मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... अन् मी पुन्हा येईल...

राज्याचे मुख्यमंञ्याचे ठासून वाक्य सोशलवर टिंगल झाली होती ती वास्तवात खरी ठरणार !

नेवासा, प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांनी विधानसभा निवडणूकीतील प्रचार काळात मोठ्या राणाभिमदेवी थाटात छातीठोक पणे मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... असे निवडणूक प्रचार काळात सांगितलेले होते.माञ सर्वाधिक जागा जिंकूनही सरकार बनविण्याचा तिढा सुटला नसल्याने नेमके सरकार कोणाचे होणार ही चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली होती. शिवसेना व आघाडी सरकार बनविण्याच्या चर्चेला उधाण आल्यावर मुख्यमंञ्याचे मी पुन्हा येईल भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टिंगल केल्या सारखा पसरत चालला आसतांना राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने तो मुख्यमंञ्याचा पुन्हा येईल व्हिडीओ खरा ठरणार आसल्याने चेष्टेचा विषय खरा होतो की,काय अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. सर्वाधिक जागा भाजपाने जिंकून सरकार बनविण्यासाठी संख्याबळ अपूरे पडत होते.शिवसेना अन् भाजपाचा कलगीतुरा मुख्यमंञी पदावरुन घोडे आडलेले होते.त्यातच राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांनी पञकार परिषद घेवून जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसविलेले आसून आम्ही हा कारभार चांगला संभाळू असे सांगितल्याने आता मुख्यमंञी फडणविस यांच्या त्या व्हिडीओकडे चेष्टेने बघणाऱ्यांना तोच खरा होणार की, काय अशा चर्चेने सरकार बनविण्याच्या हालचालीकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget