विसापूर
सामाजीक शांतता भंग होईल अशा प्रकारचे व चुकीच्या माहितीवर आधारित मेसेज फॉरवर्ड करताना नागरिकांनी काळजी घ्यावी.सोशल मीडियावर पोलीसांचे सायबर विभागाची करडी नजर असल्याचे बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले.
राम जन्म भुमी व बाबरी मशीद प्रकरणी येत्या काळात कधीही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो त्या अनुषंगाने बेलवंडी पोलीसांनी विसापूर येथे संचलन केले.या संचलनात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे,सहायक उपनिरीक्षक बजरंग गवळी,गुप्त वार्ता विभागाचे झावरे व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी शांतता समितीची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी अरविंद माने बोलत होते.ते पुढे म्हणाले की, कायद्याने न्यायालयाच्या निकाल मान्य करणे बंधनकारक आहे.त्यामुळे न्यायालयाने निकालानंतर कोणत्याही प्रकारची टिका टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊन पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी सरपंच अरविंद जठार,जेष्ठ व्यापारी शफीशेठ सय्यद,युनुसशेठ सय्यद,विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते दादा ढवाण,रयत सेवक बँकेचे माजी संचालक सुरेश जठार,पत्रकार नानासाहेब जठार,बाळासाहेब काटे,ग्रामपंचायत सदस्य संतोष गटणे व अकिल सय्यद,राजेंद्र घायमुक्ते,शशिकांत गटणे,बाळासाहेब जठार, प्रकाश भोसले व नागरिकांनी उपस्थित राहून चर्चेत भाग घेतला.



إرسال تعليق