नेवासा फाटा येथे दोन दिवशीय अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांतिक अधिवेशन !

जिल्हाधिकारी राहूल  व्दिवेदी व नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांची प्रमुख उपस्थिती ! त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात अधिवेशन  

नेवासा, प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांतिक वार्षिक अधिवेशन ( दि ९ व १०)  रोजी नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात संपन्न होणार आसल्याची माहीती नगर जिल्हाध्यक्ष विलास जगदळे यांनी दिली.
   या कार्यक्रमाचे उद्धाटन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते होणार आसून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे अन्न आयोग व ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे हे भूषविणार आसून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी, नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के,त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मेजर साहेबराव घाडगे - पाटील,जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर,नागेबाबा उद्योग समुहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, अहमदनगर महानगर पालिकेचे अध्यक्ष बाबासाहेब वाकळे,मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक राजकिय, शैक्षणिक व उद्योग विश्वातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आसल्याची माहीती जगदाळे यांनी दिली.
   या कार्यक्रमाचे उद्धाटन शनिवारी दुपारी १२ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आसून या दोन दिवशीय अधिवेशनामध्ये ऑनलाईन खरेदीमधील फसवणूक,ग्राहक संरक्षण कायद्यामधील बदल,सायबर क्राईममधील गुन्हे,रुग्णांची होणार फसवणूक व माहीती अधिकार कायदा अशा विविध विषयांवर चर्चा सञ होणार आसून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक अतूल कुऱ्हाडे,कोषाध्यक्ष शाहूराव औटी,सचिव कारभारी गरड,प्राध्यापिका अमिता कोहली यांच्यासह आयोजकांनी केली आसून अधिक माहीतीसाठी जिल्हाध्यक्ष विलास जगदळे (भ्रमनध्वनी क्रमांक ९७६५९८६६०१) व अतूल कुऱ्हाडे (९४२०६४३०३१) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget