जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त नेवासा येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

नेवासा(प्रतिनिधी)
नान्नज धाम येथील जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नेवासा येथे श्री संप्रदायाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेवासा येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.सौ.मनिषाताई वाघ यांच्या हॉस्पिटलमध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित भक्त परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचा शुभारंभ जगदगुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला.
यावेळी सेवेकरी डॉ.मनिषा वाघ,श्री संप्रदाय महिला तालुकाध्यक्ष सौ.संगिताताई दहिफळे,जिल्हा आध्यात्मिक प्रमुख दत्तात्रय उन्हाळे, जिल्हा संजीवनी प्रमुख योगेश जाधव,तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार,श्रीमती नंदाताई गरुटे, बेबीताई मरगळ,तालुका कमिटीतील सर्व सदस्य सर्व सेवा केंद्र अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. यावेळी अहमदनगर ब्लड बँकेला रक्त देण्यात आले शिबिर प्रसंगी ब्लड बँकेचे पवन सदाफळ,सुधा झंझाड,शिवम खिल्लारे,स्वाती झंझाड,औदुंबर कदम,महादेव खोचरे यांनी विशेष सेवा रक्तगट तपासणी करून दिली.
यावेळी बोलतांना डॉ.मनिषा वाघ म्हणाल्या की स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या वतीने राज्याच्या हायवेवर रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली असून हायवेवर अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित हे रक्त पुरविले जाऊन जखमींना जीवदान देण्याचे पुण्याचे संस्थानच्या माध्यमातून केले जाते त्यामुळे सर्वांनी राष्ट्रीय कार्य समजून संस्थाच्या माध्यमातून होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन केले

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget