हॅरिसन ब्रँच शाळेत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

चांदेकसारे ( वार्ताहर ) 
कोपरगाव तालुक्यातील हॅरिसन ब्रँच शाळेत केंद्रस्तरीय मासिक शिक्षण परिषद केंद्रप्रमुख दिलीप ढेपले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.शिक्षण परिषदेची सुरुवात वळवी सर यांनी विपश्यनेबद्दल माहीती देऊन १०मिनिटे ध्यानधारणा घेऊन शिक्षकांची मनं एकाग्र केले व श्वासावर नियंत्रण कसे ठेवायचे?याबाबत सखोल माहीती दिली.तसेच शिष्यवृत्ती भाषा,गणित व इंग्रजी विषयांवर घटकनिहाय प्रश्नपत्रिकेचे स्वरुप समजून सांगण्यात आले.दिक्षाॲपचा अध्यापनात वापर कसा करावा याबद्दल प्रत्यक्ष ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून माहीती देण्यात आली.तसेच समृद्ध  ग्रंथालय,विज्ञान विषय व पुस्तक परिक्षण इ.तासिका घेऊन सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
  सदर परिषदेस गटशिक्षणाधिकारी पोपट काळे हजर होते.त्यांनी यावेळी केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन केले.यापुढे अधिकाऱ्यांची शाळातपासणी व  वर्गतपासणी ही सुलभकाच्या भूमिकेतून केली जाणार आहे असे सांगितले.तसेच त्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेला बसण्याची सर्व विद्यार्थ्यांना संधी देण्याचे आवाहन सर्व शिक्षकांना केले.सदर शिक्षण परिषदेत तज्ञ मार्गदर्शक म्हणूनअण्णा मोकळ  वळवी  कुळधरण व सचिन आढांगळे सर यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेचे कामकाज  सुधाकर निकुंभ,नवनाथ सुर्यवंशी व मनिषा शिंपी यांनी पाहिले.
मासिक शिक्षण परिषद चांदेकसारे केंद्रातील वेगवेगळ्या शाळांवर घेण्याचे सर्व मुख्याध्यापकांनी ठरवले होते.यावेळी हॅरिसन ब्रँच शाळेने शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.त्याबद्दल केंद्रातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget