बोधेगाव येथे राष्ट्रवादीच्या सभेत शरद पवार यांच्याकडून भाजप सरकारवर जोरदार टीका

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोणी ओळखत तरी होते का? ते आज महाराष्ट्रात येऊन विचारतात, शरद पवारांनी काय केले. आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपला केला.
               शेवगाव-पाथर्डी मतदातसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी बोधेगाव येथे जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शेवगाव मतदार संघाचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण लांडे, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख,मा.जि.प.सदस्य शिवशंकर राजळे,संजय कोळगे आदी मान्यवर उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले, शेतक-यांच्या हिताचे हे सरकार नाही.
ठराविक लोकांना आणि मीडियाच्या काही लोकांना हाताशी धरले तर सरकार स्थापन करता येऊ शकते हे या लोकांना वाटते. शेतक-यांच्या डोक्यावर थोडे फार कर्ज बाकी असेल तर त्याची घरातील भांडी, कुंडी बाहेर काढली जातात. ७० टक्के शेतक-यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. हे सरकार आपल्या हिताचे नाही.यावेळी शेवगाव मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे,माजी आ.नरेद्र घुले पाटील यांची भाषणे झाली.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget