'काळी आई वाचवा अभियान'
पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथे ऊस,कांदा,डांळीब व सेंद्रिय शेती तसेच मिशन - काळी आई वाचवा अभियान अंतर्गत अनेक शेती विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय जैविक शेती मार्गदर्शक प्रकाश मगर,अक्षय हांडगे,ज्ञानेश्वर बेरड यांनी शेतकऱ्यांना शेतामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकासंबधी मार्गदर्शन केले.
एकवीसाव्या शतकामधील शेतकरी फक्त उदर निर्वाहासाठी शेती करतात.आज शेतामध्ये दरवर्षी एकच प्रकारचे पीक घेतल्याने जमीन नापिक होत चाललेली आहे.दरवर्षी वेगवेगळी बदलून पीक घेणे गरजेचे आहे.तसेच शेतकऱ्यांनी डांळीब,संञा यासारख्या फळबागाचे उत्पादन घेणे गरजेचे आहे.
मागील पिढीने आपल्याला शेतीसंबधी खूप काही शिकवण दिली असून आणखी शेतीसंबधी ज्ञान व माहीती मिळवून साधन संपत्तीचा चांगला उपयोग करुन घेऊन आपण कमी खर्चात जास्तीत जास्त पिकाचे उत्पादन घेणे गरजेचे आहे.असे मत जैविक शेती तज्ञ प्रकाश मगर यांनी व्यक्त केले.
परीसरातील शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध शेती विषयी असणाऱ्या समस्या व पिकाच्या अडचणी यावेळी समजावून घेतल्या.तसेच डांळीब,संञा या फळबागासंबधी असणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण केले.
तसेच शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे मत जाणून घेतले.
यावेळी जि.प.सदस्य राहुल राजळे,डांळीब,द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्धव ताठे, भाऊपाटील राजळे,विक्रम राजळे, संदिप राजळे,ग्राम पंचायत सदस्य गणेश भगत,अर्जुन राजळे,दत्ताञय भगत,आबासाहेब म्हस्के,
गोरक्ष राजळे,संतराम पवार,शिवाजी खोजे,आबासाहेब राजळे,रामदास शेळके,ज्ञानदेव जगताप,अमोल म्हस्के,आदिनाथ कवळे, बापूसाहेब भगत,अर्जुन देशमुख,राजू तुपे,दादाभाऊ तुपे उपस्थित होते.
यावेळी कृषिमिञ तसेच प्रगतशील शेतकरी संदिप राजळे यांनी बाजरी,ज्वारी,हुलगे,मका या पिकाऐवजी शेतकऱ्यांनी डांळीब,संञा यासारख्या फळबागा आपल्या शेतात करुन भरघोस उत्पादन घेणे गरजेचे आहे.तसेच दिवसेंदिवस शिक्षण घेऊन नोकरी मिळेलच याची शाश्वती नसून जास्तीत जास्त तरुणांनी फळबाग शेतीकडे वळणे गरजेचे आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय जैविक शेती मार्गदर्शक तज्ञ प्रकाश मगर,अक्षय हांडगे,ज्ञानेश्वर बेरड तसेच परीसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment