सरपंचासह ग्रामस्थांकडून पंचनामा.
विसापूर
सुरेगाव ता.श्रीगोंदा येथील श्रीधर स्वामी विद्यालयात शिक्षक व कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मुख्याध्यापकांसह संबंधीत जबाबदार शिक्षकांवर कारवाई करावी.अन्यथा ही शाळा बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सुरेगाव येथे कोरेगव्हाण येथील कृषक सेवा संघ या संस्थेच्या वतीने दहावी पर्यंत श्रीधर स्वामी विद्यालय चालवले जात आहे.गुरुवार दि.५ रोजी शाळा उघडल्यावर सरपंच सर्जेराव रोडे,कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे,उपसरपंच गुलाब रामफळे,प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण रोडे,डॉ.अनिल मोरे व ग्रामस्थांनी या शाळेला भेट दिली.त्यावेळी शाळेत मुख्याध्यापक शरद टकले उपस्थित नव्हते.इतर काही शिक्षकही हजर नव्हते.जे हजर होते तेही इतरत्र मोबाईलवर बोलत फिरताना आढळून आले.ग्रामस्तांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.दुपारी बारा वाजता मुख्याध्यापक शरद टकले हजर झाले मात्र तेही ग्रामस्थांना समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.त्यामुळे ग्रामस्थांनी परिस्थितीचा पंचनामा करून तो पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सादर केला आहे.चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास शाळा बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
# शाळेचा दर्जा घसरल्यामुळे विद्यार्थ्यांची विसापूर येथे प्रवेश घेण्यास पसंती.
गेल्या चार पाच वर्षात या शाळेचा दर्जा घसरल्यामुळे गावात शाळा असताना पालक आपल्या मुलांना विसापूर येथील सरस्वती विद्यालय शाळेत प्रवेश घेण्यासाठी पसंती देत आहेत.त्यासाठी भाडोत्री वाहानाची व्यवस्था पालकांना करावी लागत आहे.सुरेगाव येथुन विसापूर येथे तिसरा ते चाळीस विद्यार्थी दररोज येतात.मात्र सुरेगाव येथील विद्यालयात केवळ शंभर ते सव्वाशे एवढी पट संख्या आहे.ज्या पालकांची बाहेर गावी पाठवून शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नाही त्यांना मात्र नाईलाजाने या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागतो.त्या विद्यार्थ्यांचे गुणवत्तेचे काय हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यां बाबत केलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल.ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यात काही गैर समज असतील तर चर्चा करून समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जातील.
---- सचिन नामदेव गोंटे(सचिव), कृषक सेवा संघ, कोरेगव्हाण ता.श्रीगोंदा.
ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यां बाबत केलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल.ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यात काही गैर समज असतील तर चर्चा करून समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जातील.
---- सचिन नामदेव गोंटे(सचिव), कृषक सेवा संघ, कोरेगव्हाण ता.श्रीगोंदा.

Post a Comment