श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र बहिरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी श्री कालभैरवनाथांचा मुख्य जन्मोत्सव सोहळा

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री बुधवार दि.१३ नोव्हेंबर ते बुधवार दि.२० नोव्हेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.बुधवारी दि.१३ नोव्हेंबर रोजी धर्मध्वजारोहण करून अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला.मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता श्री कालभैरवनाथांचा मुख्य जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.
    या सोहळ्यात पहाटे ५ ते ६ काकडा भजन,सकाळी ७.३० ते ११.३० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तन असे कार्यक्रम होणार आहे.तर हभप रामनाथ महाराज पवार,
हभप चंद्रकलाताई  भांबर्डे, हभप राऊत महाराज, भेंडा येथील बालकीर्तनकार अभिराज उगले, गेवराई येथील हभप काळे ताई,शिवशाहीर कल्याण महाराज काळे, यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे
    मंगळवारी दि.११ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १२ या वेळेत सावखेडा येथील हभप नारायण महाराज यांच्या श्री कालभैरवनाथांच्या अवतारावर होणाऱ्या किर्तनाने जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे तर बुधवार दि.२० 
नोव्हेंबर गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सव सोहळया निमित्त आयोजित अखंड हरिनाम सोहळयाची सांगता होणार आहे.
    श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सव सोहळया निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  सोहळा कमिटी,श्री कालभैरवनाथ देवस्थान विश्वस्त मंडळ,श्री कालभैरवनाथ तरुण मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget