कोपरगावात पाणीटंचाई उपाययोजनेबाबत बैठक

चांदेकसारे (वार्ताहर )
टंचाईचा संभाव्य आराखडा करताना शाश्वत उपाय योजना कराव्या. या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी. पाण्याचे उद्भव लक्षात घेवून टंचाईग्रस्त गावात योग्य नियोजन करावे. आराखडा तयार करताना नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रामुख्याने विचार करून प्रत्येक गावातील ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत उपाय योजना कराव्या जेणेकरून टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये व नागरिकांना टँकरने पाणी पुरविण्याची वेळ येवू नये याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी आमदार आशुतोषकाळे यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती सौ.अनुसयाहोन, उपसभापती अनिल कदम, पंचायत समितीचे गटनेते अर्जुनकाळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, कारभारी आगवन, राहुल रोहमारे, रोहिदास होन, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कृषी अधिकारी अशोक आढाव आदि उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget