मुरमे(देवगड)गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या तपपूर्ती सोहळयाचे आयोजन

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील मुरमे(देवगड) गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाच्या तपपूर्ती सोहळयाचे आयोजन शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती सोहळा संयोजक सरपंच अजय साबळे यांनी दिली.
श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा व वैकुंठवाशी नासिकेत महाराज कोरेकर यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व ह.भ.प. नारायण महाराज ससे यांच्या अधिपत्याखाली होणाऱ्या या सोहळयाचे धर्मध्वजारोहन शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता धर्मध्वजारोहण श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते होणार असून पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते११
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी ४ ते ५ या वेळेत ह.भ.प. नारायण महाराज ससे यांच्या सुश्राव्य वाणीतून संतचरित्र कथा,सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हरिपाठ,रात्री ८.३० ते ९.३० यावेळेत गणेशानंद महाराज चिंचोलीकर,नंदकिशोर महाराज बोधेगावकर,दादा महाराज वायसळ,हभप ऋषिकेश महाराज गोंधवणीकर,रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात नेवासकर,मारुती महाराज झिरपे चापडगावकर,रामायणाचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी दि.२२ नोव्हेंबर रोजी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या सकाळी ९ ते ११ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने या तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.या सोहळ्यात होणाऱ्या कीर्तन व संत चरित्र कथा श्रवणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन मुरमे ग्रामस्थ व सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget