महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांची देवगडला भेट !

देवगडमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प युनिट कार्यान्वित करणार-विजयकुमार काळम पाटील

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे सदगुरू किसनगिरी बाबांचे निस्सीम भक्त महावितरण कंपनीचे कोकण विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी भेट दिली.देवगडच्या या पवित्र क्षेत्री भाविकांच्या सुविधेचा एक भाग म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प युनिट कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही 
यावेळी बोलताना दिली.
यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार केला.श्री क्षेत्र देवगडचे निर्माते श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा हे आपले श्रद्धास्थान असून त्यांच्याच शिकवणुकीनुसार आपली वाटचाल सुरू असून एक सेवक म्हणून आपण या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करू आपण त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.
यावेळी हभप बाळू महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे,चांगदेव आण्णा साबळे,महेंद्र फलटणे,संत सेवेकरी सुधीर चव्हाण,सुहास पठाडे,औरंगाबाद भक्त मंडळाचे सेवेकरी प्रसिद्ध गायक बजरंग विधाते,राम विधाते,श्री म्हस्के साहेब बदामराव पठाडे,सरपंच अजय पाटील,माजी उपसरपंच भीमाशंकर वरखडे,संदीप साबळे,आदी सेवेकरी उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget