नेवासा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट,योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन

नेवासा तालुक्यात सरकारी कापूस केंद्र सुरू करा-कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांची मागणी


नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याची तक्रार भष्ट्राचार विरोधी जन आंदोलन समितीच्या सदस्यांनी नेवासा येथील सहायक निबंधक सहकार खाते यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न झाल्यास त्रिव आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.नेवासा तालुक्यात सरकारी कापूस केंद्र सुरू करा अशी मागणी यावेळी कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी यावेळी बोलताना केली.
   नेवासा तालुक्यात सरकारी कापूस केंद्र सुरू करण्यात यावे,आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,वजन काटे तपासण्यासाठी छापे टाकावे,कापूस खरेदी झाल्यानंतर
व्यापाऱ्यांकडून अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे, अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या असून या बाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास या संदर्भात त्रिव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
           या निवेदनावर शेतकरी अंबादास कोरडे,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भष्ट्राचार विरोधी जनआंदोलन चे तालुकाध्यक्ष रामराव भदगले,कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे,बहिरु शेजुळ,एस.आर.शिंदे यांच्या सह कापूस उत्पादक यांच्या सहया आहेत

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget