पुरा कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने देवगड येथे तीन लाख भाविकांची मांदियाळी !

नेवासा, प्रतिनिधी
त्रिपुरा कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले दिवसभरात तीन  लाख भाविकांनी दर्शन घेतले.
    कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने पहाटे ४ च्या सुमारास वेदमंत्राच्या जयंघोषात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य शरद गुरू काटकर,कांतागुरू जोशी,आचार्य गणेशगुरू देवा कुलकर्णी स्वानंद जोशी यांनी केले.
              यानिमित्ताने देवगडच्या गंगाघाटावर हजारो भाविकांनी गंगास्नान करून प्रवरामाईला पंचारती ओवाळून पूजा केली तसेच मंदिर प्रांगणात विधीवत पूजेने
त्रिपुरावाती जाळल्या.मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये असंख्य जोडप्यांनी देखील कार्तिक स्वामींच्या चांदीच्या मूर्तीस अभिषेक घातला.
         कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने पहाटे ४ वाजेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी झाली होती त्यानंतर गर्दीचे रूपांतर मोठ्या दर्शनबारीत झाले.दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांशी सुसंवाद साधत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी स्वागत केले.दुपारी १२ वाजता यानिमित्ताने झालेल्या महाआरती प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या समवेत राजस्थान येथील भागवताचार्य महंत परमपूज्यनीय पवनकुमार मालोदिया महाराज हे उपस्थित होते. मंदिर प्रांगण भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.प्रत्येकाच्या हातात कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस सर्वांचे आकर्षण ठरले होते.
           भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून संत संतसेवक व भक्त परिवाराच्या वतीने हभप बाळू महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे,प्रसिध्द गायक रामजी विधाते,बजरंग विधाते,अंबादास फोलाणे,बदामराव पठाडे,महेंद्र फलटणे,चांगदेव साबळे,विवेक महाराज साबे ,सरपंच अजय साबळे,संदीप साबळे,दामोदर साबळे,ज्ञानदेव लोखंडे,रामेश्वर तनपुरे,बंटीभाऊ पठाडे, यांनी स्वयंसेवकाची भूमिका मोठी जबाबदारी पार पाडली.
   कार्तिक स्वामींचे येथे मंदिर प्रांगणात मंदिर असंल्याने 
मंदिराच्या बाहेरील प्रांगणात देखील मोठी यात्रा भरली होती.विविध गृहपयोगी वस्तूंच्या स्टॉलसह मेवामिठाई धार्मिक ग्रंथ,खेळणी यांची दुकाने ही मोठया प्रमाणात थाटण्यात आली होती.त्रिपुरा कार्तिक पौर्णिमेनिमित्त कणकोरी,जामगाव,गळनिंब येथील भक्त परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget