गाव ते देश पातळीवर काम करणारी ग्राहक पंचायत

प्रांत अधिशेनाचा शानदार समारोप 

नेवासा, प्रतिनिधी
त्यागी वृत्तीने व तपस्वितेसाठी १० जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दोन दिवस शंका समाधान ,मुक्त चिंतन , आत्मचिंतन ,संवाद आदिंची देवाण घेवाण केली .शासकीय अनुदानावर न चालता समाजाच्या दानावर चालणारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत असुन निरपेक्ष भावनेने गाव ते देश पातळीवर काम करणारी अखिल भारतीय ग्राहक चळवळ होय , असे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजयराव गायकवाड म्हणाले.  

          अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे दोन दिवसीय अधिवेशन नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती प्रतिष्ठान मध्ये संपन्न झाले . समारोप प्रसंगी गायकवाड बोलत होते. व्यासपिठावर संघटन मंत्री बाळासाहेब औटी , प्रांत सचिव भालचंद्र पाठक , कोषाध्यक्ष विलास लेले , कार्यकारीणी सदस्य प्रसाद बुरांडे  , केदार नाईक , भाऊसाहेब पोरे , आदिंची उपस्थिती होती. 

         अधिवेशनात डाॕ .अरुण गद्रे यांनी रुग्ण सेवा ग्राहक संरक्षण मध्ये यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माहिती अधिकार राष्ट्रिय प्रशिक्षक प्रा. संदिप काळे यांनी माहिती अधिकारात कोणताही बदल झाला नाही. माहितीसाठी अर्ज दिल्यानंतर तो मागे घेण्याची तरतुद नाही . भ्रष्टाचारास आळा घालणे व प्रशासनात पारदर्शकता हा या कायद्याचा उद्देश आहे .कायदे समजुन घेण्याची सवय बालपणापासुनच असावी , असे सांगुन माहिती अधिकारातुन व्यावसायिकता वाढत असल्याबाबत खंत व्यक्त केली. ग्राहक मंचाचे निवृत्त अध्यक्ष अजय भोसरेकर यांनी नविन ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदी विषद करुन ग्राहकांनी कोठेही वस्तु खरेदी केली तरी रहिवास असणाऱ्या जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल करता येते हा मोठा फायदा असल्याचे सांगीतले. पुणे जिल्हा उर्जा समितिचे सदस्य नितिन मिंडे यांनी विज ग्राहकांच्या विविध समस्यांवर कायदेशिर तरतुदी बाबबत माहिती दिली. 

   प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी ग्राहक पंचायतीचा सिध्दांत , साधना व कार्यध्दती याबाबत सखोल विवेचन केले .प्रांत कोषाध्यक्ष विलास लेले यांनी निधी संकलन , विनियोग , हिशोयाबाबत सविस्तर विवेचन केले.  प्रांत कार्यकारीणी सदस्य 

 भालचंद्र पाठक यांनी संघटना , सुत्र व तालुका , जिल्हा ,प्रांत कार्यकारीणी व विस्तारक योजना , नियमीत बैठका याबाबत माहिती  दिली. त्रिमुर्ती प्रतिष्ठानचे सचिव मनिष घाडगे ,अधिवेशनास नागेबाबा मल्टिस्टेटचे अध्यक्ष कडुभाऊ काळे , गॕस एजन्सीचे जिल्हाध्यक्ष बबनराव भुसारी , अनंतराव नळकांडे , डाॕ. प्रणव जोशी आदिंनी भेटुन शुभेच्छा दिल्या .

   अधिवेशनास जिल्हाध्यक्ष विलास जगदाळे , उपाध्यक्ष अमिता कोहली, संघटक अतुल कु-हाडे ,कोषाध्यक्ष शाहुराव औटी , सचिव कारभारी गरड ,तालुकाध्यक्ष डाॕ. रजनीकांत पुंड , सिताराम बोरुडे, डाॕ. अप्पासाहेब नरवडे ,अशोक शेवाळे ,कैलास शर्मा ,सुरेश रहाणे , प्रविण जोशी, सुचेता कुलकर्णी , दिनेश थोरात , बाळासाहेब कोकाटे , ग्राहराजाचे  प्रा. दिलीप फडके आदिंसह नगर , नासिक , जळगाव ,पुणे , सोलापुर ,कोल्हापुर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget