकाळ,संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडत असल्याने डास अंगावर चावा घेतात.यामुळे परीसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

हवा गडाखांची विजयाचा अंदाज दावा मुरकुटेंचा ! भल्या - भल्यांची पाचावरधारण !

नेवासा,(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यात आज गुरुवार (दि.२१) रोजी  निवडणूकीच्या रणांगणात उतरलेल्या पहीलवांनाच्या विजयाचा फैसला मतदान यंञातून स्पष्ट होणार आहे कोण बाजी मारणार कोण चितपट होणार याकडे राज्याचे लक्ष लावून आहे.मतमोजणीच्या आधी एक्झिटपोलमुळे महाराष्ट्रात अनेकांची पाचावरधारण बसली आहे.हवा एकाची अंदाज दुसऱ्याचा एक्झिटपोलने वर्तविल्यामुळे उमेदवार गॅसवर आसतांना याचा फैसलाच आज होणार आहे.
  नेवासा मतदार संघाच्या निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लावून आहे कारण विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष लढत दिली.अपक्ष उमेदवार आसतांना तालूक्यात जो - तो त्यांच्या विजयाची खाञी देत आसतांना एक्झिटपोल माञ भाजपाच्या उमेदवाराची ग्वाही देत आसल्याने या मतदार संघात कोण बाजी मारणार याची चर्चा होत आसून या निकालाच्या फैसल्याकड अनेक राजकिय निरिक्षकांच्या नजरा लागून आहेत.

शुभम एन.जठार - विसापूर
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील आठवडे बाजार तळाची दुरावस्था झाल्याने विक्रेत्यांसह बाजारकरुंना पावसाळ्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.रविवारी पावसाची संततधार असल्याने दिपावलीचा बाजार असताना बाजारकरुंचे प्रचंड हाल झाले. 
   विसापूर येथील आठवडे बाजारासाठी विसापूर परीसरातील पिंपळगाव पिसा , निंबवी, एरंडोली,कोंडेगव्हाण,कोरगव्हाण,सारोळा सोमवंशी,चांभुर्डी,उखलगाव,सुरेगाव,घुटेवाडी, मुंगुसगाव या गांवासह पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद,कडुस,पाडळी,भोयरे गांगर्डा, बाबुर्डी,रुई छत्रपती,पिंपरी गवळी अदी विस गावतील लोक बाजार हाट करण्यासाठी येतात.मात्र बाजारला ओटे व्यवस्थित नाहीत.या बाजारतळावर १९९२ साली विसापूर ग्रामपंचायतीवर पंंचायत समितीचे  विस्तार अधिकारी ननवरे हे प्रशासक असताना बाजार ओटेे बांधण्यात आले.तेही बाजारकरु रांगेत बसतील असे न बांंधता तत्कालीन पद्धतीने कट्टे तयार करण्यात आले.मात्र बाजारकरुंकडुुन गेल्या सत्तावीस वर्षात याकट्टयांचा फारसा वापर केला गेेला नाही.त्या कट्टयांची मोडतोड झालेली आहे. शेतकरी व विक्रेत्यांना आपला माल घेेऊन चिखलात बसावे लागते.पडझड झालेेले ओट्यांचे दगडही जसेच्या तसेच पडुन आहेत.ते दगड जमा करून इतरत्र हलवण्याची तसदीही ग्रामपंचायतीने घेेेतली नाही.ग्रामपंचायतीला या आठवडे बाजारातुन दर वर्षी  दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.त्या उत्पन्नातुन दर वर्षी काही निधी खर्च करून ग्रामपंचायतीनेे बाजार तळाची देखभाल करणे आवश्यक आहे.मात्र ग्रामपंचायत फारसे लक्ष देेेताना दिसत नाही. 

आठवडे बाजारचे नवीन ओटे बांधकाम करणे व सुशोभीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.मात्र शासनाकडून अद्याप या प्रस्तावास योग्य प्रतिसाद मिळाला नसुन त्यास मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. 
        ---- अरविंद जठार,सरपंच , ग्रामपंचायत विसापूर

नेवासा(प्रतिनिधी)
निर्भीड पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील मीडिया पत्रकार सलीमभाई गफूर पठाण यांची नियुक्ती निर्भीड पत्रकार संघाच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ.रुचिता रमण मलबारी यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
सामाजिक क्षेत्रातील कार्य व पत्रकारितेतील योगदान दिल्याबद्दल सदरची निवड करण्यात आली असल्याचे सौ.रुचिता मलबारी यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
निर्भीड पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांना आपल्या न्यायहक्कांसाठी सक्षम करून त्यांचे संघटन आपण जिल्हाभर खेडोपाडी जाऊन करणार असल्याचे नियुक्ती नंतर जिल्हाध्यक्ष सलीमभाई पठाण यांनी सांगितले.
निर्भीड पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सलीम पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे निर्भीड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा सौ.सोनाली संतोष जाधव, सचिव दीपा कांचन शेटये,खजिनदार शकुंतला देविदास चिर्लेकर,संजना संतोष शेटये,सेक्रेटरी कीर्ती किरण शेटये,सदस्य सौ.दीपाली दीपक जाधव यांच्यासह नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या सदस्य पत्रकारांनी अभिनंदन केले आहे

महीलांची मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी 

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी,शेवगाव तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.ईव्हीएम,व्हीव्हीपॅट यंञाची काही ठिकाणी तुरळक अडचण वगळता मतदान सुरळीत पार पडले.पाथर्डी,शेवगाव दोन्ही तालुक्यात महीलांचा मतदान करण्यासाठी उत्साह चांगला दिसून आला.तालुक्यात पोलीस यंञणेने मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली.दिवसभर ढगाळ वातावरण होते.परंतु तालुक्यात  पाऊस कोठेही न पडल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी अडचण आली नाही.
एकूणच पाथर्डी,शेवगाव दोन्ही तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.तालुक्यात तरुण,ज्येष्ठ  मतदाराचा सहभाग चांगला दिसून आला.

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथे मतदान  शांततेत पार पाडले.सकाळपासूनच महिला मतदाराच्या रांगा लागल्या होत्या.कासार पिपंळगाव येथे ईव्हीएम,व्हीव्हीपॕट यंञाची कोणतही अडचण आली नाही.या ठिकाणी अनुक्रमे 150,151,152 तीन बुथची व्यवस्था करण्यात आली होती.
व मतदान यंञणा सुरळीत पार पाडली.कासार पिपंळगाव येथे एकूण 2214 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी तरुण मतदारांनी संख्या जास्त दिसून आली.

नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ७०.४० टक्के मतदारांनी पविञ मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव आनंदात अन् शांततेत पार पाडला.१७ उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले होते.माञ गडाख - मुरकुटे या दोघांमध्येच ही निवड झाली आसून दोघांच्याही सभेला मोठी गर्दी जमत आसल्याने गर्दी मतदारांनी कोणाला कौल दिला अन् कोण विजयी होणार ? याबाबत माञ नेवाशात उत्सुकत्ता शिगेला पोहचली आहे.
  नेवासा मतदार संघ हा अन्अपेक्षितरित्या बदल घडविणारा तालूका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हिरोला झिरो अन् झिरोला हिरो या मतदार संघात मतदारांनी करुन दाखविलेले आसल्यामुळे रणांगणात कोण बाजी मारणार याकडे तालूक्याचे लक्ष लागून आहे

नेवासा(प्रतिनिधी)
विचाराने व कृतीने जीवंत राहण्यासाठी जीवनात चांगले कर्म करा,देवतासमान असणाऱ्या मातापित्यांची  सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करा असे आवाहन रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी नेवासा येथील मळगंगादेवी मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना केले.
    नेवासा येथील मळगंगा देवी मंदिराचे प्रमुख देवीभक्त स्वर्गीय लक्ष्मणराव घोलप यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे म्हणाले की देवीभक्त स्वर्गीय लक्ष्मणबाबा घोलप हे १०८ वर्षे जगले नेवासे या पवित्र भूमीत त्यांनी निघोज येथील मळगंगादेवीची स्थापना केली नंतर त्यांचे चिरंजीव देवीभक्त रेणुकादास घोलप व परशुराम घोलप या त्यांच्या मुलांनी क्षेत्र नेवासेनगरीच्या वैभवात भर घालणारे मळगंगा देवीचे मंदिर उभे केले आज येथे दर पौर्णिमेला भंडारा अन्नदान कार्यक्रम होतात अनेकांना देवीच्या उपासनेने प्रचिती आली हजारो भक्तांना त्यांनी परमार्थाला लावले . असेच कार्य जीवनात प्रत्येक मुलाने करावे आईवडील हे भूतलावरील दैवत असल्याने शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करा त्यांना दुखवू नका संत संगतीची कास धरून जीवनात परमार्थ करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
   यावेळी रेणुकादास घोलप,सौ.सुमनताई घोलप,परशुराम घोलप,सौ.लताताई घोलप,रामभाऊ घोलप,सौ.जयश्री घोलप, सौ.सुशीला शित्रे,सौ.मंगल देवमारे,सचिन घोलप, सौ.ज्योतीताई घोलप,सौ.जयश्री घोलप,सौ.उषा शिंदे, सौ.नंदा यादव,सागर घोलप,सौ.वैशाली घोलप,संदीप घोलप व सौ.भारती घोलप यांच्या हस्ते मळगंगा देवीची आरती करण्यात आली.
    यावेळी कार्यक्रमाचे संयोजक रेणुकादास घोलप व परशुराम घोलप रामभाऊ घोलप यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.यावेळी हभप लक्ष्मीनारायण जोंधळे,हभप गणेश महाराज चौधरी, भाऊसाहेब चौधरी,भास्करराव तारडे,भाऊसाहेब महाराज मोरे,पोपटराव बोरुडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कोण बाजी मारणार उत्सुता शिगेला ? उमेदवार गॅसवर !

नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघातील १७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंञात सिलबंद झाले आसून नेवाशात कोण बाजी मारणार याची उत्सुकता माञ शिगेला पोहचली आसून उमेदवार गॅसवर आसल्याने त्यांची धाकधूक मतदान यंञात ठप्प झाली आहे.
   नेवासा विधानसभा निवडणूकीत अटीतटीच्या झालेल्या चुरशीच्या लढतीत गडाख - मुरकुटेंच्या दोन्ही सभांना गर्दी उसळत आसल्याने मतदारराजा कोणाच्या पारड्यात कौल देतो याकडे जाणकारांचे लक्ष लागून आहे. १७ उमेदवारांपैकी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख व भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे या दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली दोन दिवसात गडाखांनी राजकिय रणांगणाचा मोठा ताबा घेतला होता गडाखांनी मुरकुटेंवर विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला तर मुरकुटेंनी विकास काय आसतो हे मी पाच वर्षाच्या कामात दाखवून दिल्याचे सांगत होते याचे उत्तर आज मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान यंञात बंद केले आसून कोण मारणार बाजी याचीच चर्चा मतदारांमधून चर्चीली जात आहे सकाळी मतदान केंद्रात मतदारांची गर्दी दिसून आली तर दुपार नंतरही मतदान केंद्रात उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला.जादा मतदान कोणाच्या पथ्थ्यावर पडणार असा निकषही लावला जात आसून निकालाकडे अनेकांचे नजरा लागल्या आहेत.

चांदेकसारे (वार्ताहर )
देर्डेको-हाळे येथिल माजीसरपंच सुकदेव रभाजी शिलेदार (७०) यांचे वृध्दापकाळाने निधनझाले.त्यांच्या पश्चात पत्नी  दोनमुले चारमुली सुनानातवंडे असापरीवार असुन ते संजय व प्रशांत शिलेदार यांचे वडील होत

सदगुरू जोग महाराज व गुरुवर्य बन्सी महाराजांचे कार्य वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी-गुरुवर्य भास्करगिरी महाराज

नेवासा(प्रतिनिधी)
आळंदी येथील स्वानंद सुखनिवासी सदगुरू जोग महाराज यांच्या निर्याण शताब्दी व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांच्या २५ पंचवीसव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त नेवासा येथील आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली.अखंड हरिनाम सप्ताहात संत विचाराच्या शिदोरीसह व आत्मिक समाधानाची प्राप्ती होते सदगुरू जोग महाराज व बन्सी महाराजांचे कार्य वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी असून समाजप्रबोधना साठी एक लाखांहुन अधिक किर्तनकार त्यांनी घडविले असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलताना काढले.
यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की वैकुंठवाशी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांनीपरमार्थात माणसे घडविण्यासाठी मोठे कार्य केले, परमार्थ नीटनेटकेपणाने कसा करावा हे त्यांनी आई हदयाने व तसेच मारीत ही सांगितले.वारकरी शिक्षण संस्थेत ते गुरुवर्य जोग महाराजांच्या तालमीत तयार झाले जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत आतापर्यंत एक लाखाहून अधिक किर्तनकार तयार झाले जोग महाराजांची शताब्दी व गुरुवर्य बन्सी महाराजांचा २५ वा पुण्यतिथी हा दुग्धशर्करा योग असल्याचे सांगून हा सोहळा आठ दिवस सर्वांच्या सहकार्याने आध्यात्मिक वैभवात पार पडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जीवनात संत हे समाजाच्या उद्धारासाठी कार्य करतात त्यासाठी स्व:तचा देह चंदनाप्रमाणे झिजवतात,ते स्व:त तरतात व समाजाला ही तारण्याचे काम करतात,संतचरणी व संगतीत राहून मनुष्य जीवाचा उद्धार करा,संत चरित्र समजून घेऊन ते सर्वांनी वाचावे असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी आलेल्या सर्व संत महंतांचे हभप शिवाजी महाराज देशमुख व संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले यांनी स्वागत केले.यावेळी सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प.उद्धवमहाराज मंडलिक,महंत सुनीलगिरी महाराज,सोहळा संयोजक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त व माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वासराव गडाख,काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, अध्यक्ष माधवराव दरंदले,मृदुंगाचार्य गिरिजानाथ महाराज जाधव,कृष्णा महाराज आरगडे,भगवान महाराज जंगले शास्त्री, बाळकृष्ण महाराज सुडके,नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव,कृष्णा महाराज हारदे,अशोक पांडव,गायनाचार्य लक्ष्मण महाराज नांगरे, युवाकीर्तनकार लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,गणेश महाराज दरंदले,महेंद्र महाराज शेजुळ, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे,कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव, रामभाऊ जगताप,गोविंदराव शेटे,भिकाजी जंगले,संस्थानचे विद्यार्थी मयूर महाराज डौले,ऋषिकेश महाराज गोंधवणीकर,मार्तंड महाराज चव्हाण,सुभाष जाधव यांच्यासह संत मंडळी कीर्तनकार महाराज पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात अन्नदानासह व ईतर सेवेसाठी योगदान देणाऱ्यांचा यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सोहळा संयोजक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.

नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा निवडणूकीकडे हार - जितसाठी संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.कारण पक्षाचे तिकड मिळविण्यासाठी इकडून - तिकडे उमेदवार पळत सुटून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी राजकिय ताकद वापरुन तिकीट पदरात पाडून घेत आसल्याचे अख्या महाराष्ट्राने अनूभवलेले आसतांना माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पक्षाचे तिकीट झुगारुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन उमेदवारी लढविली त्यांच्या विरोधात भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह एकूण १७ उमेदवार रणांगणात आसतांना लढत केवळ गडाख - मुरुकुटे यांच्यामध्येच चालू आसल्याचे प्रचार काळात सप्रमाण सिध्द झाले.
  आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यात कत्तल की रात सुरु झाली मतदारांना भूरळ घालण्यासाठी  सोशल मिडीयावर मतदारांना आवाहन करण्यासाठी संदेशाचा पाऊस सुरु झाला आहे. विविध प्रकारच्या क्लृप्त्या आखल्या जात आसून कोणी सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकून तर कोणी उत्तर द्या पोस्टर भिंतीवर लावून मतदारांत संर्भमावस्था निर्माण करत आसल्याचे दिसून आले.भाजपाचे आमदार उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंञी देवेंद्र फडणविस व राज्याच्या ग्रामविकासमंञी पंकजा मुंढे यांनी सभा घेतल्या तर अपक्ष उमेदवार शंकरराव गडाखांसाठी नेवाशात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेत घुले - गडाखांचा वाद मिटवत एकोपा निर्माण केला. गडाखांनी तालूका पिंजून काढत जनतेला आ.मुरकुटेंच्या राजकिय चुका दाखवून देवून माझ्या राजकिय जुगाराला साथ देण्याचे भावनिक आवाहन केले तर मुरकुटेंकडून विकास काय आसतो हे मी पाच वर्षात दाखवून दिल्याचे प्रचारादरम्यान सांगितले.नेवाशात गडाख - मुरकुटेंची लढत प्रचारादरम्यान मोठी रंगतदार झाली आता प्रचाराच्या तोफा थंडवल्या आसून चमत्कार नमस्कार सुरु झाले आहेत.काही ठिकाणी मतदारांना भूरळ घालण्यासाठी उमेदवार भावनिक बनले आहेत तर कोणी पोस्टर बाजीतून तर कोणी सोशल मिडियातून एकमेकांची खिल्ली उडवत आपणच कसे लायकवान आहोत हे दाखवून देत आसून ही निवडणूक मोठी रंगतदार होण्याची चिन्हे जाणकारांतून व्यक्त होतांना दिसून येत आहेत.

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget