नेवासा, प्रतिनिधी
नेवासा रोड नेवासा फाटा हा रस्ता मृत्युचा सापळा बनला आसून रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रस्ता अपघाताचे प्रमाण वाढले आहे याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आसून या रस्त्याची त्वरीत डागडूजी न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेवासा फाटा येथील शिवाजी मिञ मंडळाच्यावतीने देण्यात आला आहे.
या रस्त्यावर मोठ - मोठी खड्डे पडल्यामुळे अनेक दुचाकीस्वरांचा अपघात होत आसून किरकोळ दुखापती होत आसल्याचा दररोजचा हा प्रकार घडतांना दिसून येतो त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आसून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आसून निप्षाप चालकांना इजा होण्यास बांधकाम खातेच जबाबदार आसल्याचा आरोपही शिवाजीनगर मिञ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांतून उपस्थित केला जात आहे


إرسال تعليق