शेतकऱ्यांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी -बाळासाहेब ढाकणे

पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी 

पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील   शेतकऱ्यांच्या वतीने पाथर्डी येथे दि.(०६) जिल्ह्यातील भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली 
 शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे  न करता सरसकट पिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी नायब तहसीलदार मा.सरोदे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक पाथर्डी तालुका प्रमूख नवाब भाई शेख, आल्हणवाडीचे माजी सरपंच मच्छिद्र गव्हाणे, आर.पी. आय.चे संजय साळवे, कॉ. रामभाऊ दातीर व तालुक्यातील असंख्य शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते. यावेळी निवेदनात ढाकणे यांनी पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट पिक नुकसान मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करुन ओला दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याचे परीक्षा फी शुल्क माप करावे,शेतकऱ्यांना दुबार लागवडी व पेरणीसाठी तातडीने आर्थिक मदत मिळावी, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांना दुरुस्तीसाठी मदत मिळावी,शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी तीस हजार रुपायांची मदत तातडीने मंजूर करावी, शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या सर्व योजना लागु कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन बाळासाहेब ढाकणे यांनी दिले.शेतकऱ्यांच्या व्यथा मोठ्या  पोटतिडकीने मांडल्या. यावेळी  आल्हणवाडीचे माजी सरपंच मच्छिद्र गव्हाणे यांनी शासनाने पंचनामे करण्यात प्रशासनाचा व शेतकऱ्यांचा वेळ वाया घालण्याऐवजी शासनाने सरसकट पिक नुकसान भरपाई मिळावी हा प्रश्न मांडला.यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. नायब तहसीलदार सरोदे मॅडम यांनी निवेदन स्विकारुन आपल्या माघण्यांचे निवेदन तातडीने शासनास कळवू असे सांगितले. नायब तहसीलदार मा.सरोदे मॅडम यांनी शेतकऱ्यांच्या तिव्र भावना समजून घेतल्याबद्दल तसेच निवेदन देण्यासाठी तालुक्यातून आलेल्या असंख्य शेतकऱ्यांचे पाथर्डी तालुका भाजपा अल्पसंख्यांक प्रमूख नवाबभाई शेख यांनी आभार मानले.


إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget