पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील अकोला,पालवेवाडी,मोहजदेवढे,बोदरवाडी येथे अवकाळी पाऊसाने झालेल्या पिकाचे झालेल्या नुकसानाची पाहणी शेवगाव पाथर्डीच्या आ. मोनिका राजळे यांनी केली.यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.तसेच यावेळी पाथर्डी तालुका प्रांत अधिकारी श्री. देवदत्त केकान व तहसीलदार श्री नामदेव पाटील यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आ.मोनिका राजळे यांनी दिले व प्रांत अधिकारी व तहसिलदार यांनी मान्य केले.


إرسال تعليق