कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने देवगड येथे हजारो भाविकांची मांदियाळी

नेवासा(प्रतिनिधी)
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे हजारो भाविकांनी .. दिगंबरा ..दिगंबरा ..श्रीपाद वल्लभ ..दिगंबरा चा गजर करत भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले.दुपारच्या सत्रात महाआरती प्रसंगी भाविकांची झालेली गर्दी लक्षणीय होती.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीला गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला.पहाटे पासूनच भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासमोर बॅरॅकेटद्वारे रांगेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.श्री समर्थ सदगुरू किसनगीरी बाबांचे समाधी मंदिर,पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर परिसर गर्दीने व्यापून गेला होता.यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचे गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी संवाद साधत स्वागत केले
कोजागिरीपौर्णिमेनिमित्ताने देवगड मंदिर प्रांगणात विविध स्टॉल थाटण्यात आल्याने देवगडला यात्रेचे स्वरूप आले होते.मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते.भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून भक्तपरिवाराच्या संतसेवक बाळू महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे,दामोदर साबळे,सरपंच अजय साबळे,अंबादास फोलाणे, बाळासाहेब पाटील,विवेक महाराज साबे,महेंद्र फलटणे, चांगदेव आण्णा साबळे,माजी उपसरपंच भिमाशंकर वरखडे, संदीप साबळे,यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावून चांगली सेवा दिली.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget