एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या

आमदार आशुतोष काळे यांच्या महसूल व कृषी विभागाला सूचना !

चांदेकसारे (वार्ताहर ) 
आमदार आशुतोषदादा काळे यांनी परतीच्या पावसाने झालेले नुकसान व सुरु असलेल्या पंचनाम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी कोपरगाव शहरातील संपर्क कार्यालयाच्या सभागृहात आज आढावा बैठक घेतली.

मागील काही दिवसांपासून कोपरगाव मतदार संघात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. हवामान खात्याने अजूनही आठ दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला असून त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही. त्यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असलेल्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे व नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आमदार आशुतोषदादा काळे यांनी महसूल व कृषी विभागाला आढावा बैठकीत दिल्या आहेत.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपअध्यक्ष  पद्माकांत कुदळे, सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवन, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगरसेवक डॉ. अजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समितीचे गटनेते अर्जुनकाळे,  राहुल रोहमारे, प्रसाद साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आदी उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget