जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागर स्री शक्तीचा कार्यक्रम साजरा

चांदेकसारे(वार्ताहर )  
कोपरगांव तालुक्यातील पोहेगांव येथील माधवराव बारकुजी पाटील शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती नवीन येथे जागर स्री शक्तीचा हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या.नवरात्रीत रंगांना विशेष महत्व असते,विद्यार्थींनींनीही नऊ रंगांच्या नऊवारी साड्या परिधान करून या रंगांच्या माध्यामातून स्री शक्तीच्या विविध गुणांचा परिचय करून देवून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.सानिका कदम,प्रिया देशमुख,भारती मोरे,श्रद्धा पेटारे,भाग्यश्री गुंजाळ,अक्षदा डांगे,समृद्धी धुमरे,सृष्टी जाधव,कावेरी पाडेकर यांनी आपल्या भाषणातून स्री शक्तीचे महत्व सांगितले.’स्री भ्रूण हत्या थांबवा,लेक वाचवा-लेक शिकवा,स्री- पुरुष समानता,स्रींयांचा अत्यंत आदर करणे, स्रीला स्वावलंबी बनविणे इ. विविध संदेश दिलेत.प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिन आढांगळे यांनी केले.यावेळी महिला पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी मृत्यूंजय मित्र मंडळ,सप्तश्रृंगी मित्र मंडळ यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.यावेळी योगेश मुंगसे,संकेत शिंदे,अविनाश पगारे,जालिंदर शेलार,अनिकेत पेटारे,सनी शेलार शालेय व्यवस्थापनचे बाळासाहेब जाधव,विजय देशमुख,बाळासाहेब गडाख,अशोक गुंजाळ,गणेश गुंजाळ,काळू मुठे अंगणवाडी सेविका मंगल देशमुख, संगिता औताडे आदी उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget