राष्ट्रीय वारकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रामायणाचार्य अमृतानंद महाराज कांकरिया यांची नियुक्ती

नेवासा,प्रतिनिधी
राष्ट्रीय वारकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी श्री क्षेत्र नेवासा येथील रामायणाचार्य अमृतानंद महाराज कांकरिया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र राष्ट्रीय वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व पंढरपूर येथील मुक्ताबाई मठाचे प्रमुख ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांनी दिले आहे.
मूळचे लातूर येथील रहिवासी असलेले रामायणाचार्य हभप अमृतानंद महाराज कांकरिया हे श्री क्षेत्र नेवासे नगरीत सद्या स्थायिक झालेले आहे.रामायण व भागवत कथेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन हभप अमृतानंद कांकरिया महाराजांनी सनातन वैदिक धर्माच्या प्रचारासह भागवत धर्माचा ही प्रचार व प्रसार वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करत असल्याने त्यांची ही निवड करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय कीर्तनकार व राष्ट्रीय वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप निवृत्ती महाराज वक्ते यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रकात स्पष्ट केले आहे.
याआधी हभप अमृतानंद महाराज कांकरिया यांनी राष्ट्रीय वारकरी सेनेचे नगर जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवा किर्तनकारांची मोठी फळी उभी केल्याने त्यांना संपुर्ण राज्याची जबाबदारी राष्ट्रीय वारकरी सेनेने दिली आहे.
वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण कथा कीर्तना द्वारे विकृत प्रवृत्तीवर प्रहार करून सुसंस्कृत समाज समाज घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस ह.भ.प. रामायणाचार्य अमृतानंद कांकरिया महाराज यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रीय वारकरी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रामायणाचार्य अमृतानंद महाराज कांकरिया यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्ती महाराज वक्ते,श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख, श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज,राष्ट्रीय वारकरी सेनेच्या सर्व युवा किर्तनकारांनी व महाराज मंडळींनी अभिनंदन केले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget