नेवासा, प्रतिनिधी
लाखो भाविकांचे कुलदैवत खंडोबा रायाची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील प्रवरानदीच्या तीरावर जीर्णोद्धार करून नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसा मंदिरासह घोड्यावर स्वार
असलेल्या खंडोबा-म्हाळसाच्या नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात चंपाषष्ठीच्या दिवशी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास तळीभंडाऱ्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रसिध्द किर्तनकार हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.या प्रसंगी श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व हभप मीराबाई मिरीकर,सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज मंडलिक,हभप संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख,महंत सुनीलगिरी महाराज,सौ.सुनीताताई गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात बसविण्यात आलेल्या म्हाळसा खंडोबा या मुख्य मूर्तीसह शेजारीच स्थापना करण्यात आलेल्या देवर्षी नारदमुनी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंद बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आली.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेसदेवा गुरू कुलकर्णी व ब्रम्हवृंद मंडळींनी केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व संत महंतांचे स्वागत व पूजन मंदिराचे व्यवस्थापक प्रा.डॉ.
मुरलीधर कराळे व सौ.कमलताई कराळे यांनी केले.यावेळी म्हाळसादेवीच्या नेवासा येथील माहेरचा महिमा असलेले म्हाळसा माहेर पुस्तकाचे अनावरण यावेळी संत महंतांच्या हस्ते करण्यात आले.गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यावेळी बोलताना गावकरी व जावई मंडळींच्या सहकार्याने हया मंदिराची उभारणी झाली याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बाळू महाराज कानडे, नामदेव महाराज कंधारकर,हभप कोंडीराम बाबा पेचे, सरपंच प्रकाश सोनटक्के,माजी सरपंच दादासाहेब कोकणे,बाबा कांगुणे,भानुदास रेडे,बाळासाहेब कोकणे, संभाजी ठाणगे,बाबा कांगुणे, माऊली पेचे,अनिल मारकळी,प्रभाकर दादा बोरकर,पोलीस पाटील दिलीप गायकवाड यांच्यासह जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य ग्रामस्थ सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना खंडेरायांना प्रिय असलेला वांग भरीत व भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात आला.
गावकऱ्यांच्या एकोप्याचे कौतुक
मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी कमी पडत असल्याने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन बोली पध्दतीने निवडणूक बिनविरोध केली ज्याला सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व्हायचे त्याने मंदिरास देणगी द्यावी असे जाहीर करण्यात आले त्यानंतर निवडणुक बिनविरोध करून सुमारे पंधरा लाखांचा निधी जमा झाला हे सर्व आदर्शवत काम गावकऱ्यांच्या एकोप्याने झाले असल्याने गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.व मंदिर पूर्ण केल्याबद्दल व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे यांना देखील धन्यवाद देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला.

Post a Comment