विसापूर कारागृहात कैद्यांच्या बराकीत कोब्रा. सर्पमित्र अशोक कराळे यांनी केला जेरबंद.

विसापूर
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुले कारागृहात रविवारी कैद्यांच्या बराकीजवळ कोब्रा जातीचा नाग आढळला. 
    रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कैद्यांचे वास्तव्य असणाऱ्या बराकींजवळ पिंपळाचे झाड आहे तेथे कारागृहाच्या मध्येभागी कोब्रा जातीचा नाग असल्याचे एका कैद्याने पाहीले.त्यांनी या बाबतीत गेटवरील सुरक्षा रक्षकांना ही माहिती दिली.कारागृह अधिक्षक दत्तात्रय गावडे यांनी विसापूर येथील सर्पमित्र अशोक कराळे यांना बोलावून घेतले. कराळे यांनी शिताफीने तो नाग पकडून जेरबंद केला व नंतर विसापूर फाट्याजवळ जंगलात त्या मुक्त केले.कारागृह विसापूर जलाशयाचे कडेला असल्याने धरण पाण्याने भरल्या नंतर कारागृह परीसरात विषारी व बिनविषारी सापांचा वावर वाढला आहे.
विसापूर कारागृह ब्रिटिश सरकारने बांधलेले आहे.त्यावेळी कारागृहाला लोखंडी पट्ट्याचे सहाय्याने कुंपण घातलेले आहे.त्यामुळे त्या कुंपणातुन सापांच्या बरोबरच लहान प्राण्यांच्या पिल्ले प्रवेश करतात.कैद्यांच्या व कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे.विसापूर कारागृहाच्या बराकी मोडकळीस आलेल्या आहेत.सुमारे सत्तर ऐंशी वर्षा पुर्वीच्या जुन्या कौलारू इमारती असल्याने त्या नवीन बांधणे गरजेचे आहे.

२०१३ पासून विसापूर कारागृहाचा दर्जा खुले कारागृह झाला आहे.खुले कारागृह कुंपण मुक्त असते.त्यामुळे कुंपणाचा प्रस्ताव विचारात घेतला जाऊ शकत नाही.मात्र कारागृहाला चार बराकी निधीसह मंजूर आहे. डिसेंबर अखेर प्रत्यक्ष काम सुरू होणे अपेक्षित आहे. 
          - दत्तात्रय गावडे,अधिक्षक, 
       विसापूर खुले जिल्हा कारागृह.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget