कोळगाव येथे बिबट्याचा उच्छाद.एका गायीचा पाडला फडशा.

विसापूर
कोळगाव ता.श्रीगोंदा येथे दोन दिवसात बिबट्याने उच्छाद सुरू केला आहे. साकेवाडी शिवारात गणपत महादु साके यांच्या गायीचा शनिवारी रात्री बिबट्याने फडशा पाडला. 
    साके यांनी आपली घरा शेजारी बांधली होती.शनिवारी रात्री बिबट्याने त्या गायीचा फडशा पाडल्याची बाब साके यांच्या कुटुंबातील सदस्य रविवारी सकाळी उठल्यावर लक्षात आली.त्यानंतर गणपत साके यांनी वनविभागाशी संपर्क साधला.वनरक्षक हरीश मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमार्टम केले.त्यानंतर नुकसानभरपाई साठीचा अहवाल वनविभागाचे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.या ठिकाणी एका मादी बिबट्याबरोबर दोन बच्छड्यांचा वावर असल्याचे रहीवासी सांगत आहेत.वन अधिकारी यांनी नागरिकांना आपल्या जनावरांना सुरक्षित जाळी ठोकून घ्याव्यात. रात्री बेरात्री एकटयाने घराबाहेर पडून नये अशा सूचना केल्या.वनविभागाकडुन पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे. 

कोळगाव येथील साकेवाडी शिवारात गायीचा फडशा पाडलेला बिबट्या असल्याचे त्याचे पावलांचे खुणावरुन आढळून आले आहे.वारंवार बिबट्याचा वावर आढळून आल्याचे निदर्शनास आल्यास पिंजरा बसवण्या बाबत वरिष्ठ कार्यालयाची मदत घेण्यात येईल. 
     ---- हरिश मुंढे, वनरक्षक, कोळगाव.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget