भेंड्यात चोरट्यांचा धुमाकूळ...

श्रीसंत नागेबाबा मंदिरातील दानपेटीसह एक लाखाचा ऐवज लंपास

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावात काल मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून भेंडा गावचे ग्रामदेवत श्रीसंत नागेबाबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलुन नेली आहे तर बसस्थानक चौकातील पंडित सराफ हे सोने-चांदी विक्रीचे दुकान फोडण्यात आले आहे.

सोमवारी दि.18 नोव्हेंबर पहाटे 3 वाजता पुजारी अशोक परशराम गव्हाणे हे मंदिरात साफसफाई साठी  आल्याने  मंदिराचा पूर्वेकडील मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.आत मंदिरात पाहिले असता मंदिरातील दानपेटीत गायब असल्याचे लक्षात आली.त्यानंतर त्यांनी लगेच ही घटना मंदिर विश्वस्त व गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज वरून काल रविवार दि.17 रोजी रात्री  1:13 मिनीटांनी 6 चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे मंदिरात असल्याचे स्पष्ट होत आहे.
या चोरीत चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची दानपेटी आतील पैसे व ऐवज 60 ते 65 हजार रुपये असे अंदाजे  1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.मागील महिन्यात दानपेटी उघडून आतील जमा रक्कम बँकेत जमा करण्यात आली होती.
तर दुसऱ्या घटनेत भेंडा बसस्थानक चौकातील नागेबाबा मंदिर रस्त्यावर असलेले सागर पंडित यांचे पंडित सराफ या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली आहे.अजून प्रत्यक्ष मोजदाद न झाल्याने  नेमका किती ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप समजलेले नाही.

नागेबाबा मंदिरात दुसऱ्यांदा दानपेटीची चोरी...
या पूर्वीही 4 ऑगस्ट 2016 रोजी श्रीसंत नागेबाबा मंदिराचे मुख्य प्रवेश व्दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दान पेटी,सीसीटीव्ही कॅमेरा मशीन(डीव्हीआर)  व रोख रक्कम असा 89 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती.या घटनेचा अद्याप ही तपास लागलेला नाही.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget