पाथर्डी तालुक्यात कांदा लागवडीला सुरवात

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा लागवडीला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी कांद्याचे बसवंत  ७८०,एन ५३,पुसा रेड या कांदा जातीचे बियाणे घेऊन काही शेतकऱ्यांनी रोप लागवड व शिप कांदा पद्धतीने लागवड सुरु केली आहे.कांदा पीक कमी कालावधीत तसेच अल्प खर्चात  जास्त उत्पादन देणारे पीक मानले जाते.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल कांदा पिकाकडे असतो.शेतकऱ्यांनी कांदा पीकासाठी जमीनीची चांगल्या प्रकारे मशागत केलेली आहे.पाट- पाण्याच्या भाग असल्याने यंदा विहीरीना चांगले पाणी आहे.तसेच काही प्रमाणात पाऊस चांगला झालेला आहे.यामुळे येथील परीसरात कांदा लागवडीस सुरवात झाली आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होवून उच्च प्रतीचा हमीभाव येत्या काळात मिळेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget