राज्य उत्पादन शुल्क विभागाचे झोपेचे सोंग ? मद्यपिंना आजाराच्या धोक्याची शक्यता ?
नेवासा,प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात सध्या बनावट दारुचा महापूर ढाब्यांवर वाढला आसून ही दारु आता बियरबारमध्ये शिरकाव करत आसतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेचे सोंग घेत आसल्यामुळे मद्यपिंना दुर्धर आजारांना सामोरे जाण्याची वेळ सध्या ओढावली जात आसून राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारु विक्रत्यांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून जोर धरु लागली आहे.
नगर - औरंगाबाद महामार्ग व शेवगांव - श्रीरामपूर राज्यमार्गावरील आसलेल्या हॉटेल व ढाब्यांसह आता ही बनावट दारु बियरबार पर्यंत शिरकाव केलेला आसतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत आसल्यामुळे सामान्य जनतेतून आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे

إرسال تعليق