सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते धर्मध्वजारोहन करून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

नेवासा(प्रतिनिधी)
सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज
प्रबोधन प्रतिष्ठानच्या प्रांगणात शनिवार दि.१९ ऑक्टोबर रोजी जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते धर्मध्वजारोहनाने उत्साहपूर्ण वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर पर्यंत हा सोहळा चालणार असून याच दिवशी संत महंतांच्या उपस्थितीत सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
        अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी जेष्ठ पत्रकार मधुकरराव देशपांडे,विजय गांधी,भाऊसाहेब पाठक सर,सुधीर चव्हाण,रमेश शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात धर्मध्वज पूजन,प्रतिमा व पादुका पूजन करण्यात आले.
           याप्रसंगी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्रसंपन्न गणेशदेवा कुलकर्णी,हेमंतगुरू कुलकर्णी,केदार जोशी यांनी केले.यावेळी रामनाथ महाराज पवार,नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के, सुरेगावचे सरपंच बद्रीनाथ शिंदे,आण्णा साहेब पटारे,पुणे येथील उद्योजक रविंद्र मुनोत नेवासकर,कृष्णा महाराज मते,पंडितराव थोरात, वरद विनायक देवस्थानचे सेवेकरी कचरू पाटील निर्मळ नाना, विश्वनाथ मंडलिक,सचिन निर्मळ,प्रा.रामनाथ नन्नवरे,कृष्णाभाऊ शिंदे,रावसाहेब पेचे, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
             या प्रसंगी प्रबोधन प्रतिष्ठानचे प्रमुख हरिभक्त परायण गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.अखंड हरिनाम सप्ताहा मध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची त्यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर रखमाजी नाचन यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
       यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्याला शुभेच्छा
दिल्या यावेळी पारायण व्यासपीठ प्रमुख हभप नामदेव महाराज जाधव व रामनाथ महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली पारायणास प्रारंभ करण्यात आला.
       सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा पणा सोहळया निमित्ताने दि.१९ ऑक्टोबर ते शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन,सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम,७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी ११.३० १२.३० संतपूजन,दुपारी ३ ते ४.३० संगीत भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,सायंकाळी ७ ते ९ नामवंतांची कीर्तने होणार आहे.
    शुक्रवारी दि.२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा अहमदाबाद येथील जेष्ठ समाजसेवक सोमाभाई मोदी,त्र्यंबकेश्वर येथील महंत सागरानंद महाराज,श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज,भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज, कॅप्टन अशोककुमार खरात,कोपऱगाव येथील रमेशगिरी महाराज,तारकेश्वर गडाचे आदिनाथ शास्त्री महाराज,महंत परमानंद महाराज यांच्या हस्ते व अनेक संत महंतांच्या उपस्थितीत वेदमंत्राच्या जयघोषात होणार आहे.त्यानंतर गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार असून या कालावधीत  कीर्तनासह होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोहळा संयोजक उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी बोलतांना केले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget