नेवासा, प्रतिनिधी
नेवासा शहरातील विविध शाळा परिसर तसेच शहरात चौकाचौकात अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरे व डासांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी नेवासा नगरपंचायतवर गुरुवारी मोर्चा काढला.
गुरुवारी दुपारी दीड च्या सुमारास गणपती मंदिर चौकातून मोर्चा काढण्यात आला यावेळी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा तसेच डासांचा बंदोबस्त करावा या आशयाच्या घोषणा देत विद्यार्थी व नागरिक नगरपंचायत कार्यालय येथे आले.नेवासा शहरातील ज्ञानदीप इंग्लिश स्कूल,ज्ञानोदय इंग्लिश स्कूल,सेव्हेंथ डे स्कूल,जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस
मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे पांढऱ्या पेशी कमी होणे व डेंगू सदृश्य आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर बदामबाई गांधी विद्यालय जवळ कचरा डेपो असल्याने येथील विद्यार्थ्यांना ही या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असून अनेक लहान मुले यामुळे आजारी पडले असून नेवासा शहरातील दवाखाने हे रुग्णांनी गजबजले असल्याने त्यातच मलेरिया,डेंगू सदृश्य तापाचे रुग्ण आढळत असल्याने हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बोलतांना भाऊसाहेब वाघ म्हणाले की शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून त्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा तसेच डासांच्या समस्येवर उपाययोजना करावी अन्यथा नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात येईल.
यावेळी बोलताना रामभाऊ केंदळे म्हणाले की प्रभाग क्रमांक सहा मधील संभाजी नगर येथील एका अंगणवाडी ची अवस्था अत्यंत वाईट झाली असून अंगणवाडी भोवती उघड्या गटारी असल्याने अनेक चिमुकले आजारी पडले आहे.भटक्यांचे नेते पोपटराव जिरे म्हणाले की अडीच वर्ष झाले शहरात नगरपंचायत होऊन मात्र शहरातील एक रस्ता ही नीट नाही प्रत्येक भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे साथीचे आजार पसरत आहे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी कार्यालयीन प्रमुख रविंद्र गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब वाघ,महेश मापारी,अभिजित मापारी,सुनील धायजे,युसूफ बागवान,रामभाऊ केंदळे, अंकुश पंडुरे,शिवा राजगिरे,शिक्षक काकासाहेब काळे, अनिल भणगे,गणेश पोटे,अरविंद घोडके,राहुल आठरे, कडूबाल काळे,विश्वनाथ नाणेकर,शिवा राजगिरे व शाळेतील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment