विकासकामांच्या माध्यमातुन तालुक्याचा विकास :आ.मुरकुटे

सोनई 
रस्ते,वीज,पाणी,आरोग्य,जलयुक्त शिवार,मुख्यमंत्री सडक योजना,विविध प्रकारचे अनुदान,तीर्थक्षेत्र विकास आदी कामाच्या माध्यमातुन तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला असल्याचे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.
ते नेवासा तालुक्यातील करजगाव येथिल प्रचार सभेत बोलत होते.अध्यक्षपदी विजय महाराज नांगरे होते.
तालुक्याला सर्वागिण विकासासाठी व हुकुमशाही घराणेशाही उलथुन टाकण्यासाठी पुन्हा निवडुण देण्याचे आव्हाहन यावेळी त्यांनी केले.
माजी आ.गडाख यांनी सत्तेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला असुन स्वतःचे उद्योग व्यवस्थित चालविण्यासाठी व तालुक्याला गुलाम करण्यासाठी आमदारकी हवी आहे.प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असुन तसेच अर्धवट माहितीच्या अधारे बिनबुडाचे आरोप  करत आहे.यामुळे गडाख हे अर्धवटराव असल्याचा घनाघात आरोप आ.मुरकुटे यांनी केला.
यावेळी पुजाताई लष्करे,उदयकुमार बल्लाळ ,प्रकाश शेटे, ऋषीकेश शेटे,सोनई ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल ब-हाटे,किशोर  जंगले,संजय कोलते आदीनी गडाख यांच्यावर घणाघाती आरोप केला.
यावेळी दत्ताभाऊ काळे,करजगावच्या सरपंच विमल बर्डे,उपसरपंच अशोक टेमक,दत्तात्रय घोलप,पाराजी गुडधे,लक्ष्मण माकोणे,सतिश कर्डिले,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,मोहन फुलसौंदर,माजी सरपंच नानासाहेब माकोणे,परसराम माकोणे,शिवाजी गर्धे,दिलीप पवार,भाऊसाहेब टेमक ,संभाजी जगताप, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्तविक विठ्ठल फुलसौंदर आभार उपसरपंच अशोक टेमक यांनी मानले. यावेळी क्रांतीकारी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते संजय फुलसौंदर यांनी भाजपात प्रवेश केला.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget