हॅरिसन ब्रँच शाळेत डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती

वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उपक्रमांनी साजरी

चांदेकसारे ( वार्ताहर)
भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त काल जिल्हा परिषद हॅरिसन ब्रँच शाळेत ‘वाचन प्रेरणा दिन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.      मुख्याध्यापक नवनाथ  सूर्यवंशी यांनी वाचनाचे महत्व सांगून डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलामांची यांच्या जीवनविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती करून दिली.त्यांच्या जयंतीनिमित्त "विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्व जाणून दररोज मधल्या सुट्टीत व घरी मोकळ्या वेळेत जास्तीत जास्त अवांतर वाचनाची पुस्तके वाचण्याचा संकल्प केला.वाचनाने मनुष्याच्या जीवनात बौद्धिक व सामाजिक परिवर्तन घडून येते.तसेच आपले विचार प्रगल्भ होतात.अंध व्यक्ती वाचू शकत नाही,त्यांच्या साठी ब्रेल लिपीत पुस्तके उपलब्ध आहेत.ते बोटांच्या स्पर्शाने वाचू शकतात.अंध व्यक्तींसाठी विशेष शाळा असतात.त्यांना त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.अंध,अपंग व्यक्तींना वेळोवेळी अडचणीच्या प्रसंगी मदत केली पाहीजे.आपल्याला जन्मतःच असलेल्या अवयवांची आपण काळजी घेतली पाहीजे.आपले शरीर स्वच्छ ठेवावे..."असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून वरील विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करून घेण्यात आली.विद्यार्थी व शिक्षकांनी एक तास गोष्टीचे व अवांतर वाचनाची पुस्तके वाचली.त्यानंतर इयत्ता तिसरीचा विद्यार्थी इरशान शेख याने आवडलेल्या "चांगल्या सवयी" या पुस्तकाचे प्रकट वाचन करून दाखवले..
तसेच जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना तसेच महिला पालकांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक श्रीम.मनिषा शिंपी  यांनी करून दाखविले व जेवणापूर्वी,शौचाहून आल्यानंतर,बाळाची शी धुतल्यानंतर तसेच स्वयंपाकापूर्वी आपले हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत अशा प्रकारचे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत shortfilm उडाण दाखविण्यात आली. अंगणवाडी सेविका व मदतनीस, रंजना दळवी उपस्थित होत्या. शेवटी आभार मनीषा शिंपी यांनी मानले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget