सोनईत सर्व जाती-धर्मीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न

सोनई
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक मार्ग ( दिंडोरी प्रणित) विवाह संस्कार विभागाच्या वतीने  सोनई (ता.नेवासा) येथिल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे  सर्व जाती-धर्मीय वधू- परिचय मेळावा संपन्न झाला.

मेळाव्याचे उदघाटन सोनई सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव गडाख यांच्या हस्ते झाले. यावेळी विवाह मंडळाचे प्रतिनिधी शैलेश बैरागी,सरोजिनी गडाख, भुषण वाबळे ,अमृत डोईफोडे,नितीन ढवळे,अरविंद गायकवाड,किशोर जठार,सुजाताताई क्षिरसागर, जिल्हा विवाह मंडळाचे ज्ञानेश्वर कापसे,अनिल शिंदे उपस्थित होते. 

सकाळी साडेदहा वाजता केंद्रात  नैवेद्य आरती सोहळा झाल्यानंतर  तालुक्यातून आलेल्या मुला-मुलींची विवाह संस्कार विभागात मोफत नाव नोंदणीस सुरवात करण्यात आली.

स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.शेतीशास्र, वास्तुशास्त्र सण-उत्सव,सेवामार्ग या विषयी माहिती दिली. विवाह संस्कार विभागाच्या वतीने मान पान,हुंडा टाळून साध्या पध्दतीने विवाह पार पाडण्याचे आव्हाहन यावेळी करण्यात आले. यावेळी सोनई सह तालुक्यातील सेवेकरी उपस्थित होते.कार्यक्रम यथस्वी पार करण्यासाठी सोनई केंद्राने परिश्रम घेतले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget