कहार समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन, नावनोंदणीसाठी आवाहन

नेवासा, प्रतिनिधी
कहार समाज व कहार कर्मचारी सेवा स्ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे कहार समाजाच्या तिसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि.१ डिसेंबर रोजी करण्यात आले असून या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहयोग्य जोडप्यांचे आयोजकांकडून विनाशुल्क लग्न लावून देण्यात येणार आहे नेवासा तालुक्यातील गरजू  कुटुंबांनी या सोहळया साठी त्वरित नावे नोंदवावीत असे आवाहन समाजाचे युवा नेते संतोष पडूंरे यांनी केले आहे.
   औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रांगणात होणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळयामध्ये लग्न करणाऱ्या नवदाम्पत्यांना शासनाच्या वतीने सवलती मिळवून देण्याचा प्रयत्न संयोजकांच्या वतीने करून देण्यात येणार आहे.
   नेवासा तालुक्यातील कहार समाजातील ज्या बांधवांना आपल्या मुलामुलींची लग्ने या विवाह सोहळ्यात करावयाची आहे अशा गरजूंनी समक्ष भेटून आपली नावे नोंदवावीत.यासाठी या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा तसेच या सामुदायिक विवाह सोहळ्यात नेवासा तालुक्यातील जास्तीत जास्त कहार समाजातील अविवाहित असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या मुलामुलींची नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे
       दि.१४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत नाव नोंदणी करणा-या नियोजित वधु वरांची नावे पत्रिकेत छापण्यात येतील आणि त्यांना कन्यादान योजनेचा फ़ायदा देण्याचा प्रयत्न करता येईल,सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जोड्या वाढविण्यात याव्यात असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री संतोष पंडुरे यांनी केले आहे.सामूहिक विवाह सोहळ्या साठी जी स्वेच्छा मदत स्वीकारण्यात येईल ती मदत रोख रक्कम,चेक,आणि ट्रष्टच्या खात्यात ऑननलाइन ही जमा करण्यात येईल व संबंधितास त्याची वर्गणी पावती देण्यात येईल. सदरील मदत श्री संतोष पंडुरे आणि श्री मोहींदर  पंडुरे यांच्याकडे जमा करावी 
      सामूहिक विवाह सोहळा या उपक्रमाबरोबर समाज बांधवांचा विमा उतरवण्यात येईल. त्यासाठी रुपये बारा भरुन त्यासाठी जे  समाजबांधव टेबल टाकून विवाहस्थळी बसलेले असतील. त्यांच्याकडे नावे द्यावी समाजबांधवांनी आपल्याकडे असलेल्या कोणत्याही बँकांचा खाते क्रमांक  सोबत आणावा ही विनंती त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन आणि मदत विवाहस्थळी करण्यात येईल कहार समाज बांधवांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणा-या गुणवंत विद्यार्थी आणि विशेष उल्लेखनीय कार्य असणा-या समाज बांधवांचा लहान मुलांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येईल.
       विविध समाजबांधवांच्या मंडळाचे, गावांचे, संघटनांचे,  कृतीशील योगदानाबद्दल सोहळ्यानंतर कहार कर्मचारी सेवा ट्रष्टच्या वतीने इच्छूकांना आभारपत्र देण्यात येईल. श्री किशोर बिरुटे यांच्याकडे नावे देण्यात यावी
कोणा समाज बांधवास आपल्याकडून बॅनरवर शुभेच्छा द्यायच्या  असतील किंवा आपल्या दुकान आणि इतर गोष्टींची विवाहस्थळी जाहिरात करायची असल्यास ३ बाय ४ च्या  आकाराचे बॅनर संयोजक ठरवतील त्या ठिकाणी लावण्यात येईल. त्यासाठी समाजासाठी वर्गणी म्हणून  घेण्यात येईल अधिक  माहितीसाठी व मदतीसाठी संतोष पंडुरे , नेवासा आणि श्री मोहींदर पंडुरे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन डॉ.दिनेश पंडुरे,मोहिनीराज सरगैये ज्ञानेश्वर पंडुरे,आंनद प-हे,कैलास कुंढारे,नितीन लहिरे, कडुभाऊ रासने,डॉ देवीलाल गरुटे,राजू परसैय्या, सुरेश पंडुरे,मच्छिंद्र पल्लारे व तालुक्यातील कहार समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget