पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागातील नद्या ओसंडून वाहु लागल्या!

परीसर झाला निसर्गरम्य 

पाथर्डी - प्रतिनिधी | अमोल म्हस्के
मागील दोन आठवड्यापासून झालेल्या पाऊसामुळे पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागातील पागोरी पिपंळगाव परीसरातील सगुणा, निर्गुणा नद्या पाण्याने वाहु लागल्या आहेत.या नद्यांच्या संगम  पागोरी पिपंळगाव मध्ये होतो.
या नद्यांना पाथर्डी तालुक्यातील  शिरसाटवाडी,माळेगाव, परीसरातील वाहत येणाऱ्या नद्यांचे पाणी वाहत येवून या नद्यांना मिळते.प्रभू पिपंरी,सांगवी,पागोरी पिपंळगाव,सुसरे,लोखंडवाडी  परीसर पाणीदार झाला आहे.या भागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत असते.खूप दूरवरुन गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात परीसरात वणवण करावी लागते.
परंतु या वर्षी नद्या ओसडूंन वाहू लागल्याने या ठिकाणी असणारे साठवण बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत.हातपंप देखील ओसंडून वाहत आहेत.तसेच शेतकऱ्यांचे असणारे बोअरवेल च्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.दोन साठवण बंधारे पाण्याने भरुन वाहत आहे.
मागील दोन वर्षापासून परीसरातील लोकांना व शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्या भेडसावत होत्या.दुष्काळी भाग असल्याने विकास कामे कमी प्रमाणात झालेली दिसून येतात.आणखी साठवण बंधारे या ठिकाणी होणे गरजेचे आहे.या
वर्षी चांगला पाऊस होवून नदीला पाणी आल्याने शेतकरी,परीसरातील नागरिक खूश असून या वर्षी शेतात चांगले पिके होतील असे परीसरातील शेतकऱ्यांचे मत आहे.या परीसरात प्रामुख्याने ऊस,गहू,ज्वारी,भुईमूग,या सारखे पीक घेतली जातात.तसेच दांळीब,संञाच्या फळबागा आहेत.
नदीला आलेल्या पाण्यामुळे येथील परीसर पाणीदार झाला आहे.या भागात झालेल्या पाऊसामुळे जनावरांच्या चा-याचा प्रश्न मार्गी लागला असुन बाजरी,कापूस,मका पिकाचे काही  प्रमाणात नुकसान झाले आहे.एकूणच परीसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget